जगाचा आणि संपूर्ण मनुष्य जातीचा रहाटगाडा सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्राचीन काळात कालगणना पद्धत सुरू करण्यात आली . आजच्या काळात देखील प्रत्येक स्तरावर गोष्टी या कालगणनेनुसार केल्या जातात. भारतीय कालगणनेनुसार या अधिक मासाच्या महिन्याला अधिक महत्त्व आहे. ज्यालाच आपण धोंड्याचा महिना असे देखील संबोधंल जातं याच महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. चला मग पाहूया Adhik Maas 2023 Marathi Information.
कालगणन नियमांनुसार चैत्र महिन्यापासून तर अश्विन महिन्यापर्यंत असलेला कुठला ही एक महिना अधिक मास महिना म्हणून येऊ शकतो.

Adhik Maas Marathi Information | अधिक महिना कधी येतो?
सर्वसामान्यपणे अधिक महिना हा तीन वर्षांनी येतो. चैत्रापासून तर फाल्गुन पर्यंत बारा महिन्यात 355 दिवस असतात आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सौर वर्षाचे दिवस 365 असतात. इहे दहा दिवस तीन वर्षांनी एकत्रित येऊन तीस दिवस झाल्यावर एक महिना अधिक फरक तयार होतो. या दोन्ही कालगणनेतील फरक काढून हे पुन्हा सारखे करण्यासाठी जो महिना चंद्र वर्षामध्ये टाकला जातो त्याला आपण अधिक महिना असे म्हणतो.
जाणून घ्या कर्णाने मारण्यापूर्वी श्रीकृष्णाला काय विचारले
वाचा श्रावण स्पेशल :- Upwas Recipe In Marathi
अधिक महिन्याचे वैशिष्ट्ये?
धार्मिक वैशिष्ट्ये
१) असं मानलं जातं की अधिक महिन्यात लोक मंगल कार्य, कामे, व्रते इत्यादीचा त्याग करतात.
२) त्यामुळे या महिन्याला ईहलोकात बाकीच्या महिन्याद्वारे द्वेषाला समोर जावे लागले. त्यांनी त्याला भरपूर चिडवले.
३) अधिक महिन्याने विष्णू देवाला गाऱ्हाणे ऐकवले. तेव्हा देव त्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला गोकुळात पाठविले. तो कृष्णाला शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून पुरुषोत्तम मास असे ठेवले.
४) आणि त्या महिन्याला असा आशीर्वाद दिला कि जो व्यक्ती निष्पाप वृत्तीने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ न ठेवता प्रेमळ हृदयाने तुझ्या कालावधी मध्ये व्रत उपासना करेल त्या व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
प्राचीन इतिहास-वैदिक वैशिष्ट्ये
अधिक महिन्याचे संदर्भ वेदिक साहित्यात आढळतात. वैदिक पंडित यांना लक्षात आले की चंद्र आणि सूर्य ही एक महत्त्वाची कालगणना यांच्या एकमेकांशी मिळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. इतकच नाही तर हे अंतर भरून काढण्यासाठी त्यांनी काही दिवस अधिक जोडण्यात आले. वेदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन ते चार वर्षाच्या अंतरात हे अधिक दिवस जोडण्यात आले. याच काळाच्या कालगणनेला अधिक महिना असे म्हणतात
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
खगोलशास्त्रीय महत्त्व
अधिक महिन्याचे खगोलशास्त्रा चे महत्व जाणले तर पृथ्वीच्या सभोवतालच्या प्रमाणामुळे सूर्य हा 12 राशीमधून प्रवास करतो असं लोकांचं म्हणन आहे. सूर्य प्रत्येक राशी मधून प्रवास करत असताना एक वर्ष पूर्ण करतो. त्याला 365 दिवस पाच तास 48 मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात.
मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले वर्ष हे १२ चांद्र मास (महिने) असतात. ते मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.
असे म्हणतात चंद्रमा आणि सूर्य यांची सांगड घालण्यासाठी अकरा दिवसांचा फरक असतो. इतकच नाही तर ते भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची विशिष्ट प्रकारची योजना तयार करण्यात आली आहे. दर तीन वर्षात होणाऱ्या त्या दिवसाचा फरक अधिक मास टाकून ही कालगणना जोडून घेण्यात आली आहे.
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
भारतातील प्रांतानुसार
भारताच्या सूर्याभित पंचांग पाळणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतात जसे की आसाम ओरिसा केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यात हा महिना पाळला जात नाही. तो फक्त चंद्र पंचांग वापरणाऱ्या विविध राज्यात जसे की आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सारख्या राज्यात पाळला जातो. यावरून हे सिद्ध होते की प्रत्येकाकडून निर्माण केलेल्या मासा चे महत्त्व तेथील राज्य पर्यंतच मर्यादित आहे
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या कॅलेंडरनुसार काही वेळा एका चंद्रमास सूर्याचे दोन संक्रांति येतात हे जरी शक्य असेल म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो असे का? नाही अजिबात नाही अशावेळी मार्गशीष पौष या महिन्यात अधिकमास कधीही येत नाही जसे की क्षमस येतात तेव्हा आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हा तरी थोड्या अंतराने दोन अधिक मास येतात आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या कॅलेंडरवरून हे सिद्ध होते
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
चैत्र ते अश्विन या महिन्यातच अधिक मास का येतो? याचे खगोलीय तसेच शास्त्रीय कारण काय आहे?
आपल्या महिन्याच्या तिथी चंद्रावर आधारित आहे. जसे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तसेच चंद्र देखील पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो आणि त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवस लागतात. आणि यालाच चंद्रमास असे म्हणतात.
जर सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेतील सांगड घातली नसती तर आपल्याला पावसात दिवाळी आणि उन्हाळ्यात जन्माष्टमी साजरी करावी लागली असती. अश्या प्रकारे सणांची आणि ऋतूंची साखळी बसण्यासाठी चैत्र ते अश्विन या महिन्यामधेच अधिक मास येत असतो.
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
अधिक मास महिन्यातील पूजा पाठ
१)अधिक मास याच महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते
२) या महिन्यात उज्जैन येथे यात्रा भरते
३) या महिन्याला विष्णू देवाचा महिना देखील म्हणून संबोधले जाते कारण या महिन्यात विष्णू देवाला विशेष महत्त्व दिले जाते आणि विष्णू देवाचे उपासना केली जाते
Adhik Maas 2023 Marathi Information
2023 यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून अधिक मास सुरू होईल एकच नाही तर 16 ऑगस्ट रोजी हा दिवस संपेल या महिन्यातील सगळं चांगली गोष्ट म्हणजे अधिक मास महिना सुरू होण्याआधीच 15 जुलैला श्रावण शिवरात्री संपेल आणि सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधनाचा हा बराच काळ वाट पाहणारा सण असतो पण या वेळेला त्याची वाट पाहायची गरज जास्त पडणार आहे साधारणता रक्षाबंधना बंधन जातो मात्र अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधनात 46 दिवसाच्या अंतर राहू शकते
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
समज किंवा गैरसमज :- काय करावे आणि काय करू नये?
१) या महिन्यात विवाह सोहळे करणे टाळावे
२) या महिन्यात हाती घेतलेले काम पूर्णत्वास येईलच असे नाही असे लोकांची मान्यता आहे
३) या महिन्यात कुठलंच काम यशस्वी होत नाही असे लोक म्हणतात.
४) या महिन्यात विवाह सोहळा केल्यास वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होत नाही असे मानले जाते.
घरामध्ये भांडण ईर्षा या महिन्यात निर्माण होऊ शकते म्हणून या महिन्यात विवाह सोहळे करणे टाळावे.
५) त्यामुळे सर्व बोलणी पूर्ण झाल्यावर विवाहासाठी शुभ मुहूर्त हा एक तर अधिक महिन्यापूर्वीचा निवडावा किंवा अधिक महिना संपल्यावर योग्य मुहूर्त पाहून विवाहाचे मंगलकार्य सिद्धीस न्यावे, असे सांगितले जाते.
७) या महिन्यात आर्थिक टंचाई होऊ शकते.
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
अधिक महिन्यात कोणते काम यशस्वी होतात असे मानले जाते?
१) या महिन्यात केलेले उपवास केलेले केलेला यज्ञ यशस्वी ठरते असं मानले जाते
२) या महिन्यात शुद्ध मनाने शुद्ध विचाराने विष्णूची पूजा केल्यास माणसाने केलेल्या पापाचा पृथ्वीवरच मोक्ष प्राप्त होतो आणि स्वर्ग प्राप्ती होते असे मानले जाते.
३) तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
धोंड्याचा महिना 3 वर्षांनीच का येतो ? Adhik Maas 2023 Marathi Information
अधिक मासात काय वाचावे ?
पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप करावा.