बारावी नंतर काय? सुचत नाही आहे? कुठल्या फिल्डमध्ये आपलं करिअर बनवायचं सुचत नाहीये? DMLT Course Information In Marathi हा लेख तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.
DMLT Course Information In Marathi
मित्रांनो डीएमएलटी कोर्स हा दोन वर्षाचा कोर्स असतो. आणि यालाच आपण पॅरामेडिकल कोर्स असे देखील म्हणतो. याचे संपूर्ण नाव म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असा होतो. अकरावी बारावी ,सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी या कोर्सला अप्लाय करू शकतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कुठल्याही पॅथॉलॉजी लॅब मध्ये सहज नोकरी मिळून आपलं करिअर टेक्निशियन म्हणून करू शकता.

DMLT Course Information In Marathi | Best DMLT कोर्स माहिती 2023
अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपलं करिअर बनवायचं असतं. पण आर्थिक अडचणीमुळे ते त्या क्षेत्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. मुल टॅलेंटेड असतात पण ते करू शकत नाही. त्या सर्वांसाठी हा उत्तम कोर्स असतो डी एम एल टी या कोर्स साठी तुम्हाला जास्त फीज ही लागत नाही. खूप कमी खर्चामध्ये तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. इतकच नाही तर एक उत्तम करिअर या द्वारे तुम्ही घडवू शकता.
डीएमएलटी कोर्स – करिअरची व्याप्ती
आजच्या काळामध्ये मेडिकल फिल्ड याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकच विद्यार्थी हा मेडिकल फिल्म मध्ये जाण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. आणि आजच्या काळात सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम कोर्स हे डीएमएलटी कोर्सला मानलं जातं .एक काळ असा होता की त्या काळामध्ये फक्त अभियांत्रिकी क्षेत्र लोकांना आवडायचं पण आता तसं होत नाही.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कुठल्याही मोठ्या रुग्णालयामध्ये पॅथॉलॉजी मध्ये सहज नोकरी मिळून स्वतःच करिअर बनवू शकता .तुम्हाला यामध्ये तुमच्या भविष्यासाठी अनेक पर्याय मिळतात. तुम्ही कुठल्याही हेल्थ केअर सेंटर मध्ये टेक्निशियन म्हणून काम करू शकता .इतकच नाही तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्य करू शकता.
तुम्ही या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक लॅब तंत्रज्ञ, संशोधन केंद्रामध्ये तसेच अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सहज नोकरी मिळू शकतात.
डीएमएलटी कोर्स कोठून करावा
तुम्हाला तुमच्या शहरांमध्ये कुठेही डीएमएलटी कोर्स हा सहज करण्यासाठी अनेक कॉलेज उपलब्ध मिळून जाणार. सरकारी मान्यता नसलेल्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश करू नका त्याची संपूर्ण माहिती काढा आणि नंतरच प्रवेश घ्या. ज्या कॉलेजला सरकारी मान्यता आहे आणि तिथे तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्वच सोयी सुविधा उपलब्ध असेल, त्याच ठिकाणी तुम्ही ऍडमिशन करा जेणेकरून तुम्हाला सुविधांचा लाभ घेता येईल आणि तुमचे प्रशिक्षण हे चांगल्या कॉलेजमधून होईल.
डीएमएलटी कोर्स – फी
प्रवेश हा खाजगी कॉलेजमध्ये घेत असाल तर तुमचा खर्च 40 ते 60 हजार रुपये पर्यंत जाऊ शकतो .तिथेच सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेत असाल खूप कमी पैस्या मध्ये तुमचा कोर्स कम्प्लीट होतो.
डीएमएलटी कोर्ससाठी पात्रता
जर तुम्हाला या फिल्डमध्ये तुमचं करिअर बनवायचं असेल, तर हे करिअर तुमच सक्सेसफुल होऊ शकतो .कारण डीएमएलटी कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावी मध्ये जीवशास्त्र आणि गणित हे विषय असणे गरजेचे आहे. हा कोर्स दोन वर्षाचा असतो तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कुठल्याही रुग्णालयामध्ये पॅथॉलॉजी मध्ये लॅब टेक्निशियन या पोस्टवर काम करू शकता. याशिवाय तुम्ही स्वतःचा खाजगी पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर सुरू करू शकता.
प्रयोगशाळा तंत्रज्ञाची कार्ये
यामध्ये तुम्हाला रक्ताचे नमुने किंवा इतर नमुने घेऊन त्याचा तपास करायचा असतो. यामुळे कुठल्या रोगाची लागण झाली आहे का? हे माहिती पडून त्या रोगाच निदान लावण्यास मदत होते .या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही आणखी मोठ्या पोस्टवर जाऊन मोठी पदवी मिळू शकतात.
पगार
हा कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा काम करायला जाता, तेव्हा तुम्हाला सुरुवातीचा पेमेंट हा पाच ते दहा हजार असू शकतो. पण जसा जसा तुमचा अनुभव वाढतो आणि तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजेच एक्सपिरीयन्स लेटर मिळतं त्यानंतर तुम्हाला 25 ते 30 हजार पर्यंत मिळू शकतो.
Read More
Neet Exam Information in Marathi
Mpsc syllabus and my success story
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

1 thought on “DMLT Course Information In Marathi | Best DMLT कोर्स माहिती 2023”