आजच्या युगात सीईटी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. Cet Information In Marathi मध्ये परीक्षेचे स्वरूप आणि त्याचे करियरसाठी महत्व काय ? हे पाहणार आहोत.
Cet Information In Marathi

मित्रांनो आजच युग हे स्पर्धेचे युग आहे. जिथे माणूस अहोरात्र कष्ट करून बस एका सरकारी नोकरीसाठी नेहमीच झटत असतो . परंतु काही कारणास्तव किंवा परिस्थितीमुळे तो ती मिळू शकत नाही. आणि निराश, हताश होऊन आशा सोडून देतो. पण स्पर्धेचे युग म्हटलं तर आपल्याला तेवढीच जोरदार तयारी असायला हवी. सरकारी नोकरीच्या शोधामध्ये तुम्ही अभ्यास करता आणि पेपर देण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात वाटचाल करतात हे तुमचं पहिलं पाऊल असतं.
स्वतःच्या मनाला खंबीर बनवून अपयश आल्यानंतरही तुम्हाला लगेच दुसऱ्या पेपर साठी तयार राहावं लागतं .खरंतर मित्रांनो हे जरा अवघड असतं ,पण ज्यांच्यामध्ये जिद्द आणि काहीतरी करण्याची महत्त्वकांक्षा असते, तो या परिस्थितीला तोंड देऊन समोर जातो. मनावर आलेला तणाव आणि तणावाला दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मुलांच्या मनावरील ओझं कमी करण्यासाठी सीईटी Entrance Exam सुरू केली आहे.
सीईटी परीक्षा माहिती | Best Cet Information In Marathi 2023
सीइटी म्हणजे काय?
सीईटी ला सामान्य प्रवेश परीक्षा असे देखील म्हणतात. एस एस सी ,रेल्वे परीक्षेत, आणि बँक यासारख्या परीक्षेत बसण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला सीईटी एक्झाम द्यावी लागते.
सुरुवातीला तुम्हाला या सर्व परीक्षेमध्ये बसण्यासाठी वेगवेगळ्या फॉर्म भरावा लागत होता. मात्र हे मुलांच्या तणावाचं कारण बनत होतं. आणि गुंतागुंती मध्ये मुलं कुठलाच फॉर्म भरू शकत नव्हते. त्यामुळे आता तुम्हाला इतर अनेक फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. आता या सर्व परीक्षेमध्ये बसण्यासाठी तुम्हाला फक्त एकच प्राथमिक परीक्षा द्यावी लागेल आणि एकच फॉर्म भरावा लागेल.
CET चा फुल फॉर्म काय आहे?
सीईटीचा नेमका फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? सीईटी ही एक एंट्रन्स एक्झाम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्याचा फुल फॉर्म बऱ्याच लोकांना माहिती नाही तर त्याचा full form Common Enterence Test” असा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.
CET चे प्रमुख मुद्दे | CET Exam Main Points
तुम्हाला माहिती आहे का? वरील दिलेल्या तिन्ही परीक्षा या प्राथमिक परीक्षा असून याला देण्यासाठी सीईटीच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका देण्यात येते.
2001 पासून या परीक्षेची सुरुवात झाली. इतकच नाही तर या परीक्षेला कुठल्याच प्रकारच बंधन नाही. विद्यार्थी जास्तीत जास्त वेळा ही परीक्षा देऊ शकतो. आणि अपयश आला तरी पुन्हा तयारीला लागू शकतो.
सीईटी परीक्षेचे स्वरूप जर आपण जाणून घेतलं तर, तुम्ही सीईटी परीक्षेचे मार्क हे तीन वर्षापर्यंत परीक्षा देण्यासाठी उपयोगात आणू शकता. तुमचा स्कोर हा तीन वर्ष परीक्षा देण्यासाठी उपयोगी ठरतो, पण मात्र परीक्षा तुम्हाला कशा प्रकारे द्यावी लागेल हे तुम्हालाच निवडावे लागते. त्याला वाटेल तशा प्रकारे तो तीन वर्ष परीक्षा या स्कोरच्या माध्यमातून देऊ शकतो.
Police Bharati Information in Marathi
Mpsc syllabus and my success story by तहसीलदार संतोष आठरे

CET परीक्षेचे स्वरूप काय आहे?
10 वी नंतर CET
जर तुम्ही दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असाल तर, पुढे शिकण्यासाठी अकरावी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. सीईटी परीक्षा देऊन अकरावी मध्ये ऍडमिशन करणाऱ्या विद्यार्थ्याला विशेष प्राधान्य दिले जाते .सोबतच दहावीमध्ये त्याच्या गुणाचं विशेष अंक लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो.
परीक्षेचे स्वरूप काय आहे ?यात कुठल्या विषयाचा समावेश होतो?
१)दहावीचा जो अभ्यासक्रम असतो त्यानुसार सीईटी परीक्षा घेतली जाते.
२) 100 मार्काचा हा सीईटीचा पेपर त्यामध्ये तीन विषयांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये विज्ञान या विषयाला २५ मार्क असतात, इंग्लिश २५ मार्क आणि गणित २५ मार्क. सोबतच २५ मार्क हे सामाजिक शास्त्र या विषयाला असतात.
३) सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन तास असतात.
४)या पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला बहुपर्याय असतात त्यामध्ये योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर
