इतिहासात फक्त एकदा पडलेला किल्ला | Daulatabadh Fort Information in Marathi 2023

जुन्या काळात देवगिरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावात असलेला किल्ला Daulatabadh Fort Information in Marathi आपण पाहणार आहोत. अभेद्द म्हणून प्रसिद्ध होता.

Daulatabadh Fort Information in Marathi

दौलताबाद हा किल्ला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत या गावांमध्ये आहे. या किल्ल्याला देवगिरी म्हणून देखील ओळखल्या जाते. देवगिरी हे या किल्ल्याचे पुरातन नाव. नंतर “देवगिरी” सोडून याला दौलताबाद असे नाव ठेवण्यात आले. “दौलताबाद” हे नाव त्या गावावरून ठेवले असावे.
या किल्ल्याला गिरीदुर्ग प्रकारीत किल्ला असे देखील म्हणतात. या किल्ल्याचे बांधकाम यादव वंशाच्या काळात झाल आहे.
हा किल्ला शंकूच्या आकारच्या डोंगरावर आहे.

या किल्ल्याचे सर्वाश्रेष्ठ वैशिष्ट्य कोणते?

या किल्ल्यावर अनेक राजांनी आक्रमण केले पण कुठल्याच राजाला हा किल्ला जिंकता आला नाही .हे या किल्ल्याचे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
दौलताबाद या किल्ल्याचा सात चमत्कारांमध्ये समावेश केला जातो.

देवगिरीचा इतिहास

दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याने १३२६ मध्ये आपली राजधानी देवगिरीवर आणली आणि देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद ठेवले. पण मात्र दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. या किल्ल्याला तो एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला.

देवगिरी साम्राज्याची राजे कोण होते?

राजा रामचंद्र हे १२७१ मध्ये गादीवर बसले. अति कठोर बंदीसाठी हा किल्ला ओळखला जातो.

दौलताबाद किल्ला का प्रसिद्ध आहे?

या किल्ल्याची महत्त्व आणि संपन्नता अशी होती की मोहम्मद बिन तुघलक ने चौदाव्या शतकात त्याची राजधानी दिल्ली वरून येथे हलवली. त्याने या शहराचं नामकरण केलं या नावाचा अर्थच “संपत्तीचे निवासस्थान” असा होतो. दशकभर शती पर्यंत दौलताबाद ही त्याची राजधानी होती.

दौलताबाद कोणी बांधले?

सुमारे ११८७ च्या आसपास पहिला यादव राजा भिल्लमा याने बांधला होता. पण १३०८ मध्ये दिल्ली सलनतनच्या सुलतान अल्लाउद्दीन खलजीने यावर ताबा घेतला.

देवगिरी किल्ला कधीच ताब्यात घेतला नाही ?

देवगिरी किल्ला कधीच ताब्यात घेतला गेला नाही का हा प्रश्न
कित्येकांना पडला असेल? या किल्ल्याची बांधणी बेसाल्ट नावाच्या पर्वताच्या खडकापासून झाली आहे. याला खोलवर बाजूला कापूस बांधण्यात आला. या किल्ल्याला कोणीच कष्टाने जिंकले नाही तर हा किल्ला जिंकण्यासाठी नेहमी कपटा चा उपयोग केला गेला. हा किती ला दिसायला अप्रतिम ,अनोखा आणि अभ्यद्य आहे.


Daulatabadh Fort Information in Marathi 2023

घनगड किल्ल्याची माहिती | Ghangad Fort Information in Marathi

Fort of Maharashtra – Manjarsumbha Fort


देवगिरी किल्ला आतील रचना कशी आहे?

94 एकर क्षेत्रफळामध्ये दौलताबाद किल्ला विस्तारला गेला आहे. या किल्ल्याचे बांधकाम अविश्वसनीय आहे आणि मानवाच्या बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे हा दौलताबाद किल्ला आहे. समोरील दृष्टिकोनासाठी यामध्ये भरपूर किल्लेदार क्षेत्र आहे. अंबरकोट हे सामान्य लोकांचे क्षेत्र आहे ते या किल्ल्यामध्ये दिसून येते.

येथे च बालकोट आहे, या ठिकाणी ध्वज फडकवला जातो.
कलाकोट हे शाही रहीवाशी क्षेत्र आहे. तसेच या किल्ल्यावर जुने मंदिरे,जलाशय ,मशिदी, विहीर, इमारती, राजवाडे यांचा समावेश आहे.ज्या वेगवेगळ्या वर्षांनी बांधलेले आहेत. त्याच बाजूला एक अरुंद पूल आहे ,ज्यावरून फक्त दोनच माणसे जाऊ शकतात ,आणि तोच मार्ग किल्ल्यामध्ये जाण्याचा योग्य मार्ग आहे.

देवगिरी किल्ला वर पाहण्यासारखी कोणती ठिकाण आहेत?

पहिल महत्त्वाच ठिकाण म्हणजे चांद मिनार

चांद मिनार हा बहामानीच्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या एक सुंदर मिनार आहे. मुन टावर देखील या मिनार याला म्हटले जाते. हा मीना 34 मीटर उंच आणि 21 मीटर रुंद आहे. या मीनाराच्या खालच्या बाजूला म्हणजेच पायथ्याशी एक मशीद देखील पाहायला मिळते.

चीन महाल

चिनी महाल हे या किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची इमारत आहे जे आजही पर्यटकांना पाहायला मिळते. चीन महान या इमारतीचा उपयोग मुघलांच्या काळामध्ये औरंगजेबाने एक कैदखाना म्हणून केला होता ज्यामध्ये अबुल हसन ताना शहा जो की गोलकांडा चा राजा होता. बारा वर्षे या महाल मध्ये कैद करून ठेवले होते.

तसेच येथे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे सरस्वती बावडी, हाती हौद, खोटी दारे, तीन पदरी सुरक्षात्मक दारे इत्यादी ठिकाणी आहेत

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Reply

%d bloggers like this: