22 जूनला इंग्रज अधिकार्याला गोळ्या का घातल्या ? चाफेकर बंधू कथा | Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

क्रांतीची सुरुवात करणारे ,दामोदर हरी चाफेकर यांनी त्या वेळेला धाडस करून इंग्रज अधिकाऱ्याला कशाप्रकारे आणि कोणत्या योजनेने ठार मारले ,याची संपूर्ण माहिती.दामोदर हरी चाफेकर यांनी इंग्रज अधिकार्याला गोळी घातल्याची गोष्ट

Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

महाराष्ट्रातील चिंचवड येथे राहणारे पुण्यापासून अगदी जवळच असलेल हे चिंचवड चाफेकरांसाठी अगदी अभिमानाचच स्थान होतं. महान कीर्तनकार हरिपंत चाफेकर यांचे ज्येष्ठ पुत्र दामोदर पंत चाफेकर होते यांचा जन्म चिंचवड पुणे या गावात झाला.

चाफेकर बंधू

दामोदर राव चाफेकर यांचा जन्म

दामोदर हरी चाफेकर या यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका महान कीर्तनकार यांच्या घरी झाला, जून २५, इ.स. १८६९ दामोदरराव लहानपणापासूनच लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

बालपण

दामोदर राव हे शरीराने धडधाकट त्यांना लहानपणापासूनच व्यायामाचे आवडते आपल्या वयाच्या मित्रांना गोळा करून त्यांनी त्यांची स्वतःची व्यायाम शाळा सुरू केली इंग्रजांचा होणारा अत्याचार याला पाहून दामोदरराव नेहमी खेळत असतात त्यांना इंग्रजांची अतिशय चिडवते इंग्रज दिसले तरी त्यांना संताप सुटायचा कारण इंग्रजांचा वाढता अत्याचार हे ते सहन करू शकत नव्हते दामोदर रावांना दोन भाऊ होते एक बाळकृष्ण हरी चाफेकर आणि दुसरा वासुदेव हरी चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येकच कार्यात सहभागी होत होते आणि त्यांना मदत करत होते.

Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

इंग्रज सरकारचा जनतेवर अन्याय

हे तिघे भाऊ बलाढ्य होते भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी योजना आखत होते इतकच नाही तर बाळकृष्ण, हरी आणि वासुदेव हरी चाफेकर हे तिन्ही बंधूंनी भारताचे स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले
या तिघांचं एकत्रित नाव करून लोक त्यांना चाफेकर बंधू असे म्हणत. २२ जून १८९७ रोजी दामोदर हरी चाफेकर यांनी रेड आणि लेफ्टनंट आयस्टंर यांना गोळ्या झाडून यांची हत्या केली.
भारतीय मुक्ती संग्रामाचा पहिला क्रांतिकारी उठाव यातूनच सुरू झाला. प्लेग समितीचा नेता या नात्याने रँडने पुण्यात भारतीयांवर अनेक अत्याचार केले होते. बाळ गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी याचा कठोरपणे निषेध केला, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

प्लेगच्या नावाखाली पिळवणूक

त्यावेळेला 1997 मध्ये पुणे शहर प्लेग यासारख्या भयानक आजाराने ग्रासले होते. प्लेग त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला होत होता, या परिस्थितीतही ब्रिटिश अधिकारी लोकांचा छळ करीत होते, त्यांच नुकसान करत होते, त्यांची निंदा करत होते, त्यांना विनाकारण त्रास देत होते ,वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्ट हे इंग्रज अधिकारी पुण्यात राहणाऱ्या लोकांना भयंकर त्रास देत होते, आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध बेदखल करत होते, पायामध्ये असलेली बुट न काढता ते हिंदू मंदिरांना भेट देत असे यांचा हा व्यवहार पाहून दामोदर चाफेकर यांना अतिशय दुःख होत होते. आणि या लोकांसाठी आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटत होते.

लोकमान्य टिळकांना हे तिघे गुरु मानतात ,त्यांना गुरुचे स्थान देत, आणि सन्मान करत या इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी त्यांचा संवाद झाला .टिळकांनी एकदा चाफेकर बंधूंना विचारले, शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात अत्याचाराला विरोध केला होता पण यावेळी तुम्ही इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध काय करत आहात ? काही अत्याचार अन्याय संदर्भात विचार केला का? यानंतर या तिन्ही भावांनी त्यांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारण्याचा ठरवलं , आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे ठरवलं.

संधी चालून आली

त्यावेळेस 22 जून 897 रोजी राणी विक्टोरियांचा हीरक महोत्सव पुण्यातील सरकारी गृह येथे साजरा करण्यात येणार होता योगायोगाने आयर्स्ट आणि वॉल्टर चार्ल्स रँड यांनी त्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

दामोदर चाफेकर यांचा मित्र विनायक रानडे नावाच्या मित्रासोबत त्यांचा भाऊ बाळकृष्ण हरी चाफेकर त्या कार्यक्रमांमध्ये पोहोचले, आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या जाण्याची वाट पाहू लागले ,मध्यरात्री झाली होती !त्या उंची इमारतीतून बाहेर पडण्यासाठी हे तिघेही तिथून निघाले आणि गाडीत बसले.

Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

वाचा Karna Story in Marathi

वाचा Dronacharya Story in Marathi

मध्यरात्री घडवले हत्याकांड

त्यांनी ठरवल्यानुसार, बाळकृष्ण हरी चाफेकर आणि दामोदर हरी चाफेकर यांनी रँडच्या वॅगनच्या मागे लपून बसून आरिस्टवर गोळ्या झाडल्या आयस्टरचे लगेच तिथेच मृत्यू झाला. परंतु रँड दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले होते .आणि तीन दिवसानंतर त्याचाही मृत्यू झाला. चाफेकर बंधूंचे हे महान कार्य पाहून पुण्यातील ज्या नागरिकांवर अत्याचार होत होता अन्याय होत होता ,ते पेटून उठले.

स्वराज्यासाठी फाशीची शिक्षा

बाळकृष्ण हरी चाफेकर यांना ह पोलिसांनी पकडले नसून, दामोदर हरी चाफेकर यांना पकडण्यात आले होते न्यायाधीश यांनी दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा सुनावली, आणि दामोदर हरी चाफेकर यांनी ती विनम्रपणे मान्य केली तुरुंगात टिळकांनी त्यांचे स्वागत केले ,त्यांनी त्यांच्या हाती गीता दिली.

दामोदर हरी चाफेकर यांनी 18 एप्रिल 1898 रोजी गीता जे पठण केले, आणि पठण करत असताना फाशी जवळ आले, तिथेच त्यांनी गळफास घेतला ती गीता अगदी त्या क्षणी ही त्यांच्या हातात होती ,आणि तिथेच आपण त्यांना हरवून बसलो.

Chafekar Bandhu Best Freedom Fighter Story

Leave a Reply

%d bloggers like this: