नुकताच दहावीचा निकाल लागला.आता दहावी नंतर पुढे काय? Career After 10th in Maharashtra हा प्रश्न विध्यार्थी आणि पालक यांना सतावत असतो.
10 वी हा विध्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. मग मित्र हा पर्याय निवडतो म्हणून मी इकडे जाऊ? किंव्हा वडील म्हणतात म्हणून मी हे करू की? तर नातेवाईक सांगतात हे तुला झेपणार नाही तू इकडे जाऊ नकोस? या सगळ्यांमुळे विदर्थ्यांचा मनात मोठा संभ्रम निर्माण होत असतो. आणि इतर देशात ज्याला आपण counselling (समुपदेशन) म्हणतो असं काही इकडे अजून तरी दिसत नाही मग करायचं तर काय करायचं? तर आज आपण 10 वी नंतर पुढे काय करता येईल हे पाहणार आणि समजून घेणार आहोत.
दहावी नंतर करियरचे उपलब्ध पर्याय | Career After 10th in Maharashtra

सर्वात आधी काय तपासावे ?
सगळ्यात आधी तर विद्यार्थ्यांने आणि पालकाने आपल्या मुलाला नक्की कशामधे आवड आहे?
कोणते विषय समजायला सोपे जातात. आणि भविष्यात त्याची गोडी कशात आहे हे पाहणं महत्वाच
10 वी नंतर पुढे पारंपारिक पर्याय – Career After 10th in Maharashtra
10 वी नंतर पुढे जे पारंपरिक चालत येतात ART ( कला ) COMMERCE ( वाणिज्य ) SCIENCE विज्ञान हे पर्याय असतात
ART ( कला )
ज्याला कशातच ऍडमिशन मिळत नाही तो आर्टस् ला जातो हा चुकीचा समज आपण आधी डोक्यातून काढायला हवा. ART( कला ) हे क्षेत्र आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्यासाठी एक उत्तम क्षेत्र आहे. यामध्ये सरकारी नोकरी मिळण्याच प्रमाण अधिक आहे.
COMMERSE ( वाणिज्य )
ज्यांना बँकिंग क्षेत्रात कामं करण्याची आवड आहे. गणित हा विषय ज्यांना सोपा वाटतो अशा साठी हा चांगलं पर्याय आहे. पुढे जाऊन CA सारख्या संधी या क्षेत्रात आहेत
दहावी नंतर करियरचे उपलब्ध पर्याय | Career After 10th in Maharashtra
SCIENCE ( विज्ञान )
ज्यांना विज्ञानाची आवड आहे अशासाठी हे क्षेत्र उत्तम पर्याय आहे. यामध्ये ज्यांना पुढे DOCTOR व्हायचे आहे यांच्या साठी PCMB म्हणजे PHYSICS (भौतिक शास्त्र ) CHEMISTRY ( रसायनशास्त्र ) MATHS ( गणित ) आणि BIOLOGY (जीवशास्त्र ) तर ज्यांना पुढे ENGINEERING करायची आहे त्यासाठी PCM म्हणजे PHYSICS (भौतिक शास्त्र ) CHEMISTRY ( रसायनशास्त्र ) MATHS ( गणित ) हे विषय निवडावे लागतात. पण DOCTOR साठी NEET तर ENGINEERING साठी JEE यासारख्या प्रवेश परीक्षा दयावा लागतात.
वाचा High-Income Skills Anyone Can Learn in Marathi
वाचा MPSC Success Story

दहावी नंतर करियरचे इतर पर्याय
याव्यतिरिक्त तुंम्ही DIPLOMA म्हणजे POLYTECHNIC कॉलेज ला ऍडमिशन घेऊ शकता. हा कोर्स साधारण 3 वर्षाचा असतो. यामध्ये MECHANICAL,ELECTRICAL, CIVIL, COMPUTOR, AIML इ. कोर्स करू शकता डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
Career After 10th in Maharashtra
तसेच D. PHARM,DMLT यासारखे PARAMEDICAL कोर्स करू शकतात
10 वी विध्यार्थ्यांच्या करियर मधील खूप महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या वळणावर आपण खूप विचार करुन निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसेंच अश्यावेळी पालकाने आपल्या पाल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव न टाकता त्याला विचारात घेऊन समजून घेऊन पुढील निर्णय घ्यावा. 10 वी नंतर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
लेखक :- श्री. विक्रमसिंह सर
2 thoughts on “दहावी नंतर करियरचे उपलब्ध पर्याय | Career After 10th in Maharashtra”