Credit Meaning in Marathi 2023 | क्रेडीट म्हणजे पैसे गेले कि आले ?

हा बँकेसंबंधी आणि आपल्या वैयक्तिक फायनान्स संबंधी अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. आपल्या भारत देशामध्ये वैयक्तिक फायनान्स या विषयांमध्ये आपण सर्व मागे आहोत असे म्हटले तरी चालेल कारण की देशातील बहुतेक लोकांना जेव्हा बँकेचा मेसेज येतो तेव्हा हा प्रश्न पडतो की क्रेडिट (Credit Meaning in Marathi) आणि डेबिट (Debit Meaning in Marathi) या शब्दांचा अर्थ काय? पैसे माझ्या खात्यात जमा झाले की कट झाले हाच मोठा प्रश्न असतो. चला तर मग आज जाणून घेऊया क्रेडिट चा मराठी अर्थ.

Credit Meaning in Marathi | क्रेडीट झाले म्हणजे काय ?

जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था त्यांच्या अकाउंट मधून आपल्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करते तेव्हा या पैशांच्या येण्याला क्रेडिट असे म्हणतात. अशावेळी समोरच्याच्या अकाउंट मधून आपल्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस पूर्ण झाली आहे असे आपल्याला कळते.

Dedit Meaning in Marathi | डेबीट झाले म्हणजे काय ?

याउलट जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवतो किंवा बँक इन्शुरन्स कंपनी किंवा कर्ज देणारी कंपनी आपल्या खात्यातून पैसे कट करून घेते तेव्हा या प्रोसेसला डेबिट असे म्हणतात.

माझ्या परवानगी शिवाय पैसे कसे कट होतात ?

कुणीही डायरेक्ट आपल्या खात्यामधून आपले पैसे कट करून घेऊ शकत नाही. तुमच्या परवानगीशिवाय बँक तुमच्या खात्यातील रक्कम कधीच इतर कोणाला देत नाही चला तर मग आता पाहूया की तुम्ही बँकेला तुमच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला पाठवण्यासाठी कशा पद्धतीने परवानगी देतात.

  1. बँकेमध्ये जाऊन स्लिप भरणे
  2. यूपीआयचा पिन टाकून दुसऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी परवानगी देणे

Auto debit Meaning in Marathi

एखाद्या ऑटो डेबिट फॉर्मवर सही करणे. ही गोष्ट इन्शुरन्स किंवा कर्ज यांचे हप्ते भरताना पाहिली जाऊ शकते या केस मध्ये तुम्ही सुरुवातीला सही केलेला ऑटो डेबिट फॉर्म इन्शुरन्स किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेला तुमच्या खात्यातील रक्कम कट करून घेण्याची परवानगी देते.

टर्म इन्सुरांस म्हणजे काय ते वाचा

OTP meaning in Marathi

एखाद्या ट्रांजेक्शनचा ओटीपी टाकने. यामध्ये तुमच्या अकाउंट मधून पैसे कट करण्याचे परवानगी तुम्ही दिली आहे हे हे चेक करण्यासाठी बँक तुमच्या खात्याला जोडलेल्या मोबाईल वरती एक वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी पाठवते आणि जेव्हा तो व्हेरिफाय होईल तेव्हाच तुमच्या अकाउंट मधून पैसे कट करण्यास किंवा डेबिट करण्यास परवानगी देते.

5) इंटरनेट बँकिंग या प्रकारामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यातील पैसे इंटरनेट बँकिंग अकाउंट मध्ये लॉगिन केल्यावरती कट होतात

वरती आम्ही पैसे कट होण्याचे मुख्य प्रकार दिले आहेत तुम्हाला जर याबाबतीत अजून माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

फिस्तुल्या चा मराठी अर्थ वाचा

Credit Debit meaning in marathi| क्रेडीट डेबिट म्हणजे काय ?

1 thought on “Credit Meaning in Marathi 2023 | क्रेडीट म्हणजे पैसे गेले कि आले ?”

Leave a Reply

%d bloggers like this: