Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

रामटेक सहल by रवी आटे | Best रामटेक मंदिर माहिती 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी रामटेक मंदिर माहिती या कीवर्ड वर आधारित “रामटेक सहल” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

साहित्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक उपक्रम क्रमांक १०
लेखाचा विषय- हिवाळ्यातील अविस्मरणीय सहल
शिर्षक -रामटेक सहल

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

कोणी कुठेही कितीही वेळा सहलीला जावो… जोवर रामटेकला सहलीवर जात नाही तोवर त्याच्या जीवनाची सहल अपूर्णच असणार! आहेच मुळी ते अत्यंत रम्य ठिकाण. ज्यांच्या अगदी शेजारीच हे ठिकाण आहे त्यांना अर्थातच त्याचे महत्त्व तेवढे कळणार नाही. रोजच्या पुनरावृत्ती मुळे कोणत्याही ठिकाणाचे सौंदर्य जाणवत नाही. संवेदना निसर्गतः बोथर होऊन जातात. रामटेकला स्वर्ग कसा नांदतो हे त्यालाच कळेल जो दूरवरून त्या ठिकाणी गेला असेल! रामटेकला जाणाऱ्या अनेक भाग्यवान लोकांपैकी मी सुद्धा एक भाग्यवान व्यक्ती ठरत आहे. सांगतो ना ते रम्य ठिकाण नेमके कसे आहे ते! मात्र हे माझे त्या ठिकाणाबद्दलचे सांगणे माझ्या आठवणी प्रमाणे असेल.

१९७१-७२ च्या दरम्यान शाळेच्या सहलीमध्ये मी सुद्धा गेलो होतो. आमचे स्वर्गवासी मिश्रासर तसेच स्वर्गवासी श्री यादवसर यांनी ही सहल आयोजित केली होती. आमच्या प्रिय लेबर कॅम्प हायस्कूल, पुलगाव कॅम्प, जिल्हा वर्धा या शाळेतील पाचवी ते दहावी या इयत्तेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी सहलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. भुसावळ ते नागपूर पॅसेंजरने आम्ही नागपूरला गेलो होतो व तिथून बसने रामटेकला पोहोचलो होतो. खरे तर सहलीसाठी माझे नाव देण्यात आलेले नव्हते.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

माझी मोठी ताई सहली मध्ये सहभागी झाल्याने मी माझ्या वडिलांच्या मागे खूपच जास्त तगादा लावून माझ्या सहलीची सोय करून घेतली होती! त्यामुळे माझी देखील एक पेटी(😂) तयार करून माझ्या वडिलांनी मला सायकलीने पुलगाव रेल्वे स्टेशन मध्ये थेट सहलीच्या समूहामध्ये पोहोचविले होते व माझे शुल्क इत्यादी भरले होते! पुलगाव वरून भुसावळ नागपूर पॅसेंजर सकाळी चार ते साडेचार च्या दरम्यान सुटायची असे आठवते. अर्थातच ही सहल हिवाळ्यात आयोजित करण्यात आली होती. म्हणून तर हा लेख दिलेल्या विषयाप्रमाणे लिहित आहे. या सहलीच्या काही गोष्टी निश्चितच माझ्या विस्मरणात गेल्या असतील. तरी सहलीमध्ये सहभागी झालेले मित्र तसेच इतर वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी आठवतात. पॅसेंजर ट्रेन ने प्रवास करताना गुमगाव …बुटीबोरी… बोरखेडी अशी स्थानके लागली होती ते अजूनही आठवते.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


पुलगाव वरून पॅसेंजर ट्रेन सुटल्यानंतर प्रथम कवठा नंतर दहेगाव (राजमलाई मिठाईचे स्टेशन) व त्यानंतर पुढे सिंधी रेल्वे स्टेशन व उपरोक्त स्थानके लागतात. नागपूरला पोचल्यानंतर आम्ही प्रथम महाराज बाग प्राणी संग्रहालय येथे गेलो होतो. हे निश्चित आठवते. पेटीच्या वजनामुळे जरा थकल्यासारखे व कंटाळल्यासारखे वाटत होते तेही हमखास आठवते. कपडे सामानापेक्षा पेटीचेच वजन जास्त होते! हिवाळ्याचे दिवस असल्याने गरम कपडे वगैरे सोबत घेतलेले होते. तसेच आईने स्टीलच्या डब्यात चिवडा चकल्यासारखे काही पदार्थ दिलेले होते. तसेच जेवण सुद्धा आम्ही सोबत घेतलेले होते.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

रामटेक सहल by रवी आटे |  Best रामटेक मंदिर माहिती 2024


नागपूर रेल्वे स्थानकात आम्हा मित्रांकडून एक खोडकर प्रसंग घडला होता. तो माझ्या इतर मित्रांनाही कदाचित आठवत असेल. काचबंद असलेली कचोरी – भेळ इत्यादींची हातगाडी आमच्या नजरेस पडली. तिथे कोणीही नव्हते. कुलूप असेच लावून ठेवलेले होते. माझ्यासोबत त्यावेळी कोण मित्र होते ते आठवत नाही. मात्र हातगाडीच्या काचेच्या खिडकीतून हात टाकून एक दोन कचोऱ्या चोरण्यात आल्या होत्या. कोणी चोरल्या ते आठवत नाही!मी त्याचा केवळ साक्षीदार रे बाबा! मी कचोरी चोरली असती तर ते मला निश्चितपणे आठवले असते! आणि आता पन्नास वर्षांपूर्वीच्या चोरीची कबुली दिल्याने मला काय शिक्षा थोडी होणार आहे!!! त्या कचोरी वाल्याला (हयात असो अथवा नसो) किंवा त्याच्या हातगाडीला माहितही नसेल की पन्नास वर्षानंतर त्या हात गाडीचा एखाद्या लेखात उल्लेख होईल!!!

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


तिथून आम्ही महाराज बाग येथे कसे गेलो ते मात्र आठवत नाही. महाराज बाग ची आठवण येण्याचे दुसरे कारण आहे! आमच्या सोबत आमच्या वर्गातील एक चिंतामण नावाचा विद्यार्थी होता. रात्रभर जागरण झाल्याने त्याला झोप आलेली होती. तो झोपलेला असताना कोणीतरी खोडकर विद्यार्थ्यांने त्याच्या तोंडात बिडीचा तुकडा ठेवला होता! अर्थातच चिंतामण खडबडून जागा झाला व त्याने संबंधित विद्यार्थ्याला खूप शिव्या वगैरे दिल्या होत्या.त्याची ती प्रतिक्रिया नैसर्गिक व न्याय्य(😂) होती! या प्रसंगामुळे अनेक विद्यार्थी विस्मरणात गेले असतील पण चिंतामणचा चेहरा माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिला!

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

तर मुळ मुद्द्यावर येऊ. हिवाळ्यातील अविस्मरणीय सहल! म्हणूनच या रम्य सहलीला मी या लेखासाठी निवडले आहे.
महाराज बाग बघितल्यानंतर कदाचित आम्ही अजायबघर नागपूर येथे गेलो असणार पण ते आठवत नाही! पुढे आम्ही बसने रामटेक येथे पोहोचलो. स्वर्गीय श्री मिश्रा सरांनी व स्वर्गीय श्री यादव सरांनी सहलीचे नियोजन व व्यवस्थापन अतिशय उत्कृष्ट प्रकारे केले होते. आमची सहलीची बस थांबताच सर्वप्रथम अंबाळा तलाव डोळ्यासमोर दिसला. एका मोठ्या फलकावर त्याची माहिती लिहिलेली होती. हा तलाव मला एवढा अद्भुत व रम्य वाटला की अजूनही पन्नास वर्षे झाली तरी या तलावाचे नाव मी विसरलो नाही. नंतर असे आठवते की देवस्थानासाठी खूपच पायऱ्या होत्या. खूप उंच टेकडीवर श्रीरामाचे व अनेक देवी देवतांची मंदिरे होती. आता या मंदिरांना कोणता रंग दिला असेल ते माहित नाही पण त्यावेळी बऱ्याच मंदिरांना पांढरा रंग दिलेला होता.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

खरे तर दगडी मंदिरांना रंग देण्याची आवश्यकता नाही. मंदिरांचे नैसर्गिक रूपच त्यामुळे लोप पावते! असो. या पायऱ्या रुंदीलाही खूप मोठ्या होत्या व खूप पायऱ्या होत्या. कदाचित वय- अकरा बारा वर्ष एवढेच असल्याने तसे जाणवले असेल. थकवा तर वाटत होता पण मज्जा ही खूपच वाटत होती. विशेष म्हणजे कोणी विश्वास करणार नाही पण तिथली एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहिली. एका मंदिरावर हिंदीतून वाक्य लिहिलेले होते. भगवान श्रीराम यहाँ पर सात लाख साल के पहले आये थे! असे ते वाक्य होते. फक्त सात लाख होते की नऊ लाख होते याबद्दल थोडासा माझा गोंधळ आहे. पण हे वाक्य मी वाचले होते व ते चांगलेच लक्षात राहिले .आतापर्यंत देखील! आहे की नाही मज्जा!!!

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


रामटेक येथे रामाची सेना वानर फार मोठ्या प्रमाणावर आहे हे आम्ही ऐकूनच होतो. त्याप्रमाणेच तिथे असंख्य वानर आम्हाला दिसले होते. खूप मंदिरे होती. अजूनही ते चित्र डोळ्यासमोर उभे राहते. लहान मोठ्या आकारांची अनेक मंदिरे तिथे होती. श्रीराम ,सीता व लक्ष्मण वनवासाच्या वेळी चार महिने रामटेक या स्थळी राहिले होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात व पद्मपुरानात आलेला आहे. अगस्ती ऋषी चे आश्रम देखील येथे होते व येथेच त्यांनी रामाला ब्रह्मास्त्र दिले होते.येथे श्रीरामाने राक्षसांचा सहार केला होता.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

प्राचीन काळापासून राम नवमी व त्रिपुरी पौर्णिमा असतांना रामटेकला यात्रा भरते. प्राचीन काळापासूनच येथे यात्रा भरते असा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आलेला आहे. सीतामाता स्वयंपाक घर पाहताना विशेषतः विद्यार्थिनींना खूपच आनंद झाला होता. सीता माता याच ठिकाणी अन्न तयार करून ऋषीमुनींना देत असे असा धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे. श्री गणेशाचे पुरातन मंदिर देखील दिसले होते. श्रीरामाचे भव्य मंदिर व त्या शेजारी दशरथ मंदिर व अनेक देवतांची व ऋषीमुनींची मंदिरे होती.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


नागपुर पासून रामटेक चे अंतर ५० किलोमीटर पेक्षा जास्त नाही. वर्षातील बाराही महिने रामटेकला मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू व पर्यटक येत असतात. उंच ठिकाणावर ही मंदिरे असल्याने भौगोलिक दृष्ट्या सुरक्षितता आहे. काही प्रमाणात तटबंदी केल्याचेही आढळून आले होते.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


कालिदासाने मेघदूत या महाकाव्याची रचना याच ठिकाणी केल्याचे उल्लेख आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरात दिगंबर जैन मंदिर देखील आहे. शासनाने त्या परिसरात कालिदासाचे भव्य स्मारक बांधलेले आहे. तसेच संस्कृतचे विद्यापीठ देखील स्थापन करण्यात आलेले आहे. रामटेकला भेट देताना या स्मारकाला देखील भेट देणे ज्ञानवर्धक व मजेशीर होईल.
रामटेकचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे. पुरातन मंदिरांचे हे ठिकाण भक्तिभावामुळे पर्यटकांनाआणखीच रम्य वाटते. तिथे गेल्यानंतर राम, सीता ,लक्ष्मण वनवासात कसे राहत असतील… त्यांची वेशभूषा कशी असेल… ते काय खात असतील… ते राक्षसांचा संहार कशाप्रकारे करत असतील… कसे दिसत असतील… त्यांचा नेमका कालावधी कोणता असेल अशा अनेक कल्पना मनात येऊन जातात!

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


लोकसभेचा मतदार संघ असल्यामुळे अलीकडे परिसराचा चांगला विकास करण्यात आलेला आहे. निवासाच्या सोयी देखील करण्यात आलेल्या आहेत. आमच्या सहलीने मात्र तिथे निवास केला नव्हता. निवास केल्याचे आठवत नाही म्हणजेच आम्ही रात्रीच्या पॅसेंजर ट्रेन ने पुलगाव ला परत आलो असणार. मात्र त्यावेळी नागपूर येथे दहा वर्षातून एकदा होणारे इंडस्ट्रियल एक्झिबिशन भरले होते! आता ते भरती की नाही माहित मात्र एक्झिबिशनचे नावही माझ्या लक्षात राहिले. तिथेही आम्ही सर्व गेलो होतो. त्यातील एक सेक्शन भुताचे होते!!! अचानक वळताना भुतांचे पुतळे व रहस्यमय आवाजाची व्यवस्था घाबरवण्यासाठी करण्यात आली होती .त्यामुळे ही आठवण चांगलीच स्मरणात राहिली! या आठवणी बाबत मी माझ्या बालपणीच्या मित्रांकडून देखील खातर जमा करून घेतली!

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती


त्यानंतर जीवनात अनेक सुखद सहली झाल्यात हिवाळ्यात, उन्हाळ्यात व पावसाळ्यात देखील. मात्र हिवाळ्यातील रामटेकची ही सहल बालपणाच्या आठवणीमुळे अविस्मरणीय झाली. लेख वाचताना आपणासही माझ्यासोबत ह्या सहलीचा रम्य सहवास लाभला असेल!!! तर केव्हा निघता रामटेकच्या सहलीसाठी! पुन्हा एका नव्या सहलीच्या ठिकाणी भेटूच!

रवी आटे सानपाडा नवी मुंबई
९३२४७४५९७०

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

रामटेक सहल | रामटेक मंदिर माहिती

Read More

Harishchandra Gad History in Marathi

Author

  • रवींद्र प्रल्हाद आटे

    Author Information - श्री.रवींद्र प्रल्हाद आटे, सानपाडा नवी मुंबई येथील रहिवासी असून, तालुका सानपाडा आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर एम ए राज्यशास्त्र-एम फिल राज्यशास्त्र देखील पूर्ण केले आहे. त्यांना 30 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 35 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख,कविता व चारोळी हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना फक्त काही प्रमाणपत्रे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9324745970

रवींद्र प्रल्हाद आटे

Author Information - श्री.रवींद्र प्रल्हाद आटे, सानपाडा नवी मुंबई येथील रहिवासी असून, तालुका सानपाडा आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर एम ए राज्यशास्त्र-एम फिल राज्यशास्त्र देखील पूर्ण केले आहे. त्यांना 30 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 35 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख,कविता व चारोळी हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना फक्त काही प्रमाणपत्रे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9324745970

Leave a Reply