सणांचे बदलते रूप by अर्चना कुलकर्णी | Change in Festivals in Marathi Language 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत अर्चना कुलकर्णी यांनी Change in Festivals in Marathi Language या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते रूप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

साहित्य बंध समूह
उपक्रम क्र ४
विषय: सणांचे बदलते रूप

दिनांक २/११/२०२३

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

महाराष्ट्र हा शेतीप्रधान प्रदेश आहे. भागवतात महर्षी व्यासांनी लिहिलेले आहे की, निसर्ग तोच परमेश्वर..! शेतीप्रधान देशात/प्रदेशात निसर्गात परमेश्वर बघणे हा अगदी योग्य, सुसंस्कृत निर्णय आहे असे मला वाटते. यामुळे कदाचीत आपल्या कडील सणवारात शेती, पिके, फळे, फुले यांनाच नाही तर अगदी पानांना सुद्धा खूप महत्त्व आहे.बेल,दुर्वा, तुळस, आंबा , केळीची पाने, विड्याच्या पानांना तर वर्षेभर विविध सणाला व इतर मंगल कार्यात महत्व असते पण श्रावण, भाद्रपद महिन्यातील सणांना तर या व्यतिरिक्त कित्येक पत्रींना खास महत्त्व आहे.यामुळे आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो.

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

त्या निर्गुण परमेश्वराच्या सगुण रूपातल्या मूर्तीला सजविण्या साठी, पूजा करण्यासाठी विविध फुले, हार तर खूपच लोकप्रिय आहेत .

नाग,बैल , गाय हे शेतकऱ्यांना खूप मदत करतात त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी , पोळा, वसुबारस यांसारखे सण साजरे होतात.

वय्यक्तीक, कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी , नातेसंबंध जपणारे नव्हे घट्ट करणारे सण देखील आपण साजरे करतो.राखीपौर्णिमा, वटपौर्णिमा, भाऊबीज, पाडवा, संक्रांत, मातृदिन हे या पठडीतील सण आहेत .

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

या सणाच्या दिवसांत काही फार चांगल्या गोष्टी घटना घरोघरी घडतात.त्या म्हणजे सणाच्या आधी घराची साफसफाई हा आवश्यक कार्यक्रम असतो. वातावरण निर्मळ रहावे यासाठी राग, रूसवे फुगवे, भांडणे यांना कुठेही थारा नसतो. प्रार्थना, श्लोक, मंत्र यांच्या उच्चारांनी घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते तसेच प्रत्येक सहभागी व्यक्तीसाठी हर प्रकारे लाभदायक असते.

सर्व क्षेत्रातील व्यापार सणावाराला बहरलेला असतो. ते आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण म्हणायला हरकत नाही.

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

सणांचे बदलते रूप by अर्चना कुलकर्णी | Change in Festivals in Marathi Language 2024

संपूर्ण जगाचे रहाटगाडगे अनंत काळ जी शक्ती सुरळीत चालवते त्या शक्तीला देव हे नाव देऊन विविध प्रकारे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.त्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन अहंकार बाजूला ठेवला जातो. किती विचारपूर्वक हे सर्व नियोजन आपल्या पूर्वजांनी केले आहे..!

या प्रथांचा आदर ठेऊन आपण सर्वांनी हा वसा जपला पाहिजे व पुढील पिढीलाही यासाठी तयार केले पाहिजे . कालानुरूप त्यात बदल करणे नक्कीच आवश्यक आहे . आपली नोकरीच्या वेळा, कर्तव्य, मुलांचे शिक्षण यामुळे पारंपरिक प्रथा बदल्याव्या. ते सर्वार्थाने योग्य आहे तथापि हे देखील नक्की की सामाजिक स्तरावर त्याचे स्तोम माजवू नये.पैसे कमवण्याचे साधन म्हणून तर सार्वजनिक सण, उत्सव, पूजा अजिबात करु नये.इतरांनीही या अनिष्ट प्रघातांना अवाजवी महत्त्व देऊ नये अन्यथा पुढच्या पिढीचा या सर्व गोष्टींवरचा विश्वासच उडेल.

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

काही लोक घरात पारंपरिक पद्धतीने धार्मिक सण साजरा करण्यात ऐवजी पिकनिकला,
ट्रीपला जाणे पसंत करतात तर काही लोक पूजा, मंत पठण, श्रवण यापेक्षा छानछोकीला महत्व देतात. प्रत्येकाने या बाबत स्वतःला पडताळून पहावे व पुढील निर्णय घ्यावा.

अर्चना कुलकर्णी,ठाणे

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

Diwali Essay in Marathi

सणांचे बदलते रूप | Change in Festivals in Marathi Language

Leave a Reply

%d bloggers like this: