पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

माणसांप्रमाणे पुस्तक देखील बोलू लागले तर ? काय असेल त्याचे आत्मकथन? Autobiography Book In Marathi
जाणून घेऊयात पुस्तकाचे आत्मकथन.

Autobiography Book In Marathi

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

मी नुसता कोरा कागदच नाही मी तर हजारो विद्यार्थ्यांची एक आशा आहे. अनेक कवी विचारवंतांची मी अबोल भाषा आहो
हा बरोबर ओळखलं तुम्ही मी तुम्हा सर्वांचा सखा, सहारा, तुमचा मित्र आहे.

नमस्कार मित्र मंडळ मी आहे पुस्तक माझ्याबद्दल तर तुम्हा सर्वांना जास्त माहिती आहे. पण आज मी तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल माझ्या मनातील काही गोष्टी सांगणार आहे. खरंतर तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा तुम्हा सर्वांचा योग्य मार्गदर्शक मला म्हटले जाते. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर हे माझ्यात सापडते मला लिहिण्यासाठी कित्येक कवी विचारवंत हे पुस्तकाचे वाचन करतात. आणि नंतर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करतात. माझ्यामुळे अनेकांचे विचार बदलते. त्यांना वाचनाची आवड लागते, त्यांच्यामध्ये ज्ञान संपादन होते .ते ज्ञानी होतात. अनेक लोक मला वाचण्याचा कंटाळा करतात. पण मग त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम सुद्धा मीच करतो. जर एखादा विद्यार्थी जीवनामध्ये काही करण्याच्या जिद्दीत असतो. तेव्हा मी त्याचा सखा, सहारा ठरतो त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या योग्य दिशा दाखवतो त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतो.

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

माझ्यापासून लोक ज्ञानाचे प्राप्ती करतात. आणि त्यांच्या आयुष्याची वाटचाल करतात. हे बघून मला खूप आनंद होतो. तर कुणाला माझी किंमत नसते माझ्यावर असलेली धूळ ही ते झटकत नाही. कधी कधी त्या गोष्टीच मला वाईट वाटतं पण मग मी विचार करतो की कधीतरी त्या लोकांना माझी किंमत कळेल.

खरंतर मला पाहण्यासाठी तुम्ही मोठ मोठ्या ग्रंथालयात जाऊ शकता. माझे विविध प्रकार तुम्हाला दिसून येईल ,अनेक प्रकारची पुस्तके तुम्हाला तिथे अगदी मनापासून वाचायला मिळतील.

पुस्तकाचे आत्मवृत्त

कवी लेखक माझ्या साह्याने त्यांच्या विचाराची मांडणी करतात माझ्या मदतीने ते मोठमोठे भाषणे देऊ शकतात मला वाचल्यानंतर त्या विद्रोही कविता लिहू शकतात तर मला वाचूनच ते समाजाचे कल्याण करू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये माझं असणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटत नाही का?
आणि म्हणूनच मी तुमचा सखा, सोबती, मित्र सर्वच आहे.

जसं लहान मुलांना लहानपणी त्यांची चांगली वाढ होण्यासाठी पौष्टिक आणि चांगला आहार दिला जाते. त्याच प्रकारे तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या विचारांची वाढ करण्यासाठी माझा उपयोग केला जातो. खरं तर माझे विविध रूपे आहे पण मी कधीच कुठल्याच प्रकारचा भेद करत नाही. प्रत्येकासाठी मी समान आहे मला कोणीही वाचू शकतो लहान ,मोठा ,वृद्ध तर कधी तरुण.

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

मी तरुणांचा आवडता विषय आहों.पण समाजामध्ये आजकाल बघतो आहे की, सर्व मोबाईल मध्ये गुंतून असल्यामुळे माझी किंमत थोडी कमी झाली आहे. मात्र माझ्यामध्ये असलेल्या ज्ञान हे कधीच कमी होणार नाही. आणि जेव्हा हे तरुण अवस्थेतील मुलांना कळेल तेव्हा ते माझ्याकडे नक्कीच धाव घेईल. आज काल मी एकाच जाग्यावर पडलेला दिसतो. पण काही माझी वाचक मित्र ते येऊन मला वाचतात .माझ्याशी घट्ट मैत्री करतात. आणि त्यांची मैत्री मी शेवटपर्यंत पुरवतो. कारण माझ्या मध्ये असलेल्या ज्ञानाचा साठा मी त्यांना देतो आणि ते मला त्यांचा वेळ देतात.

माझी विविध प्रकारची रूपे आहेत. मी प्रत्येकासाठी समान जरी असलो ,तरी मला वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर केले जाते. आणि ज्या व्यक्तीला ,ज्या लोकांना, जी भाषा सहज कळते त्या भाषेमध्ये ते रूपांतरीत करीत असतात.आणि मला सहज वाचून घेतात जसे ,की हिंदू लोकांसाठी मी आहे महाभारत, रामायण, यासारखी सर्वांना सहज उपलब्ध असणारी माझी रूपे ,मात्र मुस्लिमांसाठी मी कुराण आहे. कुराणाच्या माध्यमातून मुस्लिम मला पठण करतात .आणि माझ्या प्रत्येक दाखवलेल्या मार्गावर सहज चालतात. इतकच नाही तर मी ख्रिश्चनांसाठी बायबल आहे ,तर शिक या लोकांसाठी मी गुरु ग्रंथ साहीब आहे.

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

मला खूप आनंद होतो, जेव्हा लोक माझ्या तत्त्वांवर चालतात. वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गांचा अवलंब करतात .मी लोकांना एक महत्त्वपूर्ण दिशा, वाट आणि त्यांचं उज्वल भविष्य देण्यासाठी कार्यरत असतो.

मला बनवण्यासाठी कित्येक लोक मेहनत घेत असतात .तुम्हाला माहिती आहे ? मला बनवण्यासाठी हजारो झाडांना बलिदान द्यावा लागतो. त्यांच्या बांबूपासून कागद तयार होतो. तयार झालेला कागद पुस्तक बनवण्यासाठी प्रिंटिंग करावा लागतो आणि नंतर तयार होतो तो मी.

शास्त्रज्ञ, आयपीएस अधिकारी ,मोठमोठे विचारवंत हे मला वाचूनच यशाची शिखरे गाठतात. एवढेच नाही तर मी निराश असलेल्या व्यक्तीमध्ये आशेची किरण निर्माण करतो .त्यांना त्यावेळेला आधार देऊन पुढे होत असलेल्या भविष्याची कल्पना देत असतो. तुम्ही जर माझी शेवटपर्यंत साथ दिली तर, मीही तुम्हाला अजिबात सोडत नाही. तुम्ही नित्य नियमाने मला पठण करत राहिले ,मला वाचत राहिले ,तर मी तुमचा वेळ व्यर्थ जाऊ देत नाही. कारण माझ्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे. आणि तो खजिना मला वाचल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून जेवढा वेळ तुम्ही मला देता तेवढाच वेळ मी तुमच्या मेंदूमध्ये ज्ञान भरत जातो.

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

Air Pollution Information in Marathi

Balgangadhar Tilak Information In Marathi

Essay on dushkalgrast shetkari

पुस्तकाचे आत्मवृत्त 2023 | Best Autobiography Book In Marathi

Leave a Reply

%d bloggers like this: