बैलपोळ्याची खरी कथा काय? का पार्वती मातेने दिला बैलाला श्राप? Bailpola Information in Marathi जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Bailpola Information in Marathi
माणसाचा खरा सारथी हे बैलाला म्हटलं जातं. कारण शेतीमध्ये अन्न पिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणी पार पाडत असेल, तर तो कधी न बोलणारा पण त्याच्या मेहनतीने सर्वांची बोलती बंद करणारा एकमेव बैल असतो.
खरंतर त्याचे कष्ट हे अपार असतात. माणूस हा माणसांमध्ये राहूनही कधी इमानदारी सोडेल सांगता येत नाही. मात्र जनावर असे असतात की, ते कधीही इमानदारी सोडत नाही. माणसापेक्षा पशूंची मैत्री ही कधीही योग्यच ठरते.

खरंतर आपली भारतीय संस्कृती हे खरंच जगा वेगळी आहे. कारण आपण पोळा हा सण साजरा करतो .खरं तर पोळा या सणाचे महत्त्व म्हणजे शेतामध्ये राब राबणारा शेतकरी हा बैलाची मदत घेऊन अख्या जगाला अन्न पुरवण्याचं काम करतो. आणि त्याला क्षणोक्षणी साथ देणारा हा बैल या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पोळा हा सण साजरा करतो. शेतकरी आणि गावामध्ये असलेले लहान मुलं या सणाची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी कुठल्याच बैलाला कडून कुठलंच काम करून घेतले जात नाही. या सर्वात महत्त्वाच्या दिवशी बैलाची स्वच्छ पाण्याने तळ्यावर किंवा ओढ्यावर आंघोळ करून दिली जाते. शेतकरी हा त्याच्या हाताने त्याला स्वच्छ करतात.
एवढेच नाही तर त्याला सजवले जाते. त्याच्या दोन्ही शिंगांना रंगाने रंगवलं जाते. रंगेबिरंगी बेगड लावले जाते. त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके लावले जातात. त्याच्या पाठीवर आकर्षक अशी झालर ठेवून प्रत्येकाचे मन बैलाकडे आकर्षित व्हावे यासाठी हा सर्व प्रयत्न केला जातो. ज्याप्रकारे लग्नामध्ये नवरदेवाला सजवले जाते त्याच प्रकारे बैलाला देखील डोक्यावर सुंदर असं बाशिंग बांधले जाते. म्हणजेच शेतकरी या दिवशी त्याच्या बैलाला सुंदर सजवून बाशिंग बांधून अगदी नवरदेवासारखं सजवतात.
त्यादिवशी बैलासाठी विविध प्रकारचे नैवेद्य केले जातात. त्यामध्ये भात ,पुरणपोळी या सर्व पदार्थांचा समावेश होतो. गावामध्ये बैलांची स्पर्धा आयोजित केली जाते. ज्या मालकाचा बैल सुंदर दिसतो ,त्या मालकास विविध प्रकारचे बक्षीस दिले जाते. त्यानंतर बैल पोळा सजवून तेथील तोरण कापून बैलपोळा फोडला जातो .त्या पोळ्यामध्ये हजर असलेल्या सर्व लोकांना शेतकरी आमंत्रित करतो. त्याच्या घरी त्याची पूजा केली जाते बैलाला टोपलीमध्ये जेवण दिले जाते .आणि बैलाचा जो कोणी मालक असेल त्याला त्या दिवशी बाजार दिला जातो.

बैलपोळा याची नेमकी कथा काय?
एकदा शिव पार्वती हे चौरसाचा खेळ खेळत होते. या खेळामध्ये मात्र पार्वती माता जिंकल्या, तरी सुद्धा महादेव स्वतः जिंकण्याचा दावा करत होते. या खेळाच्या उपस्थितीमध्ये तिथे फक्त नंदीबैल उपस्थित होते त्यामुळे पार्वती मातेने नंदी बैलाला विचारले की खेळामध्ये कोण जिंकले,
तेव्हा मात्र नंदि बैलाने शंकर देवाचे नाव घेतले, या गोष्टीवर माता पार्वती रागावल्या त्या भयंकर क्रोधीत झाल्या. आणि या खोटं बोलण्यासाठी त्यांनी नंदीला श्राप दिला. या श्राप मध्ये त्या म्हणाल्या की तू, पृथ्वीवर जीवन जगशील तुझं जीवन हे सामान्य नसणार तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. तुझ्या मानेवर नेहमीच नांगर राहील. माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून नंदी घाबरले आणि त्यांच्या चुकीची ते क्षमा मागू लागले.
त्यावर माता-पार्वतीने त्याला म्हटले की तू तिथे जीवनभर कष्ट करत राहशीलच मात्र शेतकरी तुला एक दिवस देव म्हणून पूजा करतील. त्या दिवशी तुझ्या त्या मानेवर नांगर राहणार नाही. असं म्हटलं जाते, तेव्हापासून नंदी बैल पृथ्वीवर वास करतात आणि शेतकर्यासोबत जमीन कसतात. त्यांच्या कष्टाची आठवण म्हणून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
का पार्वती मातेने दिला बैलाला श्राप ? Best Bailpola Information in Marathi 2023
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Read More