साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर यांनी Dasra Marathi Katha या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023
✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर. मो.क्र.९७३०७९८२७९
माझ्या आठवणीतील दसरा | Dasra Marathi Katha
“दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा” हे वाक्य मी लहानपणापासूनच ऐकत आलो आणि ते खरंही आहे कारण दसऱ्यापासूनच सणांचा राजा दिवाळीचेही वेध लागतात. रावणदहनात वाजणारे फटाके सांगतात आता दिवाळसणासाठी फटाके लागणार बरं. आता माझ्या आठवणीतील दसरा याविषयीही सांगतो.
गोष्ट चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची असेल आमच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच माझे वडील कै. दत्तात्रेय वाघरूळकर हे वाघरूळसारख्या खेडेगावात पौराहित्य/ भिक्षुकी करून आमच्या चार भावडांसह परिवाराचं भरणपोषण करत होते. यजमानांचीही आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती पण मन मात्र उदार होते. देण्याची वृत्ती होती, देण्यात आनंद अन् समाधान शोधण्याची प्रवृत्ती होती.
आईला नवरात्राचे उपवास होते. आमचे ग्रामदैवत असलेली आणि माहूरची अंबिका व तुळजापूरची भवानी एकाच ठिकाणी असलेले महाराष्ट्रातील एकमेव देवी स्थान श्रीक्षेत्र वाघरूळ देवी मंदिरात अनेक महिला घटी बसलेल्या होत्या सर्वांच्या चेहऱ्यावर नऊ दिवसांच्या उपवासाचा थकवा जाणवत होता परंतु देवीभक्तीचा आनंद मात्र ओसंडून वहात होता. नववी-दसरा एकच आलेला होता. घराघरांतून पुरणपोळीचा घमममाट येत होता. सर्वजण देवीला महानैवेद्य दाखवून उपवासाचे पारणे करत होते. सायंकाळी सीमोल्लंघनाला पुरूषमंडळी बरोबर आम्ही भावंडंही सजूनधजून निघालो. शमी व आपट्याच्या वृक्षाचं पूजन, शस्त्रपूजन आणि सरस्वतीपूजन केल्या गेलं देवीमंदिरातील उंच दीपमाळ पाजळली गेली आणि आम्ही घराच्या दिशेने परतीकडे निघालो.
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023

माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023
समवयस्क मुले एकमेकांना आपट्याची पाने (सोनं) म्हणून देतघेत होतो. आपट्याच्या पानांचा आकारही हृदयासारखाच आहे. जणू ते संदेशच देतात “एकमेकांची हृदयं जोडून ठेवा”. घरोघरी जाऊन वडीलधाऱ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले. अन् दसरादिवस आनंदानं पार पडला.
आज खूपच परिस्थिती बदलली खायला रोजच गोडधोड मिळतं त्यासाठी सणवारांची वाट पहायची गरज. आज सण उत्सवांना इव्हेंटचं रूप आलंय पण तो चाळीसपन्नास वर्षांचा उत्साह, आनंद मात्र हरवलेला दिसतो.
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023
1 thought on “माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Marathi Katha 2023”