आमच्या पप्पांनी गणपती आणला Lyrics, Vdo Link, MP3 Download | Aamchya Pappanni Ganapati Aanla 2023

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर Aamchya Pappanni Ganapati Aanla | आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर धमाल रील वायरल होताना दिसत आहेत.

आमच्या पप्पांनी गणपती आणला असं गाणं म्हणत गोड हावभाव करत.एक चिमुकला इंस्टाग्राम वर प्रचंड फेमस झाला आहे.

शौर्या‌ घोरपडे आणि माऊली घोरपडे यांच्या आवाजातील मराठी गीत आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर एक छोटासा मुलगा आपल्या शरीराचे हावभाव करत अत्यंत गोड रील तयार केली.

Aamchya Pappanni Ganapati Aanla Boy Name

साईराज गणेश केंद्रे असे या लहान चिंमुकल्याचे नाव आहे. साईराज केंद्रे यांचे वडील गणेश केंद्रे यांनी 28 ऑगस्ट रोजी त्यांनी इंस्टाग्राम अकाउंट वरून रील शेअर केली. अवघ्या आठवडाभरात या रिलला 35 मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर एक मिलियन वेळा हा व्हिडिओ शेअर केला. व त्या व्हिडिओला 28 हजार पेक्षा जास्त कमेंट्स आलेल्या आहेत.

Aamchya Pappanni Ganapati Aanla Boy Name

गणेश केंद्रे हा चिमुकला या आठवड्याभरात इंस्टाग्राम व तसेच इतर सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसून येत आहे.

साईराज केंद्रे हा मुळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या गावचा रहिवाशी असून. कन्हेरवाडी येथे असलेल्या यश इंग्लिश स्कूल या इंग्लिश मीडियम शाळेत तो फर्स्ट क्लास मध्ये शिक्षण घेत आहे. त्याला डान्सची आवड असल्यामुळे त्याच्या वडिलांनी इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व त्याचा आमच्या पप्पांनी गणपती आणला या मराठी गाण्यावर त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व साईराज केंद्रे हा चिमुकला रातोरात स्टार झाला.

तसेच इंस्टाग्राम वरती साईराज गणेश केंद्रे या नावाने चिमुकल्याचे इंस्टाग्राम प्रोफाइल आहे.

साईराज गणेश केंद्रे यांचे प्रोफाइल लिंक

https://instagram.com/ganeshkendre7707?igshid=NjIwNzIyMDk2Mg==

साईराज केंद्रे यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती 301k एवढे फॉलोवर्स आहेत. व इंस्टाग्राम वर त्यांनी आतापर्यंत 28 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत.

तसेच साईराज नुकताच आपल्या महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेला. त्यांनी तिथे धनंजय मुंडे साहेबांसोबत गप्पा ही मारल्या व त्याने बनवलेल्या व्हिडिओचे कौतुक म्हणून मुंडे साहेबांकडून त्याला चॉकलेट गिफ्ट मिळाले.

लवकरच गणरायाचे आगमन येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणपती बाप्पांचे हे गाणे चांगलेच गाजत आहे. यासोबतच अनेक पालक आपल्या मुलांची याच गाण्यावर इंस्टाग्राम रिल्स तयार करत आहेत.

Aamchya Pappanni Ganapati Aanla या गाण्याची मूळ गायक शौर्य घोरपडे आणि माऊली घोरपडे या बहिण भावंडांनी 2022 मध्ये हे गाणे गायले पण तेव्हा त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नाही पण आता साईराज केंद्रे या चिमुकल्यामुळे या गाण्याला व त्या गाण्याचे गायक माऊली घोरपडे तसेच शौर्य घोरपडे यांना देखील प्रसिद्धी मिळाली.

Aamchya Pappanni Ganapati Aanla Lyrics

आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला

शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती
शंकर आणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपती

टुकुमुकू बघतोय चांगला

आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला

गळ्यात दादा घळतोय माळा
मम्मीनी बाप्पाला मोदक दिला
गळ्यात दादा घळतोय माळा
मम्मीनी बाप्पाला मोदक दिला

उंदीर मामांना नाही दिला

आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला

शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा अरे बाप रे बाप
शंकराच्या गळ्यात साप
किती मोठा अरे बाप रे बाप

भीती नाही वाटत का त्याला

आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला

मामानी बाप्पाला नमस्कार केला
बाबांनी आणली दूर्वा फूल
मामानी बाप्पाला नमस्कार केला
बाबांनी आणली दूर्वा फूल

शोभतो सुंदर धोतर अंगाला

आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला
आमच्या पप्पांनी गणपती आणला.

Aamchya Pappanni Ganapati Aanla

आमच्या पप्पांनी गणपती आणला Aamchya Pappanni Ganapati Aanla MP3 Download Link

https://pagalworlds.co/amche-pappani-ganpati-aanla/

Aamchya Pappanni Ganapati Aanla Youtube VDO Link

Amacya Pappanni Ganapati Aanla

राज्यभरातून अनेकजणांनी साईराज ला सदिच्छा भेट दिल्या आहेत. भेट म्हणजे दोन्ही प्रकारच्या आहेत. गिफ्ट पण आणि मोठमोठ्या सेलिब्रेटीज त्यांना देखील त्याला विझिट करण्याचा मोह आवारात नाहीये.

तर मित्रांनो वरील लेखनामध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: