बाई पण भारी देवा ने गाठला 50 कोटी क्लब | Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे

Baipan Bhari Deva Review Marathi Movie हा असा चित्रपट आहे कि जो पोटधरून हसायलाही लावतो आणि डोळ्यातून पाणीही आणतो. वाचा का झालाय हा इतका फेमस.

मराठी चित्रपटसृष्टीत अलिकडच्या वर्षांत उल्लेखनीय वाढ झाली आहे, ज्यांनी प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या विविध प्रकारच्या कथा सादर केल्या आहेत. या सिनेमॅटिक रत्नांपैकी “बाई पण भरी देवा.” हा मराठी चित्रपट आहे. या लेखात, आम्ही “बाई पण भरी देवा” च्या दुनियेचा शोध घेणार आहोत, त्याचे कथानक, उल्लेखनीय कामगिरी आणि त्याचा मराठी सिनेमावर होणारा परिणाम.

Baipan Bhari Deva Review बाई पण भारी देवा

“बाई पण भरी देवा” हे सहा धैर्यवान आणि लवचिक स्त्रियांच्या जीवनाभोवती फिरते, ज्याची भूमिका प्रतिभावान कलाकारांनी केली आहे. हा चित्रपट त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन करतो, ज्यांन असंख्य आव्हाने आणि सामाजिक नियमांचा सामना करावा लागतो परंतु सशक्तीकरण आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून त्या सर्व उदयास येतात.

Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे बाई पण भारी देवा

बाई पण भारी देवा या चित्रपटामध्ये असं काय आहे की लोकांनी थेटरमध्ये गर्दी केली ? इतकच नाही तर महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातले आहे? काही दिवसातच या चित्रपटाने ५० कोटी रुपये या चित्रपटाची कमाई केली आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात.

एका साधारण कुटुंबात घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये सहज आणि एकदम हसऱ्या पद्धतीने सांगण्यात आल्या आहे. आज महाराष्ट्रा मध्ये मराठी चित्रपटा पैकी बाईपण भारी देवा हा चित्रपट एका दिवसामध्ये करोडो रुपये कमावत आहे. की ज्याला पाहण्यासाठी महाराष्ट्र तळमळत आहे. मित्रांनो चला तर मग आता आपण जाणून घेऊया की या चित्रपटामध्ये असं काय आहे ,ज्यामुळे प्रत्येकच महाराष्ट्रीयन या मराठी चित्रपटाला ला पाहण्यासाठी थेटर मध्ये गर्दी करीत आहे.

Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे बाई पण भारी देवा

Baipan Bhari Deva Review कथानक:

मित्रांनो या चित्रपटामध्ये कुठल्याच प्रकारचे ॲक्शन नाही .हा चित्रपट सामान्य कुटुंबातील त्या प्रत्येक स्त्रीची कथा दर्शवनारा आहे. जिला या सर्व गोष्टी फेस कराव्या लागतात इतकच नाही तर हा चित्रपट संपूर्ण महिलांवर आधारित आहे.

पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिलांनाही मने असतात. त्यांनाही भावना असतात हे आजपर्यंत पुरुषांना कळलेलं नाही. म्हणून बायकांच्या अन्यायाला वाच्या फोडणारा हा बायकोच्या बाजूला असलेला चित्रपट आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येकच पुरुषाने पाहावे असं मला वाटतं.

कधी न विचार करणाऱ्या गोष्टी या चित्रपटांमध्ये केल्या गेल्या आहे आणि चित्रपटाच्या या भारी नावांमध्येच या गोष्टीचा संपूर्ण सारांश लपलेला आहे .या चित्रपटांमध्ये परमेश्वरालाच ठासून सांगितलं गेला आहे की बाईपण हे खरच भारी असते. आणि खरंच बाईपण हे भारीच असतं याला पुरुष कधीच समजून घेऊ शकणार नाही.आणि या चित्रपटाच्या माध्यमाने तुम्हा सर्वांना महिलेचे महत्त्व कळून येईल.

Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे बाई पण भारी देवा

या चित्रपटांमध्ये कुठल्याच प्रकारचा हिरो नाही, तर अशा सहा अभिनेत्री आहे ज्या या चित्रपटाला जिवंत करून दाखवतात.
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या सर्व अभिनेत्री या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसतात.

जन्म देते आई आणि सासूआई या दोन वहीनीमध्ये जेव्हा सामना रंगणार असं वाटायला लागतं. तेव्हा हा चित्रपट दिशा बदलतो खरंतर या सर्व महिला मंगळागौर स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असं ठरवतात पण काही कारणास्तव आणि घरच्या अडचणीमुळे चित्रपटांमध्ये अनेक असे मोड येतात जे तुम्हाला हसण्यास आणि रडण्यास भाग पाडतात.

या सिनेमांमध्ये डिप्रेशन, तलाख या सर्व गोष्टीवर फोकस केलं गेलं आहे.आणि बायकांवर असलेली नवऱ्याची हुकूमत या सर्व गोष्टीचा उघड झालेला आहे. सोबतच या सिनेमांमध्ये असलेले कलाकार हे सिम्पल आणि साध्या पोशाखामध्ये तुम्हाला दिसून येते मॉडर्न पण संस्कृती दर्शवणारा हा चित्रपट आहे.

या चित्रपटांमध्ये सहा बहिणी असतात. पण काही कारणास्तव त्या कधी भेटू शकत नाही .पण एक दिवस मंगळागौर या स्पर्धेच्या निमित्ताने ते भेटतात. भेटल्यानंतर या स्पर्धेला जिंकण्यासाठी त्यांची या चित्रपटांमध्ये झालेली धावपळ हे सहजच प्रत्येकच महिलेच्या आयुष्यामध्ये आहे असं सहज स्पष्ट करणारा हा चित्रपट आहे. घरातील अनेक ताणतणाव विसरून कधीतरी महिलेनेही स्वतःला वेळ दिला पाहिजे. स्वतःला ओळखलं पाहिजे ,आणि स्वतःच्या आनंदासाठी जगलं पाहिजे असा स्पष्टपणे सांगणारा हा चित्रपट आहे.

Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे बाई पण भारी देवा


गदर 2 मध्ये काय पाहायला मिळणार

 Quotes On Life In Marathi

Romantic Marathi Prem Kavita


इतकच नाही तर महिला ही जगत असताना तिला कुठल्या प्रकारच्या ताण-तणावाला तोंड द्यावं लागतं सहज ,कोणावरही तिला लग्न झाल्यानंतर अवलंबून राहावं लागतं ,आणि प्रत्येक गोष्टीला फेस करावे लागतात असे सहजपणे स्पष्ट करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या या अभिनेत्री सर्वांनाच परिचित आहे .त्यांचा साधा कॉस्ट्यूम सहज आणि स्पष्ट असलेलं राहणीमान या चित्रपटाला खास बनवत.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि आजही महिला या घरी राहतात. आणि पुरुष कामाला जातात ,महिलांना पायाखालची माती समजणारे हे पुरुष आजही या देशात आहे, आता त्यांना कुठेतरी अक्कल आली आहे असं मला वाटते कारण आज प्रत्येक क्षेत्रात मुली महिला या कार्य करतांना दिसून येतात.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Reply

%d bloggers like this: