अष्टविनायक गणपती नावे व ठिकाण हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे | Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi 2023

अष्टविनायक म्हणजे गणेशाची 8 मंदिर आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्या सर्व मंदिरांची माहिती आज आपण Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi या article मध्ये पाहणार आहोत.
हिंदू धर्मातील प्रत्येकाला आवडणारे आणि आपल्या भक्तांच्या सर्व समस्यांपासून रक्षण करणारे ज्यांची पूजा हिंदू धर्मात अग्रगण्य मानली जाते. असे एकमेव भगवान म्हणजे गणेश. यांची महाराष्ट्रात अशी 8 मंदिरे प्रसिद्ध आहेत ज्यांना संस्कृत भाषेत “अष्टविनायक” या शब्दाने संबोधले जाते.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

  1. श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव
  2. चिंतामणी मंदिर, थेऊर
  3. सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
  4. महागणपती मंदिर, रांजणगाव
  5. विघ्नहर मंदिर, ओझर
  6. गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री
  7. वरदविनायक मंदिर, महड
  8. बल्लाळेश्वर मंदिर, पाली
अष्टविनायक गणपती नावे व ठिकाण | Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi 2023

आता आपण या अष्टविनायक मंदिरांची सविस्तर माहिती पाहूया.....

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(१)श्री मयुरेश्वर गणपती मंदिर


अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला मंदिर म्हणजे मयुरेश्वर गणपती मंदिर ज्याला श्री मयुरेश्वर या नावाने संबोधले जाते. श्री मोरेश्वर गणपती च्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवलेले आहेत. हे गणपती महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका छोट्याशा गावात म्हणजे मोरगाव येथे हे मंदिर आहे. मोरगाव हे ठिकाण बारामती पासून 35 km अंतरावर वसलेले आहे. प्रत्येक घरा-घरात म्हटली जाणारी “सुखकर्ता – दुःखकर्ता” ही गणपती ची प्रसिद्ध आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांना याच मंदिरात सुचली असे म्हटले जाते.

मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले दिसून येतात त्यासोबतच प्राचीन काळापासून मंदिराभोवती बुरुजसदृष दगडी बांधकाम केलेले आहे. आणि त्या मंदिराच्या जवळच एक कऱ्हा म्हणून नदी आहे. हे मंदिर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा या मंदिरापासून केवळ 17 km अंतरावर आहे. आणि हे श्री मयुरेश्वर गणपती मंदिर आदिलशहाच्या काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधलेला आहे.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(२) चिंतामणी मंदिर, थेऊर

अष्टविनायकांपैकी दुसऱ्या स्थानी असलेला गणपती मंदिर म्हणजे चिंतामणी मंदिर आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर या ठिकाणी कदंब वृक्षाखाली या चिंतामणी मंदिराचं ठिकाण आहे. भक्तांच्या साऱ्या चिंता हरून त्यांना आनंदात ठेवणारा हा गणपती आहे म्हणून याला चिंतामणी गणपती असे म्हणतात. चिंतामणी मंदिर हा पेशव्यांच्या काळातील आहे. त्यावेळी पेशवे हे सतत थेऊर ला येत असत. पेशवे गणेशाचे परम भक्त होते. त्यांनीच थेऊर चा विस्तार केला.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(३) सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

सिद्धिविनायक मंदिर मधील श्री सिद्धिविनायक गणपती हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. हा सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या गावातील आहे. हे गाव दौड पासून 19 km अंतरावर असून भीमा नदीवर वसलेले आहे. तिथे गणपती चा मंडप देखील खूप प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचं जीर्णोद्धार केलं होतं. या मंदिराभोवती पितळी मखर असून त्यावर सुर्य – चंद्र – गरुड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

(४) महागणपती मंदिर, रांजणगाव

अष्टविनायक मंदिरमधील चौथा गणपती म्हणजे महागणपती. अष्टविनायक गणपती मधून हा सर्वात शक्तिमान गणपती आहे त्यामुळे याला महागणपती असे देखील म्हणतात. या गणपती चे मंदिर पुणे-अहमदनगर मार्गावरील शिरूर तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणी आहे. हे गणपती उजव्या सोंडेचे असून ते कमळावर बसलेले आहे. माधवराव पेशवे यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला अशी इतिहास माहिती लिहिली आहे. शिवाय इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण करून मंदिरामध्ये लाकडी सभामंडप बांधून दिला असा देखील इतिहासात उल्लेख आढळतो.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi 2023

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(५) विघ्नहर मंदिर, ओझर

अष्टविनायक मंदिरांमधील पाचवा गणपती म्हणजे विघ्नहर मंदिरातील श्री विघ्नेश्वर आहे. हे गणपती अष्टविनायक गणपती मधून सर्वात श्रीमंत गणपती मानले जाते. आणि हे गणपती आपल्या भक्तांचे सर्व विघ्न दुर करते त्यामुळे त्याला विघ्नहर्ता किंवा श्री विघ्नहर असे म्हणतात. हे मंदिर कुकडी नदीच्या काठी वसलेले असून त्या मंदिराच्या भोवताली तटबंदी आहे आणि मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर जागृत स्थान आहे असे मानले जाते. ह्या मंदिराचे जीर्णोद्धार थोरले बाजीराव पेशव्यांनी केले असे इतिहासात उल्लेख आहे. या मंदिराजवळच आर्वी उपग्रह केंद्र आणि खोदड येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या किल्यावर जन्म झाला तो शिवनेरी किल्ला सुद्धा आहे.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(६) गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्री

अष्टविनायक मंदिरांमधील सहावं स्थान ज्या मंदिराचं येतं ते म्हणजे गिरिजात्मक मंदिर जे जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या ठिकाणी आहे. हे मंदिर शिवनेरी किल्याच्या सानिध्यात आणि कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर वसलेले आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडावर कोरलेली असून मंदिरात दगडी खांब आहेत आणि त्यावर सिंह, वाघ आणि हत्ती यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. या मंदिरात जाण्यासाठी डोंगरापर्यंत सुमारे 400 पात्रता बनविलेल्या आहेत. हे लेण्याद्री जुन्नर पासून 7 km अंतरावर असून पुणे पासून 97 km अंतरावर आहे.

(७) वरदविनायक मंदिर, महड

अष्टविनायक मंदिरांमधील सातव्या स्थानावर येणारे वरदविनायक मंदिर हे रायगड जिल्ह्यातील महड येथे वसलेले आहे. या मंदिराला मठ असेही म्हटले जाते. श्री वरदविनायकाचे मंदिर हे साधे आणि कौलारू चे असून घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे.

Ashtavinayak Ganpati Names And Places In Marathi

(८) बल्लाळेश्वर मंदिर, पाली

बल्लाळेश्वर मंदिर मधील श्री बल्लाळेश्वर गणपती चे मंदिर हे अष्टविनायक मंदिरांमधील आठवे आणि शेवटचे मंदिर आहे. या गणेशाचे कपाळ खूप विशाल असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. हे मंदिर चिरेबंदी असून त्यात प्रचंड मोठी घंटा आहे. ही घंटा चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. श्री बल्लाळेश्वर गणपती चे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड या तालुक्यातील पाली या ठिकाणी अंबा नदीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. पालीपासून जवळच उन्हेरेचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा किल्ला आहे.

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

Conclusion:-
मित्रांनो, आम्ही तुम्हाला आजच्या Ashtavinayak Ganpati Names and Places in Marathi या Article मधून अष्टविनायक मंदिरांची नावे आणि त्यांचे ठिकाण तुमच्या आमच्या मराठी या भाषेतून सांगण्याचा प्रयत्न केलो आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते Comment करून नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करायला विसरू नका.

धन्यवाद….

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: