साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Dasra Story In Marathi या कीवर्ड वर आधारित “माझ्या आठवणीतील दसरा” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
रवी आटे
सानपाडा नवी मुंबई
9324745970
माझ्या आठवणीतील दसरा | Dasra Story In Marathi
जेवढे वर्ष वय झाले तेवढे दसरे येऊन गेलेले आहेत! सर्वच दसरे आठवणीत राहणे केवळ अशक्य आहे .मात्र काही दसऱ्याच्या आठवणी मानस पटलावर एवढ्या खोलवर अंकित झालेल्या आहेत की काही केल्या त्या विसरल्या जात नाहीत. हा दसरा जर मग बालपणातील असेल तर तो किती स्पष्टपणे मनावर प्रतिबिंबित झालेला असेल! जेव्हा जेव्हा बालपणीच्या आठवणी येतात तेव्हा तेव्हा त्या निवांत क्षणांत हा जीवनातील एक दसरा माझ्या आत आत डोकाऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. या दसऱ्यात मी ही डोकाऊन बघतो. केवळ डोकावून बघत नाही तर बालपणाच्या स्मृतींच्या त्या अथांग आठवणींच्या सागरात अक्षरशः बुडून जातो. स्थळ आहे एस पी कॅम्प south point camp… पुलगाव कॅम्प… तालुका देवळी जिल्हा वर्धा.
आमचे निवासस्थानक क्रमांक बारा बाय सात… दसरा बघण्यासाठी आमच्या एस पी कॅम्पमधून मी माझ्या बालसवंगड्यांसोबत एस पी कॅम्प टेकडी कडून भैरव बाबा मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो. इ पी बॅरेक्स East point barrics दुरूनच ओलांडल्यानंतर मारवा कंपनी ला लागून असलेले वाचन वाड actually watch and wait लागले. आमच्या डाव्या बाजूला हिरवीगार शेती व आमच्या लेबर कॅम्प हायस्कूल कडे जाणारा रस्ता… मात्र आम्हाला तिकडे न जाता भैरव बाबा देवस्थानाकडे नवरात्रीच्या उत्सवाकरिता जायचे होते. अर्थातच नवरात्रीच्या उत्सवा साठी त्यापूर्वी दोन-तीनदा येऊन गेलो होतो.
नगरपालिका असलेल्या लहानशा पुलगाव शहरात उभा असलेला प्रचंड मोठा रावण नजरेत अजूनही तसाच टिपून राहिलेला आहे. सदर रावण दहनाची सुरुवात माझ्या एका मित्राच्या अभियांत्रिकी विभागातील mes आजोबांनी केली होती असे नंतर कधीतरी कळले. नवरात्रीच्या व दसऱ्याच्या विविध धार्मिक प्रथा …सन साजरा करण्याच्या पद्धती या आता आहेत तशाच त्यावेळी देखील होत्या पण बालपणाच्या संवेदनशील मनामुळे तेव्हाचे दसरे आताच्या दसऱ्यांपेक्षा जास्त लक्षात राहिलेत. रावण दहनासाठी आमच्याच क्षेत्रातील मुले मुली राम लक्ष्मण सीता चा वेष परिधान करायचे.
मी ज्या दसऱ्याच्या आठवणी सांगत आहे तो देखील दसरा असाच होता. प्रचंड मोठा रावण त्याचे मधले मोठे तोंड व बाजूला चार व दुसऱ्या बाजूला पाच तोंडे. हा दशमुखी रावण निष्णात कलाकारांनी बनविल्यासारखा दिसत होता. त्याचा खूप मोठा पट्टे पट्टे असलेला स्कर्ट उठून दिसत होता. भैरव बाबा मंदिरात शेवटची नवरात्रीची पूजा झाल्यानंतर सर्व लोक दसरा मैदानासमोर लाखोंच्या संख्येत गोळा झाले. यात पुलगाव शहर पुलगाव कॅम्प व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा समावेश होता.

माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
रामाने बाण मारल्याचा देखावा निर्माण करण्यात आला .प्रत्यक्षात रावणापासून काही अंतरापर्यंत रॉकेल मध्ये भिजविलेली तारेला बांधलेली दोरी असायची. दोर जळत जळत रावणाला स्पर्श करायचा व मग रावण पेटायचा . या दसऱ्यातही तसेच झालेले होते. रावण दहनापूर्वी मी हातगाड्यांवर विकायला असणारी प्लास्टिकची थोडी खेळणी वगैरे घेतली होती. बहुदा मी पाचवी सहावीत होतो. पण यात जरा एक गडबड झाली. सोबतचे मित्र गर्दीत कुठे हरवले ते कळलेच नाही. शिवाय सायंकाळी परतताना जवळजवळ रात्रच होणार असल्याने घरी एकटे पोहोचण्याचा ताण देखील होता. पण सुदैवाने मित्रांची भेट झाली होती.
रावण दहन होताच आकाशात रंगीबेरंगी हजारोंच्या संख्येत दिवाळीचे फटाके आकाशात पसरवण्यात आलेत. फटाक्यांच्या मोठ्या आवाजासह. त्यावेळी मोबाईल फोन असते तर ते सुंदर दृश्य टिपून ठेवले असते. तेवढे सुंदर दृश्य मी खरे सांगतो जीवनात त्या नंतर मला कधीही बघायला मिळाले नाही. राजीव गांधी सीलिंकच्या लेझर शोच्या वेळी मला माझ्या बालपणाच्या त्या दसऱ्याची तीव्र आठवण झाली होती . अतिशयोक्ती वाटेल पण या लेझर शो पेक्षा त्या वेळेचे दृश्य अतिशय सुंदर होते.
गर्व कशाचाही नसावा मात्र आमच्या प्रिय पुलगावचा गणपती उत्सव व रावण दहनाचा उत्सव बघण्यासाठी आमच्या पुलगाव शहरात व पुलगाव कॅम्पात अमरावती व नागपूर पासून लोक यायचे.
खोटे कशाला सांगणार. लेख तर आहे! तर असा तो पाचवी सहावीत पाहिलेला दसरा आताही जसाच्या तसा लक्षात आहे. हा दसरा कायमस्वरूपी मनावर एखाद्या शिल्पा सारखा कोरलेला आहे! अर्थातच मनाला कोणत्याही वेदना न होता!!! या उलट या दसऱ्याच्या आठवणीने मन उमललेल्या गुलाबासारखे टवटवीत व प्रफुल्लित होऊन जाते. बालपणाच्या स्मृतींचा हा ठेवा दसऱ्याच्या लेखाच्या निमित्ताने आपणासमोर सादर केला.
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
Ashadhi Ekadashi Shubhechha in Marathi
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023
3 thoughts on “माझ्या आठवणीतील दसरा | Best Dasra Story In Marathi 2023”