साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत अर्चना कुलकर्णी यांनी Dasara Marathi Prem Katha या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Marathi Prem Katha 2023
साहित्य बंध समूह आयोजित साप्ताहिक उपक्रम क्र.१
दिनांक १०/१०/२०२३
लेखक
अर्चना कुलकर्णी, ठाणे
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Marathi Prem Katha 2023
माझ्या आठवणीतला दसरा | Dasara Marathi Prem Katha
मी मूळची जळगावची (खांदेशची).
नोकरीच्या निमित्ताने डोंबिवलीत आले.माझ्या आत्याकडे मी रहायचे. आत्याचे घर म्हणजे एक कौलारू खोली. त्या वाड्यात तीन कौलारू खोल्या होत्या.आत्याच्या खोलीला लागून मालकांचे सिमेंट काॅंक्रीटचे टुमदार घर होते.त्याची गच्ची आत्याच्या खोलीच्या कौलांना जोडून होती.
घरात आत्याचे चौकोनी कुटुंब आणि मी रहायचो.वाड्यातील सर्व मंडळी खूप आनंदाने मिळून मिसळून रहायची. गप्पा, पत्ते, खरेदी, नाटक, सिनेमा, पार्टी, पिकनिक भरगच्च कार्यक्रम असायचे. मालकीण बाईंचा भाचा त्यांच्याकडे रहायचा . तो देखील नोकरीच्या निमित्ताने डोंबिवलीत आला होता.
आमची छान मैत्री झाली. वर्षभरानंतर मला जाणवलं की ही मैत्री जरा जास्तच घट्ट आहे.मग मनात विचार आला,
“पण हे मलाच वाटत असेल का? बोलावे याबाबत त्याच्याशी? “

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Marathi Prem Katha 2023
दिवस सरत होते आणि प्रश्न अनुत्तरित रहात होते.त्या दिवशी दसरा होता. त्या दिवशी दुपारी आत्या आणि मामा त्यांच्या भावाकडे एक दिवसासाठी नेरळला गेले होते.दोघे लहान मुलं आणि मी घरी होतो. दुपारी दोन वाजता ‘तो’ खूप आनंदात आमच्या खोलीच्या खिडकीतून डोकावून म्हणाला,
“मी मित्रांबरोबर ठाण्याला जातोय.संध्याकाळी एक सरप्राइज देणार आहे.तू आहेस नं घरी?”
मी निर्विकारपणे “हो” म्हटलं. का कुणास ठाऊक पण मला वाटले की तो बहुतेक त्याच्या मैत्रिणीला घेऊन येईल.तिची ओळख करून देण्यासाठी.
दसर्याचा दिवस गडबडीत मावळला.
रात्रीचे दहा वाजले पण तो काही आला नाही.मुलं आणि मी जेऊन झोपलो.बराच वेळ झोप लागत नव्हती. कसाबसा डोळा लागला.
रात्री केव्हातरी जाग आली.काहीतरी तोंडाला लागले.डोळे उघडले तर कौल बाजूला सारून कुणीतरी डोकावत होते.मी खूप घाबरले पण हिंमत एकवटून उठले . लाईट लावला तर काय ‘तो’ कौलातून डोकावत होता आणि दार उघड असे खुणावत होता.
काय करावे मला सुचेना.तशी दारावर बारीक टकटक ऐकू आली.मी दार उघडताच तो आत आला.सरळ मला म्हणाला ,
” आय लव यू.”
” साॅरी, असं अवेळी यायला नको होते. मला ठाण्याहून यायला उशीर झाला पण आज बारा वाजेच्या आत ‘ हे’ सांगायचे होते.”
असे एका दमात सांगून झटकन् माझ्या गालावर निसटते चुंबन देऊन तो निघून गेला.
त्या क्षणी आमच्या सहजीवनाचा पाया रोवला गेला. आज पन्नास वर्षांपासून आनंददायी सहजीवन अनुभवत आहोत. दर वर्षी “त्या” दसर्याची आठवण आवर्जून येते.😊😊
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Marathi Prem Katha 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasara Marathi Prem Katha 2023