समाजसेवेची आवड आहे ? बारावी नंतर करा हा कोर्स | Free BSW Course Information In Marathi 2023

बारावी उत्तीर्ण आहात ? समाजसेवेची आवड आहे ? आणि करिअरची काळजी आहे? तर मग हा लेख तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. BSW Course Information In Marathi मिळवा.

BSW Course Information In Marathi

BSW Course Information In Marathi 2023 बीएसडब्ल्यू

बारावीनंतर विविध प्रकारचे डिप्लोमा आणि डिग्री कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध असतात .मात्र कुठल्या फिल्डमध्ये जायचं हे कळत नाही, जर तुम्हाला समाजसेवेची आवड असेल आणि समाजासाठी काहीतरी करायचं असेल, तर तुमची ही आवड तुमच्या शिक्षणात उपयोगी पडेल .बी एस डब्ल्यू हा असा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला समाजाचे पारंपारिक ज्ञान मिळेल, सोबतच तुम्हाला आवडणाऱ्या बाबींवर विशेष लक्ष देता येईल. आणि एक उत्तम सज्ज नागरिक म्हणूनच नाही तर ग्रॅज्युएट पदवी देखील मिळेल.

BSW Course Information In Marathi

बीएसडब्ल्यू हा एक कोर्स आहे .ज्यालाच आपण पदवीचे शिक्षण म्हणून ओळखतो. यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनची पदवी दिली जाते. इतकच नाही तर हा तुमचा कोर्स प्रोफेशनल लेवल चा कोर्स म्हणून ओळखला जातो. या कोर्स कडे वाटचाल करीत असताना तुमची बारावी कंप्लीट असणे महत्त्वाच आहे. बारावीनंतर तुम्ही या कोर्स साठी अप्लाय करू शकता. हा कोर्स तीन वर्षाचा असतो .या कोर्स साठी तुम्हाला रेगुलर कॉलेजेस करावे लागेल असं नाही तुम्ही हा कोर्स बाहेरूनही करू शकता.

BSW Course Information In Marathi

या कोर्समध्ये तुम्हाला कल्याणकारी संस्था बद्दल शिकवले जाते. आंतरराष्ट्रीय सामाजिक समस्यांबद्दल तुम्हाला पुरेपूर ज्ञान दिले जाते. आपल्या देशासाठी कशाप्रकारे कार्य करता येईल, आणि समाजातील लोकांची कशाप्रकारे मदत करता येईल. हे सर्व तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जाते. इतकच नाही तर तुम्ही या कोर्स द्वारे तुमच्यासमोर एक उद्दिष्ट ठेवले जातात. आणि त्या उद्दिष्टाच पालन तुम्ही एक सामान्य नागरिक आणि सामान्य म्हणून करू शकता.

बीएसडब्लू (BSW) चा फुल फॉर्म (BSW Full Form in Marathi)

हा कोर्स समाजात घडणाऱ्या किंवा होणाऱ्या नवनवीन समस्यांना सोडवण्यासाठी आणि लोकांच्या प्रश्नाचे उत्तर एक उत्तम नागरिक होऊन देण्यासाठी उपयोगी पडतो या बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क असा होतो.

बीएसडब्लू (BSW) कोर्स कसा करावा? (BSW Course Admission Process)

हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये तुम्हाला दोन मार्ग मिळतात ,पहिला मार्ग हा बारावी नंतर तुमच्या मिळालेल्या मार्क्स वर डिपेंड करतो. आणि त्यावरून तुम्हाला त्या क्षेत्रात प्रवेश मिळतो, दुसरे म्हणजे यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावे लागते त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळते.

यासाठी तुम्हाला प्रवेश सहजच मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला चांगल्या गुणाने उत्तीर्ण होणे देखील गरजेचं असते. तुमच्या गुणांच्या आधारे तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते.
दुसरा आणि अति महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही एंट्रन्स एक्झाम द्वारे यामध्ये प्रवेश घेऊ शकता याचा अभ्यास तुम्ही बारावीपासून सुरू करावा.

बीएसडब्लू (BSW) कोर्ससाठी पात्रता (Eligibility For BSW Course)

१)या कोर्सची पात्रता तुम्ही कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असायला हवे .बारावीला तुम्हाला गणित आणि जीवशास्त्र हा विषय अभ्यासाला हवा.

१)ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स असल्यामुळे तुम्हाला बारावी मध्ये 50 पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.

बीएसडब्लू (BSW) केल्यानंतरच्या संधी (Career Scope After BSW Course)

समाजासाठी काहीतरी करण्याची संधी या कोर्समुळे तुम्हाला उपलब्ध करून मिळते. मानवी समुदाय आणि हक्क माणसाच्या निर्माण होणाऱ्या गरजा आणि विकासासाठी तुम्हाला योग्य ते काम करण्याची संधी उपलब्ध होते.
खालील दिलेल्या क्षेत्रांमध्ये तुम्ही विविध प्रकारे सरकारी जॉब करू शकता.
१)Counselling Sector
२)Old Age Home
३)Government Hospital
४)NGO
५)HR Industries Department
६)Human Rights Agency

समाप्त


DMLT Course Information In Marathi

Neet Exam Information in Marathi

Mpsc syllabus and my success story

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

1 thought on “समाजसेवेची आवड आहे ? बारावी नंतर करा हा कोर्स | Free BSW Course Information In Marathi 2023”

Leave a Reply

%d bloggers like this: