नमस्कार वाचक मित्रांनो, तुम्हाला आम्हाला आणि जगातील सर्वांनाच माहिती आहे की, आजचं युग हे Technology चं आहे. आणि या Technology च्या युगात Computer ची अत्यंत गरज आहे. कारण, शाळा, कॉलेज, Hospital, Lab, आणि अशा अनेक Office’s मध्ये Computer चा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येकाला Computer बद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी Basic Computer Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
आजच्या article मध्ये आम्ही तुम्हाला Definition Of Computer, History of Computer, Types of Computer, What is Hardware and Software? Parts of Computer and Characteristics of Computer याबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे हा Article अगदी शेवटपर्यंत नक्की वाचा.
Basic Computer Information In Marathi
“Computer” हा शब्द “computare” या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ “गणना करणे” असे होते. त्यामुळेच Computer ला मराठी मध्ये “संगणक” असे म्हणतात. Computer चा वापर सर्वात आधी आकडेमोड करण्यासाठीच झालेला होता मात्र कालांतराने यात हळू हळू बदल होत गेला आणि आज Computer चा वापर सगळ्याच कामासाठी केला जात आहे. आणि आजकाल तर अंतराळ, चित्रपट निर्मिती, वाहतूक, व्यवसाय, रेल्वे स्थानके, शैक्षणिक संस्था, विमानतळ इत्यादींसह जगात सगळीकडे Computer चा वापर केला जात आहे. एकीकडे तर विमान, ट्रेन आणि हॉटेलमध्ये Seat Booking करण्यासाठी Computer चा वापर केला जातो. तर दुसरीकडे बँका त्यांचे काम अधिक जलद आणि अचूकपणे पूर्ण करण्यासाठी देखील Computer चा वापर केला जात आहे.
Basic Computer Information In Marathi
Definition Of Computer । कॉम्पुटर माहिती व्याख्या
आकडेमोड करणे, माहिती शोधणे आणि मिळालेल्या माहितीला साठवून ठेवणे यासोबतच इतरही यंत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम जे यंत्र करते त्या यंत्राला संगणक म्हणजेच Computer असे म्हणतात.
History of Computer । Computer चा इतिहास

“चार्ल्स बॅबेज” यांनी जगातला पहिला Computer बनविला. तसे यामध्ये अनेक लोकांचे योगदान आहे मात्र सर्वात जास्त योगदान “चार्ल्स बॅबेज” यांचे आहे. सन 1822 मध्ये त्यांनी एक मशीन तयार केली. त्या मशीन चे नाव डिफरन्स इंजिन (difference engine) ठेवण्यात आले, या मशीन मध्ये गिअर आणि शाफ्ट लावले होते व हे मशीन वाफेने चालायचे.
त्यानंतर चार्ल्स बॅबेज यांनीच सन 1833 मध्ये Difference Engine लाच विकसित करून एक नवीन मशीन तयार केले आणि त्याचे नाव analytical engine असे ठेवण्यात आले. हे मशीन आधीच्या मशीन च्या तुलनेत अधिक शक्तिशाली व प्रगत होते. आणि यालाच पहिले Computer म्हटले जाते.
Basic Computer Information In Marathi
डॉ हॉवर्ड ऐकेंस सर यांनी IBM कंपनीच्या चार इंजिनियर सोबत मिळून सन 1944 मध्ये एक विकसित संगणक तयार केले. हे संगणक सर्वात पहिले ‘विजेवर चालणारे’ संगणक होते आणि याचे नाव automatic sequence controlled calculator असे ठेवण्यात आले. हे संगणक 6 सेकंदात 1 गुणाकार व 12 सेकंदात 1 भागाकार करत होता.
सन 1945 मध्ये एटानासोफ व क्लिफॉर्ड बेरी यांनी एक इलेक्ट्रॉनिक मशीन तयार केले. याचे नाव ABC ठेवण्यात आले. ABC शब्द atansoff berry computer चे संक्षिप्त रूप आहे. आणि अशा प्रकारे हळू हळू Computer विकसित होत गेले.
Basic Computer Information In Marathi
वाचा History of computer in Marathi
वाचा Cloud computing Mhanje Kay
Types of Computer । Computer चे विविध प्रकार
Computer हे नाव ऐकले की आपल्या डोक्यात फक्त डेस्कटॉप किव्वा laptop हे दोनच प्रकार येतात मात्र याव्यतिरिक्त ही अनेक Computer आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Basic Computer Information In Marathi
- Desktop Computer
डेस्कटॉप computer हे एक असे कॉम्प्युटर आहे ज्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकत नाही तसेच या Computer ला विद्युत पुरवठा लागतो. या कॉम्प्युटर ला डेस्क म्हणजे टेबलावर ठेवले जाते म्हणून याला डेस्कटॉप computer म्हटले जाते. याचे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, प्रिंटर इत्यादी वेगवेगळे भाग असतात. आणि याचा उपयोग घर, शाळा, कॉलेज, ऑफिस इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. - Laptop Computer
दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्युटर लॅपटॉप कॉम्प्युटर आहे. ज्याला जास्त करून लॅपटॉप म्हटले जाते. लॅपटॉप मध्ये कीबोर्ड, माऊस व CPU आधीपासूनच येतात. लॅपटॉप बॅटरी वर कार्य करते व याचे वजन कमी असल्याने याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे असते. - Tablet Computer
टॅबलेट ला hand held कॉम्प्युटर म्हटले जाते. कारण याचा आकार लहान असतो व याला तुम्ही आपल्या खिशात पण ठेवू शकतात. टॅबलेट मध्ये कीबोर्ड व माउस ऐवजी टच स्क्रीनचा वापर केला जातो. आयपॅड टॅबलेट चे एक उदाहरण आहे. - Palmtop Computer
पामटॉप एक प्रकारचे पोर्टेबल कॉम्प्युटर असते यालाच मोबाईल देखील म्हटले जाते. या कॉम्प्युटर ला आपण आपल्या हातात धरू शकतात. परंतु लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या तुलनेत याची कार्य करण्याची क्षमता कमी असते.
Basic Computer Information In Marathi
What is Hardware and Software? । Hardware आणि Software काय आहे?

Computer हे Hardware आणि Software यांच्या साहाय्याने च काम करीत असते. Hardware म्हणजे असे साधन जे प्रत्यक्ष डोळ्याने दिसतात किव्वा चल स्वरूपाचे असतात. जसे की माऊस कीबोर्ड हे प्रत्यक्ष साधन आहेत जे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतात त्यामुळे यांना Hardware असे म्हणतात.
Basic Computer Information In Marathi
Software म्हणजे असे साधन जे प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाहीत किव्वा ते अचल स्वरूपाचे असतात. जसे की, वर्ड प्रोसेसर, गेम्स आणि वेब ब्राउझर हे प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाहीत मात्र यांचा वापर केला जातो त्यामुळे यांना सॉफ्टवेअर असे म्हणतात.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Hardware हे Computer चे शरीर आहे तर Software हा Computer चा आत्मा आहे.
Basic Computer Information In Marathi
Parts of Computer । Computer चे भाग
Computer च्या भागांना दोन गटात विभागले आहेत. पहिलं म्हणजे Input Device तर दुसरे म्हणजे Output Devise.
Input Device
- माऊस
- की-बोर्ड
- Scanner
- पेनड्राईव
- माइक्रोफोन
- कार्डरीडर
- डी.वी.डी.ड्राइव
Basic Computer Information In Marathi
Output Device
1.मॉनिटर
- प्रिंटर
- स्पीकर
- हेडफोन
- प्रोजेक्टर
- प्रिंटर
Basic Computer Information In Marathi
Characteristics of Computer । Computer चे वैशिष्ट्य
- Computer हे आधी Calculation साठी तयार केलेले असले तरी देखील आज ते प्रत्येक कामात वापरले जाऊ लागले आहेत. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे Computer द्वारे काम केल्याने ते काम अधिक जलद गतीने होते आणि अचूक होते.
- Computer मध्ये एकाच वेळी अनेक कामे केले जाऊ शकतात. उदा. तुम्ही Excel बनवत असाल तर सोबत च World Documents सुद्धा बनवू शकता आणि यासोबतच तुम्ही background मध्ये गाणे सुद्धा चालवून ऐकू शकता.
- आपण प्रत्येकच गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही त्यामुळे महत्वाच्या गोष्टी तुम्ही Computer मध्ये save करून ठेवू शकता. त्यामुळे तुमचे सर्व गोष्टी किव्वा document ठेवले असणार तर ते कायमस्वरूपी सुरक्षित राहतात.
- Computer चे सर्वात मोठे वैशिष्टे म्हणजे यात तुम्ही Office ची कामे घरबसल्या Work From Home करू शकता. त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठं जायची आवश्यक भासत नाही.
Basic Computer Information In Marathi
Conclusion
तर वाचक मित्रांनो, आम्ही तुम्हाला या Article मध्ये Basic Computer Information In Marathi याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलो आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास share करा. तुम्हाला या article बद्दल काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
Basic Computer Information In Marathi
1 thought on “कॉम्पुटर ची महत्वाची माहिती | Best Computer Information In Marathi 2023”