परदेशी मालाला विरोध करत करत हुतात्मा झालेल्या बाबू गेणू यांची आज आपण Babu Genu Information In Marathi या Article मध्ये माहिती पाहणार आहोत.
ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यातलेच असे एक क्रांतीवीर ज्यांनी मुंबईत येणाऱ्या परदेशी मालाला विरोध करण्यासाठी आपल्या प्राणाची देखील तमा न राखणारे आणि आपल्या प्राणाची हसत हसत आहुती देणारे स्वातंत्र्यवीर “बाबू गेणू” हे आहेत.
Babu Genu Information In Marathi

Babu Genu यांचा पूर्ण नाव ”बाबू गेणू सैद” असे आहे. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1908 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यातील महाळुंगे पडवळ या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांची झोपडी गावातच एक सैद वाडी आहे त्यातच त्यांचं जन्म आणि बालपण सुद्धा गेलं. ते लहानपणापासूनच शाळा चालू असतांनाच शेती सुद्धा करीत होते. त्यावेळी त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यातच ते फक्त 10 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांना प्लेग च्या रोगाने जखडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची आई ही मुंबई मध्ये आपल्या भावाकडे राहायला आली त्यांच्यासोबतच बाबू गेणु हे सुद्धा मुंबई मध्ये आले आणि त्याच शहरामधील एका सुत गिरणी मध्ये काम चालू केले.
त्यावेळी मुंबई मध्ये सुत गिरणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता. यांचा मुंबई मध्ये येण्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे त्यांना मुंबई मध्ये स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा होता. आणि तिथे त्यांनी महात्मा गांधी यांनी चालविलेल्या असहकार चळवळीत अगदी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये त्यांना त्यांच्या गावचा मित्र प्रल्हाद राऊत यांनी साथ दिली.
स्वातंत्र्य चळवळीत भाग
बाबू गेणू हे जेव्हा सुत गिरणी मध्ये काम करीत होते त्यावेळी तिथे ब्रिटिश सरकार ची सत्ता होती. हे ब्रिटिश सरकार त्यावेळी परदेशी बनावटी कापडांची आयात करीत होते. परंतु बाबू गेणू हे विदेशी बनावटीच्या कापडांच्या विरोधात होते. म्हणून ते भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आयोजित केलेल्या निषेधात सहभागी झाले.
मॅचेस्टर जॉर्ज प्रेझियर हे एक कापड व्यापारी होते आणि त्यांनी 12 डिसेंबर 1930 साली किल्यामधील जुन्या हनुमान गल्ली मधील एका दुकानातून परदेशी बनावटीचे कापड मुंबई बंदराजवळ नेत होते. आणि त्याने विनंती केल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलेले होते. परंतु या स्वातंत्र्य सैनिकांना परदेशी माल हा भारतामध्ये येऊ द्यायचा न्हवता त्यामुळे त्यांनी ट्रक न हलवण्याची विनंती केली. परंतु त्यांची विनंती न ऐकता सर्व आंदोलन करणाऱ्या सैनिकांना बाजूला करून ट्रक तिथून हलविला गेला.
त्यांचा परदेशी मालाचा ट्रक नंतर काल्देवी रोडवर आला. त्यावेळी बाबू गेणू हे ट्रक ला आडवे उभे झाले. आणि महात्मा गांधीचा जयजयकार करीत होते. या प्रकारच्या अहिंसक आंदोलनामध्ये पोलिसांनी शारीरिकदृष्ट्या रोखत असतांना देखील ते घाबरले नाही आणि त्यांनी त्यांचा संकल्प सोडला नाही आणि ते त्या ट्रक च्या समोरून हलले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अंगावरून ट्रक चालविण्याचे आदेश दिले. त्यावेळी त्या ट्रक चे चालक बालवीर सिंग हे एक भारतीय होते आणि त्यांनी यांच्यावरून ट्रक चालविण्यास नकार दिला. परंतु इंग्रज पोलीस सरकार च्या अधिकाऱ्याने स्वतः ट्रक ड्रायव्हर च्या सीटवर बसून ट्रक बाबू गेणू यांच्या अंगावरून चालविला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
असे झाले हुतात्मा

बाबू गेणू यांनी देशासाठी ज्या दिवशी आहुती दिली तो दिवस 12 डिसेंबर 1930 होता त्यावेळी त्यांचे वय मात्र 22 वर्षे होते. त्यांच्या अंत्यसंस्कार मुंबईतील सोनापुर स्मशानभूमीत करण्यात आले त्यावेळी तिथे 20 हजार लोकांचा जमाव होता. त्यांच्या मृत्यू नंतर स्वातंत्र्य सैनिकांनी संप, संताप करून निषेध व्यक्त केला. परंतु ब्रिटिश सरकारने ही घटना अपघात म्हणून एक प्रेस नोट जारी केला.
त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घराची झळती घेण्यासाठी गेले असता त्या गावातील एकानेही त्यांच्या घराचा पत्ता सांगितला नाही. गावातील त्या लोकांचे प्रेम बघून बाबू गेणू यांची भावजय कासाबाई यांना कृतज्ञता वाटत होती.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने त्यांनी देशासाठी दिलेल्या आहुती मुळे त्यांच्या परिवारातील त्यांच्या पुतण्या यांना 200 रुपये मानधन देण्याचे जाहीर केले होते परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बरी असल्यामुळे त्यांनी ते नाकारलं आणि ते मानधन देशकार्यात सहकार्यात सहभाग घेणाऱ्या परीबेन यांनी मिळावी अशा सूचना दिल्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन परीबेन यांना ते मानधन जाहीर करण्यात आले. हा मनाचा दुर्मिळ मोठेपणा बाबू गेणू यांच्या पुतण्याने दाखविला होता. खरचं पुतण्या म्हणून ते खरोखर पात्र होते असे मला वाटते.
बाबू गेणू कुठे हुतात्मा झाले?
परदेशी कापड आयात करणाऱ्या ट्रकाला आडवे होऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. तो दिवस 12 डिसेंबर 1930 होता. त्यांच्या अंत्यसंस्कार मुंबईतील सोनापुर स्मशानभूमीत करण्यात आले त्यावेळी तिथे 20 हजार लोकांचा जमाव होता.
बाबू गेणू हे हुतात्मा झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते.
बाबू गेणू हे हुतात्मा झाले त्यावेळी त्यांचे वय मात्र 22 वर्षे होते.
बाबू गेणू यांचे जन्मस्थान कोणते?
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील महाळुंगे हे त्यांचे जन्मस्थान आहे.
स्वदेशी दिन म्हणजे काय?
बाबू गेणू यांनी स्वदेशी मालासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे 12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

समाप्त