फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

मी आहे फळा मुलांना म्हणतो घडा! Blackboard Autobiography In Marathi जाणून घ्या फळ्याचे आत्मवृत्त.

अशाच प्रकारे विविध काल्पनिक आत्मवृत्त जाणून घेण्यासाठी माझा ब्लॉग या वेबसाईटला नक्की भेट द्या. माझा ब्लॉग वेबसाईट मध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या अनेक विषयांवर आणि त्यांच्या अफाट कल्पनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

Blackboard Autobiography In Marathi

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो मी काळा फळा.मला सर्वच ओळखतात. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा मी रंगाने काळा असलेला फळा. जो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होऊन जातो. पण शाळेसारख्या पवित्र ठिकाणी माझा जास्त प्रमाणात सहवास असतो. शिक्षक असो की विद्यार्थी यांचे माझ्यासोबत असलेल नातं हे खरच खूप मोलाच आणि आपुलकीच आहे. कारण मी जरी काळा असलो तरी माझ्या या अंगावर पांढरा शुभ्र खडू ने लिहून अनेक शिक्षक हे विद्यार्थ्यांची भविष्ये उज्वल करीत असतात.

खरंतर माझ्यावर लिहिलेला प्रत्येक शब्द हा सत्य असतो. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गुरुजन हे त्यांचे ज्ञान माझ्यावर लिहून विद्यार्थ्यांना आत्मसात करायला लावतात. इतकच नाही तर मला सांगताना खरच अतिशय आनंद होतो की ,त्यांनी वाचलेली पुस्तके त्यांनी मिळवलेले ज्ञान ,हे माझ्यावरून मुलांकडे जातं ,आणि मुलांना समजण्यासाठी ते अतिशय सोपं असतं.

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

काही वेळा असं होतं की, माझ्या संपूर्ण अंगावर काही खोडकर मुले खडू ने ओरखडे ओढतात. त्याचा मला खरंच खूप त्रास होतो. पण मी आहे तुमचा मित्र ! म्हणून तो त्रास मी सहन करून घेतो. आणि तुम्हाला एकही शब्दाने बोलत नाही. तुम्ही जेव्हा आनंदी असता, तेव्हा माझ्यावर काढलेली चित्रे ,आणि मुलींसाठी मी त्यांच्या मनासारखी रांगोळी, डिझाईन काढण्यासाठी पण उपयोगी पडतो. आता तर माझे विविध प्रकार झाले आहेत. मला विविध नावाने ओळखले जात आहे.

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

जसे की वाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड, आणि या सर्व प्रकारामुळे तुम्हाला शिक्षण घेणे अतिशय सोपं झालंय. आणि तुम्ही ते सहज घेऊ शकता .मात्र तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्याच प्रकारचा आढावा मी घेत नाही. आणि या सर्व प्रकारावर शिकण्यासाठी तुम्ही खरंच खूप उत्साही असता. तुम्हाला देखील खूप मजा येत असेल ना !माझ्यासोबत अभ्यास करायला, माझ्यासोबत म्हणजे मी अभ्यास करतो की काय? अस तुम्हाला वाटत असेल.

तर हो! जेव्हा शिक्षक हे माझ्या अंगावर लिहितात तेव्हा शिक्षकाने लिहिलेल ते ज्ञान मी ही आत्मसात करतो. आणि तुमच्या बरोबर मी हे शिकत असतो, तुमच्याबरोबर शिकण्याचा एक आगळावेगळा आनंद मी अनुभवत असतो.

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

तुम्हाला माहिती आहे का ?एक काळ असा होता, जेव्हा मी फक्त आणि फक्त शाळेमध्ये राहायचो. पण आताच्या काळातील पालक हे त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी फळे घरी आणतात आणि त्यांच्या भिंतीला लावतात, शाळेमध्येच नाही तर आज काल मी घरांमध्येही राहतो .घरामध्ये त्यांचे आई, वडील माझ्यावर लिहून मुलांना शिकवतात. मुले देखील त्यांच्याजवळ असलेल्या रंगीबेरंगी खडू ने आकर्षक असं कधी चित्र काढतात, तर कधी अभ्यास करत असतात. मुलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून मला खरच खूप खूप आनंद होतो.

इतकच नाही तर आज काल मी प्रत्येकच ठिकाणी दिसतो. ट्युशन क्लासेस मध्ये ,माझा ग्रीन बोर्ड तर कधी वाईट बोर्ड म्हणून युज केला जातो. तेथील ट्युशन टीचर माझा वापर करतात .आणि मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

दिवसेंदिवस माणसाची प्रगती होत चालली आहे .माझं रूप देखील त्याने पूर्ण बदलून टाकला आहे .आणि मी ही बदलून जात आहे. मात्र माझं महत्त्व कधी बदललेल नाही. तुमच्या भविष्याचं एकमेव साधन अशी माझी पुस्तकानंतर उल्लेख केला जाते. तुम्हाला माहित आहे? दिवसेंदिवस मी त्या भिंतीला असाच लटकलेला असतो.

माझे पाय, माझे हात, माझ संपूर्ण अंग दुखून येत. मात्र मी थोडाही वाईट वाटून घेत नाही. आणि जो त्रास मला होतो. त्याचं दुःखही मला होत नाही. कारण तुम्ही माझे सर्व मित्र आहात? आणि तुमच्या प्रगतीसाठीच मी जन्माला आलो. आणि मित्र असल्यानंतर मी तुमच्यासाठी कुठलाही त्रास सहन करू शकतो. कारण खऱ्या मित्राची हीच तर एक ओळख असते हो ना! पण तुम्ही मला खरंच मित्र मानता का ?मानत असाल तर तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करा
आणि माझं हे दुःख वाया जाऊ देऊ नका.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023

Autobiography of Computer in Marathi

Autobiography Of flower in Marathi

1 thought on “फळ्याचे आत्मवृत्त मराठीमध्ये | Best Blackboard Autobiography In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: