बाबा आमटे संपूर्ण माहिती | Baba Amte Information in Marathi 2023

समाज कल्याणासाठी वाहून घेणारे समाजसेवक, “आनंदवन” चे संस्थापक कृष्टरोग्यांचे पालनहार बाबा आमटे यांच्याबद्दल Baba Amte Information in Marathi मध्ये माहिती घेऊया.

Baba Amte Information in Marathi

बाबा आमटे संपूर्ण माहिती | Baba Amte Information in Marathi 2023

डॉ. मुरलीधर देवीदास आमटे” असे आहे. त्यांचा जन्म 26 December 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव “देवीदास आमटे” होते. ते लेखपाल होते आणि यासोबतच ते एक जमीनदार देखील होते. बाबा आमटे हे जमीनदार घराण्यातील असल्यामुळे त्यांचे बालपण अतिशय सुखात आणि सोयीत गेले. ते त्यांच्या बालपणी अगदी राजकुमारासारखे राहत होते. ज्यांनी ज्यांनी बाबा आमटे यांना नंतर बघितले असणार त्यांनी त्यांचे बालपणीचे फोटो बघितले तर खरचं ते आश्चर्यचकीत होऊन जातील.

Baba Amte यांचे शिक्षण

Baba Amte यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर मधील मिशन स्कूल मधून पूर्ण केले. इ. स. 1934 साली त्यांनी नागपूर विद्यापीठातून B.A. ची पदवी प्राप्त केली. त्यांना Doctor व्हायचे होते परंतु वडिलांच्या आग्रहामुळे त्यांना वकिली चे शिक्षण घ्यावे लागले त्यामुळे त्यांनी B.A. ची पदवी प्राप्त झाल्यानंतर इ .स. 1936 साली नागपूर विद्यापीठ मधूनच L.L.B. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ वकिली केली आणि त्यानंतर इ. स. 1949 ते 1950 च्या कालावधी मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान “पंडित जवाहरलाल नेहरु” यांच्या शिफारशीमुळे त्यांनी Doctor यांना करता येणारा कृष्ठरोग निदानाचा आणि चिकित्सेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

Baba Amte यांचे लग्न

साधनाताई गुळेशास्त्री यांना एका लग्न समारंभाला सोडून एका वयस्कर व्यक्तीची मदत करायला धावतांना बाबांनी बघितलं आणि त्यांची हीच मदत करायची वृत्ती बाबांना खूप भावली आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलं. म्हणून बाबा हे त्यांच्या वडिलांच्या घरी साधनाताई चा हाथ मागायला गेले आणि त्यांच्या वडिलांनी देखील लग्नास होकार दिला. त्यामुळे त्यांनी इ. स. 1946 साली त्यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत एकाचे नाव विकास आमटे तर एकाचे नाव प्रकाश आमटे असे आहे.

Baba Amte यांचे कार्य

Baba Amte यांनी वकिली सोबतच इतर विषयांचा देखील अभ्यास केला होता. त्यांनी स्थानिक पातळीवर वकिलीचे काम केले आणि त्यासोबतच त्यांनी भारतातील अनेक ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या. भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना असे कळले की आपला भारत खरचं आज जीर्ण अवस्थेत जात आहे. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जात होता त्यामुळे बाबा आमटे यांनी आपले मित्र राजगुरू यांचा साथ सोडून महात्मा गांधी यांच्या सोबत जाऊन अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला.

गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली. पुढे विनोबा भावे यांच्या प्रभावाने त्यांनीही ठिकठिकाणी जमीन “सुधारणा चळवळ” सुरू केली.

त्या वेळी समाजात कृष्ठरोग हा सामाजिक कलंक होता. ज्यांना कृष्ठरोग होत होता त्यांना समाजातील लोकं वाळीत टाकले जायचे. हे बघून त्यांनी अशा या खोट्या अफवांविरुद्ध आवाज उठवून स्वतः कृष्ठरोगांची मदत करीत होते. बाबा आमटे व त्यांची पत्नी साधना आमटे यांनी 15 ऑगस्ट 1949 रोजी वरोऱ्या जवळ एका झाडाखाली कृष्ठरोगींच्या साठी एक hospital चालू केले.

पुढे त्यांना त्याच जागेवरची 50 एकर जमीन सरकार कडून आश्रम बांधण्यासाठी मिळाली. त्यांनी 1952 मध्ये सरकारकडून मिळालेल्या 50 एकर जमिनी मध्ये 6 कृष्ठरोगी, 14 रुपये रोख, एक आजारी गाय यांच्यासोबत त्यांची पत्नी साधना आमटे यांच्या साथीने एक आश्रम बांधले. व त्या आश्रमाचे नाव “आनंदवन” असे ठेवले.

इ. स. 1949 रोजी महारोगी सेवा समितीची स्थापना करून त्यांनी जसं ”आनंदवन आश्रम” स्थापित केले त्याचप्रमाणे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे सोमनाथ प्रकल्प, नागपूर मध्ये अशोकवन आणि हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प स्थापित केले. गेल्या 35 ते 36 वर्षापासून या सर्व प्रकल्पांची जबाबदारी त्यांचे कनिष्ठ सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे हे समर्थ पणे सांभाळत आहेत.

या सोबतच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनाथालय असे प्रकल्प देखील हेमलकसा येथे आजही चालू आहेत. हे सर्व बाबा आमटे यांच्या प्रेरणेमधूनच शक्य झाले. बाबा आमटे हे फक्त समाजकार्यात च नाही तर साहित्य क्षेत्रात देखील सक्रिय राहून त्यांनी अनेक काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत.

Baba Amte यांचे निधन

आपल्या भारताला लाभलेले असे थोर समाजसुधारक आणि आधुनिक भारताचे संत Baba Amte यांना Blood Cancer झाला आणि त्यातच त्यांचा 9 फेब्रुवारी 2008 रोजी वरोडा येथे त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. आणि फक्त आनंदवन मध्येच नाही तर संपूर्ण भारतभर शोककळा पसरली.


Kalpana Chawala Information in Marathi


Baba Amte यांचे साहित्य

 1. ज्वाला आणि फुले – कवितासंग्रह
 2. उज्ज्वल उद्यासाठी (काव्य)
 3. माती जागवील त्याला मत’

Baba Amte यांच्यावरील पुस्तके

 1. आनंदवन प्रयोगवन
  लेखक – डॉ. विकास आमटे
 2. मला (न) कळलेले बाबा आमटे
  लेखक – विलास मनोहर
 3. बाबा आमटे (चरित्र)
  मूळ लेखिका – तारा धर्माधिकारी
  हिंदी अनुवाद – डॉ. हेमा जावडेकर
 4. बाबा आमटे (चरित्र)
  लेखक – भ.ग. बापट
 5. बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद
  लेखक – बाळू दुगडूमवार
  (या पुस्तकाला 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)
 6. वादळ माणसाळतंय (नाटक)
  लेखक – वसंत कानेटकर
 7. बाबा आमटे – व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व
  लेखक : बाळू दुगडूमवार

Baba Amte यांना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 1. 1999 – डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  (सामाजिक सुधारणे साठी)
 2. रॅमन मॅगसेसे पुरस्कार
 3. 1983 – डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका
  (कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी)
 4. 1998 – संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार
 5. 1989 – आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका
 6. 1990 – टेंपल्टन बहुमान, अमेरिका
  (मानवतावादी कार्यासाठी)
 7. 1991 – संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर
  (पर्यावरण विषयक कामासाठी)
 8. 1981 – ग्लोबल ५०० पुरस्कार
  (पर्यावरण विषयक कामासाठी)
 9. 1991 – राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन
  (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे )
 10. 2004 – पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार
 11. 26 December 2018 – गूगल ने बाबा आमटे (त्यांच्या जयंतीच्या दिवशी) यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Baba Amte यांना मिळालेले भारतीय पुरस्कार

 1. 1971 – पद्मश्री पुरस्कार
 2. 1986 – पद्मविभूषण पुरस्कार
 3. 1986 – अपंग कल्याण पुरस्कार
 4. 1998 – महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुलॆ पुरस्कार
 5. 1999 – गांधी शांतता पुरस्कार
 6. 2004 महाराष्ट्र भूषण पुरस्कार
 7. 1985 – मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार
 8. 1986 – पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
 9. 1974 – महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार
 10. 1978 – राष्ट्रीय भूषण पुरस्कार
 11. 1979 – जमनालाल बजाज पुरस्कार
 12. 1980 – एन डी दिवाण पुरस्कार
 13. 1987 – राजा राम मोहनराय पुरस्कार
 14. 2008 – भरतवास पुरस्कार
 15. 1988 – जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार
 16. 1991 – महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार
 17. 1998 – कुमार गंधर्व पुरस्कार
 18. 1998 – जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक
 19. 1980 – डी.लिट – नागपूर विद्यापीठ पुरस्कार
 20. 1985 – डी. लिट. – पुणे विद्यापीठ पुरस्कार
 21. 1988 – देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल

FAQ’s

 1. बाबा आमटे यांचा मृत्यू कधी झाला?
  Baba Amte यांना Blood Cancer झाला आणि त्यातच त्यांचा 9 फेब्रुवारी 2008 रोजी वरोडा येथे त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.
 2. बाबा आमटे कशासाठी प्रसिद्ध आहेत?
  बाबा आमटे हे कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत.
 3. बाबा आमटे यांच्या प्रकल्पाचे नाव काय आहे?
  आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
  सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)
  अशोकवन – नागपूर
  लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

बाबा आमटे यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.
आयुष्य लंगडत नाही तर उडी मारून जगावे
दुःखात असलेल्या माणसाला फक्त आणि फक्त प्रेमानेच जिवंत करता येते.

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

Avatar
Marathi Time

3 thoughts on “बाबा आमटे संपूर्ण माहिती | Baba Amte Information in Marathi 2023”

Leave a Reply