Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर मराठी संदेश 10 +

Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर श्रद्धांजली मराठी संदेश
पृथ्वीवरती जन्म घेणाऱ्या प्रत्येक इसमास मृत्यू अटळ आहे. मरणे ही अशी गोष्ट आहे जी कोणी टाळू शकत नाही. आपल्यातून जाणारा व्यक्ती गेल्यानंतर मित्रपरिवार आणि त्याच्या नातेवाईकांना अत्यंत दुःख होत असते आणि त्यात जर ही व्यक्ती आपले बाबा किंवा वडील असतील तर सहन होऊ शकणार नाहीत असे कष्ट होतात. अशा वेळेस मुलांना आपले दुःख विसरून कुटुंबातील इतर हळव्या व्यक्तींना आधार द्यावा लागतो. तसेच आपल्या वडिलांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि देवाने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी यासाठी प्रार्थना करावी लागते. त्यासाठीच आम्ही हा ब्लॉग लिहित आहोत.

Bhavpurn Shradhanjali Message For Father भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurn Shradhanjali Message For Father भावपूर्ण श्रद्धांजली

बाबांच्या सावली शिवाय सगळं काही अपूर्ण राहते. जगातल्या कोणत्याच संपत्तीने पूर्ण होणार नाही अशी पोकळी दिसते. प्रिय बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Bhavpurn Shradhanjali Kavita For Father

तुमच्यासारखा पुण्यात्मा पूर्ण आयुष्यात नाही पाहिला.
सगळे हरवून गेले आता आमचा आधार कोण राहिला.
जेव्हा तुमच्या जाण्याची बातमी ऐकली तेव्हा हृदयाचा चुकला होता ठोका.
देवासारखे होते तुम्ही कोणास आता मारणार हाका ?
बाबा तुम्ही होते म्हणून सर्व काही सुरळीत चालले होते.
आमच्या सारख्या छोट्या छोट्या झुडपांचे तुम्ही सगळे विश्व होते.
तुमचा आदर्श ठेवून आता सतत पुढे जाणार,
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच एक देवाचरणी प्रार्थना असणार.

———————————————-

कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे आधारवड असलेले तीर्थरूप बाबा यांना देवाज्ञा झालेली आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला अत्यंत दुःख झाले आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. प्रिय बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

बाबा तुमच्या जाण्याने पायाखालची जमीन निष्टून गेली असं वाटत आहे. आता देवाकडे एवढेच मागणे आहे की तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभावी. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

———————————————-

तुमच्या जाण्याने आम्हा सर्वांना अत्यंत दुःख झाले आहे. तुमच्या असण्याने कुटुंबाला जी परिपूर्णता होती ती आता नाहीशी झाली आहे. तुम्ही सदैव आठवणीत राहाल आणि तुमच्या सत्कर्मांमुळे तुमचे नाव पिढ्या घेतले जाईल याची आम्हाला खात्री आहे. बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

———————————————-

देवाकडे माझे आता एकच मागणी आहे की आमच्या बाबांना तू परत दे. बाबा तुमच्या जाण्याने आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाबा कृपया पुन्हा या.

Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर मराठी संदेश

तुमचे छत्र लहानपणापासून डोक्यावर होते त्यामुळे एकही आमच्यापर्यंत पोहोचली नाही. पण तुमच्या जाण्याने आम्ही किती एकटे झालोत हे आता कळले आहे. तुमच्या खंबीर आधाराची सतत आठवण येईल बाबा. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.

———————————————-

Bhavpurna shradhanjali baba in marathi

आई आणि बापाची दोन्ही माया तुम्ही आम्हाला दिली. आयुष्यात एकही गोष्ट कमी पडू नये म्हणून तुम्ही राब राब राबलात. तुम्ही होतात म्हणून आमच्या जीवनाला अर्थ आहे. बाबा तुम्ही प्लीज परत या.

———————————————-

Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर मराठी संदेश

बाबा तुम्ही हसून मारलेली मिठीसुद्धा किती कणखर होती ते जाणवत आहे. कारण की तुमचे छत्र हरवल्यानंतर जगरहाठी काय असते आणि कष्ट काय असतात ते आता कळते आहे. बाबा तुम्ही मरेपर्यंत हृदयात कायम घर केले आहे. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.

———————————————-

तुमचे नाव अनंत काळापर्यंत लोक विसरणार नाही,
शरीर गेले तरी नाते तुटणार नाही.
तुमच्यासाठी आमचे देणे कधीही फिटू शकणार नाही,
बाबा तुम्ही लांब जरी गेले तरी आयुष्यभर आठवणी संपणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.

Bhavpurna shradhanjali meaning

एखाद्या व्यक्तीला जर देवाज्ञा झाली किंवा सरळ भाषेत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या बद्दल मनापासून व्यक्त केलेल्या भावना म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली होय.

Bhavpurn Shradhanjali Message For Father | वडील गेल्यावर मराठी संदेश

इतर भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज वाचा

मिस यु बाबा कविता

मराठी कोट्स आणि सुविचार वाचा

Leave a Reply

%d bloggers like this: