साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ भक्ती संकेत केंजळे यांनी Dasra Marathi Story या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
साहित्य बंद समूह आयोजित उपक्रम
दिनांक 10 ऑक्टोबर 2023
लेखक
सौ भक्ती संकेत केंजळे,
करंजे पुणे
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
माझ्या आठवणीतला दसरा | Dasra Marathi Story
लहानपणी कोणी विचारलं की तुमचा आवडता सण कोणता? तर मी डोळे झाकून म्हणायचे की माझा आवडता सण म्हणजे दसरा त्याला विशेष असं काही कारण नव्हतं पण त्या लहान वयातही मला दसरा हा शब्द आवडला होता दसऱ्याला सरस्वती देवीचे पूजन करण शिवाय एकमेकांना सोनं वाटणं या साऱ्याच गोष्टींमध्ये एक मौज मजा होती

माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
त्या वयात त्या सणांना विशेष महत्त्वही होतं आणि सगळेच आवर्जून तो सण साजरा ही करायचे आवर्जून ती आपट्याची पानं आणणं नेहमीच पाटीमध्ये आणि नंतर वह्या पुस्तकांची पूजा करणे या सर्व गोष्टी तेव्हा व्हायच्या नवीन कपडे घ्यायला दसऱ्यापासून सुरुवात व्हायचे आणि दसरा म्हटलं की दिवाळीचे वेधही लागायचे ते वेगळेच, आता मी सांगते माझ्या आठवणीतला दसरा त्यावेळी मी बिल्डिंगमध्ये राहणारी मुलगी होते आणि बिल्डिंग म्हटलं की बायका, कुटुंब एकमेकांकडे सोनं वाटपासाठी हळदीकुंकू साठी जायचेच आवर्जून आणि सोनं वाटणं म्हणजे लहान मुलांनी मोठ्यांना सोनं देणं आणि त्यांच्या पाया पडणं हा उपक्रम त्यावेळेला व्हायचाच ,
तर त्यावेळेला मला आठवतं की चौथी मध्ये असताना आदल्या दिवशीच आई-वडिलांनी मंडईतून आपट्याची पानं खरेदी केली होती आणि दुसऱ्या दिवशीशी सगळी तयारी झाली होती दुसऱ्या दिवशी उठून सगळं आवरून स्वच्छ आंघोळ वगैरे झाली की पाठीवरती सरस्वती देवीचे चित्र काढून झेंडूची फुलं वगैरे आणून साग्रसंगीत पूजा केली होती ,पाटीला ओवाळले होते ,काळ्यापाठीवरती पांढरया पेन्सिलने सरस्वती देवीचे चित्र काढणं आणि तिची पूजा करणं हे खरोखरच भाग्याचं असं तेव्हाही वाटायचं आणि ती पूजा झाली, कि ती पाटी घेऊन शाळेमध्ये जायचं आणि शाळेमध्ये तेव्हा विशेष उपक्रम असायचा सगळ्यांनी पाठीवरती सरस्वती देवीचं रेखाटन केलेल्या पाट्या या एके ठिकाणी ठेवायच्या आणि शाळेत परत ती पूजा केली जायची,
शाळेमध्ये अशाप्रकारे सर्वांनी सहवर्ग अशी पूजा केली की शाळेमध्ये गोड खाऊ पण दिला जायचा तोही आठवतो आहे त्याची चवही वेगळीच होती आणि त्या वेळेला ते खूप आवडायचे , शिवाय त्यावेळी दसऱ्याला स्पेशल साडी घालून शाळेमध्ये जाणार असायचे म्हणजेच काय तर नटण्या मुरडण्याची हौसही लहानपणी होती त्यामुळेच ती हाऊसही भागवली जायची आणि त्या बालवयात सगळ्यांनी साडी परिधान करून जायला खूपच मजा यायची आणि साडी घालायची म्हटली की आमच्या सोसायटी मधले आमचे शेजारी म्हणून होते ते साडी घालायला मदत करायचे आणि प्रत्येक दसऱ्याला ते अशा प्रकारे नटून थटून द्यायचे त्यामुळे तो एक आठवणीचा क्षण त्यावेळेला विशेष आठवतो
अशाप्रकारे तो दसरा शाळेत साजरा करायचा माझी शाळा ही मराठी मिडीयम ची भारत इंग्लिश स्कूल मधली शिवाजीनगर इथली होती आणि त्या वेळेला तिचं वैशिष्ट्य ही वेगळं होतं त्यावेळेला शाळेमध्ये जायला खूपच मजा यायची अशा प्रकारचा माझा लहानपणीचा आठवणीतला दसरा आहे.
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023
1 thought on “माझ्या आठवणीतला दसरा | Best Dasra Marathi Story 2023”