बोधकथा मराठी | Inspirational Stories in Marathi | 5 शिकवण

या बालभारतीच्या कथा लहान मुलां बरोबर मोठ्यांना सुद्धा शिकवण देतात. चला तर मग वाचूया. Inspirational Stories in Marathi | मुलांसाठी 5 बोधकथा मराठी | चांगल्या शिकवणी

1. कष्टाचे फळ | kashtache fal Story in marathi

रामपूर नावाच्या मध्ये एक वयस्कर शेतकरी होता. त्याला चार मुले होती आणि ती सगळी अत्यंत आळशी होती. मुलांनी जे काही कमावले त्यावरती मौज मजा करण्याशिवाय त्यांना काही माहीत नव्हते. वडिलांना नेहमी काळजी वाटत असेल की आपण गेल्यावर या मुलांचे काय होईल आणि ते संसाराची जबाबदारी कशी घेतील?

ही चिंता करता एक दिवस वडील शेतकऱ्याला एक युक्ती सुचते त्यानंतर चारही मुलांना जवळ घेऊन त्यांना सांगतो की आपल्या पूर्वजांनी शेतामध्ये एक सोन्याने भरलेला हंडा लपून ठेवलेला आहे. तेव्हा ते अतिशय उत्सुकतेने आणि हव्यासाने विचारायला सुरुवात करता की नेमका तो हंडा शेतात कुठे आहे ? पण शेतकरी असे म्हणतो की नेमकी जागा मला माहित नाही.

काही दिवसानंतर शेतकरी अचानक गावाला जातो त्यामुळे इतके दिवस सोन्याच्या मोहापाई शांत बसलेले हे चारही मुले सोन्याचा हंडा सापडवण्यासाठी पूर्ण शेत करून काढतात शेतातील प्रत्येक कोपरा न कोपरा खणून ते शोधतात. पण त्यांना काही मिळत नाही.

बोधकथा मराठी | Inspirational Stories in Marathi

Inspirational Stories in Marathi | मुलांसाठी 5 बोधकथा मराठी | चांगल्या शिकवणी

जेव्हा शेतकरी घरी येतो तेव्हा तो हे सर्व तेव्हा तो आपल्या निराश झालेल्या मुलांना म्हणतो तुम्ही हे कष्ट सोन्याचा हंडा शोधण्यासाठी केलेले आहे पण हेच कष्ट जर मी तुम्हाला शेती करण्यासाठी सांगितले असते तर तुम्ही केले नसते. पण तुम्ही चिंता करू नका कष्टाचे फळ नेहमी गोड असते तुम्ही खणलेल्या या शेतात मी आता शेती करण्यासाठी धान्य पेरेल.

त्यानंतर काही दिवसांनी व्यवस्थित खणून काढल्यामुळे शेतातून भरपूर धान्य पिकले आणि शेतकऱ्यांनी ते धान्य मुलांना बाजारात जाऊन विकण्यास सांगितले. बाजारात जाऊन विकून आल्यानंतर मी आलेल्या धना मुळे शेतकऱ्याचे चारही मुले अतिशय खुश झाली.

त्यांनी केलेल्या कष्टाचे अशा प्रकारे चीज झाले हे पाहून मुलांनाही समाधान झाले. आणि शेवटी त्यांना कळाले की कुणालाही हातामध्ये सोन्याचा हंडा किंवा मोठे धन अचानक मिळत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागतात.

तात्पर्य – कष्टाचे फळ गोडच असते.

2. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ | Doghanche Bhandan tisryacha labh Inspirational Stories in Marathi

एका जंगलातील एका झाडावरती दोन माकडे राहत होती एकदा एक गवळी त्या झाडाखाली झोपला असता त्यांनी त्याच्या मडक्यातील लोणी चोरून घेतले आणि तो गवळी गेला असता समान वाटणी करण्यावरून त्यांचे वाद होऊ लागले.

शेवटी त्यांनी असे ठरवले की त्या दोघांपैकी कोणीही समान वाटणी करू शकणार नाही त्यामुळे त्यांनी बोक्याकडे जायचे ठरवले.

बोक्याने लोणी समान वाटप करून घेण्यासाठी एक ताराजू आणला त्यामध्ये लोण्याचे असमान असे दोन भाग ठेवले. भाग असमान असल्यामुळे तराजू एका बाजूला खाली गेला बोक्याने लगेच जास्त वजन असलेल्या तराजू मधील मुठभर लोणी खाऊन टाकले. आणि त्यांना सांगितले असे केल्याने लोण्याचे समान भाग होऊ शकतात.

भोळ्या माकडांनी त्याला या पद्धतीला होकार दिला. आता त्यांनी तराजू कडे बघितले अस्ता त्यांना दुसरे पारडे जड झाल्याचे दिसले तेव्हा बोक्याने पटकन संधी साधून दुसऱ्या पार्ड्या मधील मूठभर लोणी खाल्ले. प्रत्येक वेळेस बोका लोणी खाण्याची संधी सोडत नसे.

शेवटी माकडांना काहीच शिल्लक राहिले नाही आणि सगळे लोणी बोक्याने फस्त केले. माकडांना लोणी न मिळाल्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली.

तात्पर्य – दोघांच्या भांडणांमध्ये धूर्त व्यक्ती आल्यास त्याचा नेहमी फायदा होतो

Inspirational Stories in Marathi | मुलांसाठी 5 बोधकथा | चांगल्या शिकवणी

3. ससा आणि कासवाची गोष्ट | Sasa ani kasav story in Marathi

ही आहे एका जंगलातली गोष्ट ज्यामध्ये एक ससा आणि एक कासव हे अगदी जवळचे मित्र असतात. ससा अतिशय चपळ आणि चंचल असतो उलट कासव अतिशय संथ आणि अविचल असते. अविचल म्हणजे काय मित्रांनो की ज्याचे मन एका गोष्टीवर स्थिर झाले की ते नंतर कशानेही डगमगत नाही.

बोधकथा मराठी | Inspirational Moral Stories in Marathi

एकदा काय होते या दोघांमध्ये शर्यत लागते. शर्यत असते एक लांब पल्ल्याच्या रस्ता पार करण्याची. या शर्यतीतील उत्सुकता जंगलातील सर्व प्राण्यांना लागते कारण इथे स्पर्धा दोन मित्रांमध्ये असते त्यामुळे कोण भरेल आणि कोण जिंकेल हा चर्चेचा विषय होता.

ठरलेल्या दिवशी सर्व प्राणी शर्यतीच्या ठिकाणी जमतात तसा आणि कासव एका रेषेच्या मागे उभे राहतात आणि शिट्टी वाजल्याबरोबर शर्यत सुरू होते.

शर्यतीमध्ये सुरुवातीला ससा फारच पुढे निघून जातो कारण त्याचा वेग कासवा पेक्षा ती तरीपटींनी खूप जास्त असतो. या दोघांमधील अंतर पाहून सर्वांना असेच वाटते की आता ससा जिंकणार. त्यामुळे सर्व प्राणी ससा सोबत पुढे पुढे जायला सुरुवात करतात आणि कासव मागे राहते.

Inspirational Stories in Marathi | मुलांसाठी 5 बोधकथा | चांगल्या शिकवणी

पण रस्ता खूप लांब असल्यामुळे सशाला इकडे तिकडे बघता बघता त्याचा आवडता पदार्थ म्हणजे गाजर दिसतो ते बघताच त्याला वाटते की कसेही करून मी शर्यत जिंकणारच आहे तर थोड्या वेळ गाजर खाण्यासाठी दिला तर काय फरक पडणार. म्हणून तो पोट भरून गाजर खातो. त्याला सुस्ती येते आणि पुन्हा तो विचार करतो की थोडा वेळ झोपल्याने काय फरक पडणार आहे. तू मागे वळून कासव खूप लांब आहे ना याची खात्री करतो आणि मग झोपतो.

कासवाने मात्र आपल्या शर्यतीमध्ये एकदाही थांबा घेतला नाही. तो अविचल पणे आपल्या ध्येयाकडे म्हणजेच शर्यत जिंकण्याच्या उद्दिष्टाने पुढे पुढे चालत होता. शर्यतीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीचा त्याला मोह झाला नाही. थोड्याच वेळा त्याला ससा शर्यतीमध्ये झोपलेला दिसला. तो गालात खुदकन हसून पुढे शर्यत पूर्ण करण्यासाठी निघाला.

सस्याला मात्र गाढ झोप लागलेली होती जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला लक्षात आले की आपण शर्यत लावलेली होती आणि आता काय झाले असेल या विचाराने तो जोरजोरात धावू लागला. पण जोरात धावून काहीच उपयोग झाला नाही. कारण समाप्तीच्या रेषेपर्यंत कासव पोहोचलेले त्याला दिसले आणि सर्व प्राण्यांनी त्याचे अभिनंदन करताना त्याने पाहिले. चंचलपणा आणि गर्व यामुळेच आपल्याला पराभव स्वीकारावा लागला हे सशाला कळून चुकले.

तात्पर्य – जो प्रयत्न मध्ये सातत्य आणि कष्ट ठेवतो त्यालाच यश मिळते

Inspirational Stories in Marathi | मुलांसाठी 5 बोधकथा | चांगल्या शिकवणी

फादर्स डे जवळ येतोय त्यासाठी वडिलांना हि कविता पाठवा

मराठी स्टोरी- चिमणीची गोष्ट वाचा

1 thought on “बोधकथा मराठी | Inspirational Stories in Marathi | 5 शिकवण”

Leave a Reply

%d bloggers like this: