सणांचे बदलते स्वरूप by केशवराव चेरकु | Change in Marathi Festivals 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत केशवराव चेरकु यांनी Change in Marathi Festivals या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते स्वरूप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

साहित्य बंध समूह उपक्रम
विषय – सणांचे बदलते स्वरूप

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

तोच फराळ अन् तेच फटाके तीच दिवाळी आज ही असते पण ते प्रेम अन् तो जिव्हाळा हे आता तर मात्र कुठे दिसते ।।
केशवराव चेरकु. ………

आपला भारत देश विविधतेनं नटलेला देश आहे. अनेक धर्म, पंथ, जाती आणि त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक प्रथा, सणवार आहेत. प्रत्येक धर्माची सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या भारतीय हिंदू धर्मात खुप सणवार आहेत. जवळजवळ वर्षभर सण चालूच असतात. काळानुरूप त्याचं स्वरूप पण बदलते आहे. कारण जरी वेगवेगळी असली तरी आमुलाग्र परिवर्तन झालेला आहे.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

जे सण आपण लहानपणी असताना जसे साजरे करायचो त्याप्रमाणे तेच सण आपण आज तसेच साजरे करत नाही. त्याची कारणे आणि झालेला बदल ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. बऱ्याच गोष्टींचा यावर परिणाम झालेला आहे. भौतिक, आर्थिक, पर्यावरण, काळानुरूप बदलेली जीवन पद्धती आणि मुख्य आपण हिंदू धर्मातील लोक प्रगतीशील आहोत प्रत्येक सणाला विज्ञानाच्या कसोटीवर त्याला तोलून मापून स्वतःच बदल करून घेतो. आणि काही ठिकाणी धार्मिक अनास्था याचा खुप मोठा परिणाम झालेला आहे.

आता स्वरुप बदलल सांगायचं झालं तर आपले सणवार इतके आहेत की संपूर्ण सणाचा विचार आपल्याला इथे करणे शक्य नाही. म्हणून काही मुख्य सणांमध्ये झालेल्या बदलाच स्वरुप आपण इथे बघू या.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals


दिवाळी खरं बघितलं आपला सर्वात मोठा सण आहे. पहिले आपण पाच दिवस दिवाळी साजरी करायचो. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असं साधारण त्याच प्रत्येक दिवसाला वेगळं धार्मिक महत्त्व आणि भावना, समज, प्रथा आणि धर्मीक ग्रंथात लिहून ठेवलेले कथा यावर आधारावर आपण मानतो. त्याप्रथेनुसार दिवाळी पाच दिवस साजरी करतो.

सणांचे बदलते स्वरूप by केशवराव चेरकु | Change in Marathi Festivals 2024

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरु होते. याला गोवत्स द्वादशी असे पण म्हणतात. गोवत्स द्वादशी म्हणजे गाई गुराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी गोंधनाची पुजा केली जाते, ती अनेक जन्माच्या कामना पूर्ण होण्यासाठी पुजा केली जाते. गाई गुराढोर हे फक्त खेडे गावात असतात. तिथेच ही प्रथा पाळली जाते. आधुनिकरणामुळे लोकांचा स्थलांतर शहरांकडे झाले. जिथे माणसालाच राहण्याची सोय करण्यासाठी धडपड करावी लागते. शहरात कोणीही गाई म्हशी पाळत नाही, पुण्य म्हणून गाईला चारा द्यायचा तर शहरात गाय शोधावी लागते. त्यामुळे हळूहळू ही प्रथा शहरात लोप पावली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला वसुबारस हा सण असतो हे लक्षात येतं नाही किंवा माहिती ही नसते.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी
हिंदू धर्मियांच्या पवित्र वेदांमध्ये आयुर्वेदाचाही समावेश आहे. या आयुर्वेदाची देवता धन्वंतरी याची पूजा धनतेरस अर्थात धनत्रयोदशी दिवशी केली जाते. धन्वंतरी पूजनासोबतच या दिवशी धनसमृद्धी लाभावी म्हणून कुबेराची पूजा केली जाते. या निमित्ताने सोनं खरेदी केलं जातं. याच दिवशी यमाची पण पुजा केली जाते. ही प्रथा फक्त नावालाच राहिलेली. कारण धन्वंतरी बद्दल पाहिजे ती माहिती पुढच्या पिढीला देण्यात आली नाही. यमाच्या पुजे बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणून फक्त धनत्रयोदशी म्हणजे कुबेराची पुजा आणि पैसा सगळ्यांना महत्त्वाचा म्हणून फार कमी लोक धनत्रयोदशी पुजा करतात. सोनं, चांदी खरेदी करतात.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

तिसरा दिवस फार महत्त्वाचा या दिवसाला लक्ष्मी पुजनाचा दिवस असे म्हणतात. याच दिवसाला लोक दिवाळी मानतात, लक्ष्मी पूजन, फटाके फोडणे, फराळ करणे, जवळच्या लोकांना फराळाला बोलावणे, शुभेच्छा देणे.असा हा दिवस साजरा केला जातो. पण त्याच पण स्वरुप आता बदलत चालले आहे. यातील लोकांना फराळाला बोलावणे ही प्रथा हळूहळू बंद झाली आहे. आजच्या आधुनिक युगात इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल व लॅपटॉप वर घरी बसून सर्व काम करण्याची सवय लागली आहे. सण असो वार कोणी ही एक दुसऱ्याकडे जायचं टाळतात. मोबाईल वर भेट, मॅसेज मध्ये फटाके,फराळ आणि शुभेच्छा सुद्धा देतात. त्यामुळे प्रेम, आपुलकी जी सणाच्या वेळेला व्यक्त होत होती ती आता दिसत नाही. सर्वकाही मोबाईलच्या एका क्लिकवर करता येते तर कशाला कोणाकडे जायचं ही मानसिकता बनलेली आहे. दिवाळी लोक कशी बशी संध्याकाळी लक्ष्मी पुजन करुन साजरी करतात. त्यात नवीन विचार समोर आला आहे काही प्रमाणात तो बरोबर ही आहे की फटाके फोडले की आवाज प्रदूषण आणि हवेत पण सर्वत्र प्रदूषण होतं. सर्वजण बहुतेक सर्व आप आपल्या परीने साजरा करतात.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

चौथा दिवसाला पाडवा असं म्हणतात. या दिवशी स्री आपल्या नवऱ्याला ओवाळते. पुरुष तिला नवीन साडी किंवा किमती वस्तू भेट देतो. पाडव्याच हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. कुठल्या शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. मुहूर्तांच महत्व आजच्या पिढीला न राहिल्यामुळे हळुवार ह्या दिवसाच महत्त्व पण कमी झालेल आहे. मोजकेच लोक हा दिवस साजरा करतात.

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे या दिवसाला भाऊबीज असे म्हणतात. बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याला शुभेच्छा. भाऊ पण बहीणीला चांगली वस्तु भेट म्हणून देतो. ही परंपरागत भाऊबीज साजरी करण्यात येते. हा सण बऱ्यापैकी भाऊ बहिणी कडे येऊन किंवा उलट करुन हा सण साजरा करतात. आता भाऊ बहिण दूर दूर राहतात आपल्या कुटुंबातील दिवाळीच्या बदलेल्या पध्दती वेगवेगळ्या होतात. म्हणून ह्या सणाच पण रुप बदलेल आहेच.
पहिले दिवाळी म्हटली की घरातील साफ सफाई, रंगरंगोटी करणे, दिवाळीचा फराळ तयार करणे.आकाशकंदिल घरीच बनवून लावणे. किल्ला बनवणे. दिवाळीची तयारी आठ दहा दिवसां पासुन सुरु व्हायची. सर्व कुटुंबीय मिळून त्यांची तयारी करायचे.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

ती करताना धमाल मजा यायची. पाच ही दिवस धमाल रोषणाई. एकमेकांना फराळासाठी आमंत्रण असायची, आलेल्या सोबत गप्पा गोष्टी आपुलकीने विचारपूस असे. आनंदमय वातावरण असायचं. आता फक्त गप्पा गोष्टी, आपुलकीने विचारपूस करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांच जग फक्त मोबाईल मधूनच शुभेच्छा फराळ फटाके पाठवतात. आणि सर्व दिवाळी साजरी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकत्र कुटुंब पध्दती बंद झाली. सर्वजण आपापल्या छोट्याश्या कुटुंबात खुष राहू लागली. त्यामुळे सर्व सणाच रुपच बदलत गेले आहे.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

नव्या काळानुसार सण साजरे करण्याची पद्धत बदलते आहे. मूळ गाभा कायम राखत, आपल्या सोयीने गोष्टी केल्या जातात. सण म्हणजे एकत्र येणे, आनंद साजरा करणे, उपवासाच्या निमित्ताने डाएट सांभाळणे, पोटाची काळजी घेणे, असा विचारही पुढे येतो.

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

त्याच काही लोक वेगळ्याच पध्दती ने दिवाळी साजरी करतात. काही सामाजिक बांधिलकीतून उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातला एक भाग म्हणजे काहीजण आदिवासी पाडयावरती जाऊन दिवाळी साजरी करतात, कुणी फक्त वैयक्तिक विचार करतो म्हणून कुणी याच हक्काच्या सुट्टय़ांना पर्यटनाला जातोय, तर कुणी जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत कट्टय़ावर भेटतंय तर कुणी ‘दिवाळी पहाट’च्या सुरांत रमतंय.. दिवाळीच्या बदलत्या स्वरूपा चे असे वेगवेगळे चित्र सर्वत्र दिसत आहेत. असंच चित्र जवळपास सर्वच सणवार बाबत झालेलं आहे.पण बदल हा नेहमीच खराब असतो असं ही मानुन चालत नाही .काही रुढीना बदलण्याची गरज असते. म्हणून आपल्यालाही


कालाय तस्मै नमः
म्हणत सर्वां बरोबर पुढे गेलं पाहिजे.

केशवराव चेरकु
कोपरखैरणे नवीमुंबई

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

Akshay Trutiya Marathi Mahiti

” सणांचे बदलते स्वरूप ” Change in Marathi Festivals

Leave a Reply

%d bloggers like this: