दिवाळीमध्ये करा हे 10 व्यवसाय | Best Diwali Business Ideas In Marathi

10 Diwali Business Ideas In Marathi दिवाळी हा सण भारतामध्ये सर्वधर्मीय मिळून हा सण साजरा करतात. त्यामुळे हा सण आला की विविध व्यवसाय भरभराटीस यायला सुरुवात होते. दिवाळी या सणांमध्ये तुम्ही देखील विविध प्रकारचे व्यवसाय करून भरघोस पैसे कमवू शकता.

10 Diwali Business Ideas In Marathi

Best Diwali Business Ideas In Marathi

आकाशदिवे विकण्याचा व्यवसाय Business of selling skylights

दिवाळीच्या सणात अनेक जण हा व्यवसाय करतात. आकाश दिवे मेणबत्त्या विकून भरपूर पैसे ते या व्यवसायातून कमावतात. तुम्हीही हा व्यवसाय अगदी सहज रित्या सुरू करू शकता. तुम्ही एखादया विक्रेत्याकडून आकाशकंदील खरेदी करू शकता आणि नंतर स्टॉल लावून तुमच्या दुकानात विकू शकता.

दिवाळीत सणाच्या सीजनमध्ये आकाश कंदील आणि मेणबत्त्या खूप महाग असतात. काही लोक 200 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतचे आकाशकंदील खरेदी करतात. तुम्ही ज्या शहरात ग्रामीण भागात किंवा परिसरात त्यांची विक्री करत आहात त्यानुसार तुम्ही तुमच्या दुकानात किंवा स्टॉलमध्ये स्वस्त अथवा महागड्या आकाश कंदील व मेणबत्त्या विक्री साठी ठेवू शकता.

निरोगी मिठाई व्यवसाय Healthy sweets business


दिवाळी सण हा गोड आणि चवदार पदार्थांसाठी ओळखला जातो. लोकांच्या धावपळीच्या जीवनात दिवाळी सणाची फराळाची तयारी करणे अत्यंत अवघड होऊन जाते, म्हणून ते मिठाई व फराळीचे पदार्थ बाहेरून ऑर्डर करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे तुमच्या व्यवसायातला खूप भरभराटी होऊ शकते आणि हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. दिवाळीच्या फराळात नाविन्याला भरपूर वाव मिळते.

तुम्ही तुमच्या ग्राहकांना स्टायलिश पॅकेजिंग, वैयक्तिक गिफ्ट बॉक्स व आकर्षक डिस्काउंट आणि जाहिराती देऊन खूप नफा मिळवू शकता. प्रत्येक सण व उत्सवासाठी अन्न आवश्यक आहे, म्हणून तुम्ही दिवाळी स्नॅक सेटर सुरू करण्याचा विचार करू शकता.

दिवाळी सणाच्या वेळेला लोकांना मिठाई आणि सुका मेवा खरेदी करणे खूप आवडते . जर तुम्ही पाक कलेमध्ये उत्कृष्ट असाल, तर तुम्ही बाजारातील मिठाईपेक्षा जास्त आरोग्यदायी मिठाई तयार करू शकता. दिवाळीत लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाण्याचे शौकीन असतात. ज्यात तूप व सुका मेवा यांचा समावेश केला जातो.

तुम्ही दिवाळीत लाडू, मिठाई, बालुशाही, कलाकंद, गुलाबजाम, बासुंदी, बर्फी आणि इतर अनेक वस्तू तयार करणारी कंपनी सुरू करू शकता. या व्यतिरिक्त, आपण पाहुण्यांना अल्पोपाहार देण्यासाठी डिश व बॉक्स तयार करू शकता. पाच दिवसांच्या दिवाळी सणाच्या दरम्यान सुमारे 20 दशलक्ष लोक खरेदी करतील असा अंदाज आहे, जे 2022 पेक्षा वाढले आहे.

दिवाळीत सर्वात सामान्य भेटवस्तू म्हणजे सुका मेवा होय. दिवाळी ही अशी वेळ असते. जेव्हा लोक विविध प्रकारच्या सामान्य भेटवस्तू खरेदी करण्यात गुंततात. दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी, सुकामेवा,चॉकलेट्स आणि फोटो फ्रेम्स किंवा आर्ट अशा विविध वस्तू दिवाळीच्या सणात लोक खरेदी करतात व तुम्ही हा व्यवसाय करून लक्षणीय नफा मिळू शकतात.

10 Diwali Business Ideas In Marathi

सजावट समान विक्री व्यवसाय Decoration same sales business

दिवाळीच्या काळात सर्व लोक आप आपले घर, बंगला व अंगण सजवतात. सजावटीसाठी अनेक विविध प्रकारचे साहित्य आणि वस्तू वापरल्या जातात आणि लोक ते नवीन साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

तुम्ही सजावटीच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय तुमच्या परिसरात सुरू करू शकता आणि तसेच रांगोळी, दिवे,तोरण इत्यादी अनेक वस्तू विकू शकता. तुम्ही स्टॉल लावून ते विकू शकता. तुम्हाला ते विक्री करण्यासाठी भाड्याने दुकान घेण्याची गरज नाही. किंवा तुमच्या जवळ सध्या दुकान असेल तर दुकानातही ते विकू शकता.

ही एक अतिशय चांगल्या प्रकारची Diwali Business Ideas In Marathi दिवाळी बिझनेस आयडिया आहे.

Diwali Business Ideas In Marathi

कपडे विक्री व्यवसाय Clothing sales business

दिवाळी सणा साठी लोक मोठ्या प्रमाणात नवनवीन कपडे खरेदी करतात. दिवाळी सणात घरातील लहान मुलांपासून ते महिला, पुरुष, वडीलधारी मंडळी सर्वांनाच नवीन कपडे घालायला आवडतात त्यामुळे बाजारामध्ये नवीन कपडे घेण्यासाठी मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसून येते.

10 Diwali Business Ideas In Marathi

आजकाल बाजारामध्ये तुम्ही पाहता अनेक लोक कपडे विक्री व्यवसाय करून लाखो रुपये कमावतात. तुम्ही पण दिवाळी सीजन मध्ये कपडे विक्री व्यवसाय करून चांगला नफा मिळू शकतात. किंवा दिवाळीत कपडे विकण्याचे कामही तुम्ही करू शकता.

तुम्ही ठराविक विक्रेत्यांकडून स्वस्त दरात कपडे खरेदी करू शकता. व स्टॉल लावून किंवा दुकानात कपडे विक्री हा व्यवसाय करू शकता .

तुम्हाला प्रत्येक प्रकारचे कपडे विक्री करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त महिलांच्या अनेक विविध प्रकारच्या साड्या, किंवा फक्त लहान मुलांचे कपडे किंवा फक्त पुरुषांचे शर्ट विक्री करू शकता.

10 Diwali Business Ideas In Marathi

मातीचे दिवे बनवा आणि विक्री करा Make and sell clay lamps

दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. दिवाळीत प्रत्येक घराबाहेर तुम्हाला मातीचे दिवे लावलेली पाहायला मिळतात. दिव्या शिवाय हा सण अपूर्ण वाटतो. दिव्या मुळे ह्या सणाला एक वेगळीच शोभा येते.

त्यामुळे या सणाच्या दिवसांमध्ये तुम्ही मातीचे दिवे बनवण्याचा किंवा विकण्याचा व्यवसाय करू शकता. या काळात तुम्ही विविध आकाराचे आकर्षक, रंगीबेरंगी, लहान, मोठ्या आकाराचे, मातीचे दिवे विकून चांगले पैसे कमवू शकता.

व्यवसायात वाढ आणण्यासाठी, तुम्ही विविध आकारांचे अधिक इको-फ्रेंडली दिवे विक्री करू शकता.

तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

10 Diwali Business Ideas In Marathi

फुले आणि फुलांच्या हारांची विक्री करू शकता Can sell flowers and flower garlands

भारतात सणांच्या काळात फुलांना खूप महत्त्व असते. कारण या काळात देवी देवतांना फुलांचे हार घातले जातात. व आपल्या घरांना देखील फुलांच्या माळा घालून सजवले जाते. या काळात अनेकजण फुलांची खरेदी-विक्री करून चांगले पैसे कमावतात. तुम्ही पण कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता.

दिवाळीत फुलांचे भावही खूप वाढलेले असतात. तुम्ही विविध फुलांचे हार विकण्याचा व्यवसाय करू शकता.

10 Diwali Business Ideas In Marathi

महिलांचे अनेक प्रकारचे दागिने विक्री Sale of various types of jewelery for women


दिवाळीच्या सणाच्या वेळेला महिलांना दागिने आणि इतर सामान खरेदी करायला खूप आवडते. हे कृत्रिम दागिने तुम्ही विक्रेत्यांकडून स्वस्त दरात खरेदी करून ते तुमच्या परिसरात विकू शकता.

फॅशन ज्वेलरी स्वस्त किमतीत उपलब्ध आहे आणि त्यामुळे गरीब महिलाही ते खरेदी करू शकतात.

10 Diwali Business Ideas In Marathi

भेटवस्तू विक्री व्यवसाय Gift sales business

दिवाळीच्या सणावर लोक एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्या भारतात आहे. आणि दिवाळीनंतरही अनेक सण आहेत ज्यात भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू( गिफ्ट )देतात.

त्यामुळे अनेकजण भेटवस्तू विकण्याचा व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे कमावतात.

तुम्ही देखील भेटवस्तू विकण्याचे काम करू शकता.
तुम्ही तुमच्या स्टॉल किंवा दुकानात आकर्षक भेटवस्तू विकू शकता.

10 Diwali Business Ideas In Marathi

पूजा साहित्य विकण्याचे काम Selling worship materials

दिवाळी सणात महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. व या धावपळीच्या जगात लोकांना पूजेसाठी रेडिमेड सामन वापरायला सोपे जाते. पूजेसाठी लागणारे साहित्य स्वत: गोळा करणे थोडे अवघड आहे, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पूजेसाठी लागणारे साहित्य रेडीमेड खरेदी करतात.

त्यामुळे तुम्ही दिवाळी सणाच्या वेळी लोकांना तयार पुजेचे साहित्य विक्री करू शकता. लोकांना सर्व पूजेसाठी लागणारे साहित्य एकाच ठिकाणी मिळते, त्यामुळे लोकांना त्याचा फायदाही होतो. व ते हवी ति किंमत देतात व तुमचा व्यवसाय देखील चांगला होतो.

10 Diwali Business Ideas In Marathi

मूर्ती विक्री व्यवसाय Idol selling business

भारताच्या संस्कृतीमध्ये दिवाळीच्या सणाच्या वेळेस देवी देवतांची पूजा केली जाते.
दिवाळीच्या काळात लोक लक्ष्मी देवीची आणि इतर आकर्षक मूर्ती व देवीचे फोटो पूजेसाठी खरेदी करतात. तुम्ही त्या मूर्ती बनवू शकता किंवा फोटो तयार करू शकता आणि ते तुमच्या स्टॉलवर किंवा सध्याच्या दुकानात विकू शकता.

दिवाळीत मूर्तींना खूप मोठी मागणी असते.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

दिवाळीमध्ये करा हे 10 व्यवसाय | 10 Diwali Business Ideas In Marathi या लेखात आम्ही दिवाळीमध्ये कोण कोणते व्यवसाय करू शकता या विषयी सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: