Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री सुद्धा होते. त्यांनी इथल्या अस्पृश्य लोकांसाठी, कामगार लोकांसाठी, स्त्रियांसाठी मोलाची कामगिरी बजावली. ते थोर समाजसुधारक होते यासोबत च ते  न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, आणि राजकारणी सुद्धा होते. त्यांनी सर्व समाजातील लोकांना जात आणि धर्माबद्दल भेदभाव न करता सर्वांना समान न्याय आणि हक्क मिळवून देणारा भारताचा संविधान आपल्या देशाला बहाल केला. आपण आज अशाच एका थोर पुरुषाबद्दल माहिती बघणार आहोत.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ  बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव मालोजीराव सपकाळ होते. मालोजी यांनी सैनिक शाळेमध्ये शिक्षण घेता आले कारण ते आधी इंग्रजी राजवटीच्या सैन्यात सिपाई म्हणून काम करत होते. मालोजीरावांनी “रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती त्यामुळे त्यांच्या घरात शुद्ध विचार आणि आचार यांना जास्त महत्व होते. मालोजींना आधी दोन मुले झालीत त्यांच्या नंतर मीराबाई नावाची एक मुलगी झाली आणि शेवटी इ. स. १८४८ च्या सुमारास रामजी यांचा जन्म झाला.

रामजी हे मालोजी यांचे चौथे अपत्य होत. त्यांचा पहिला मुलगा सन्यासी झाला, दुसरा मुलगा इग्रजी सैन्यातच नोकरीला लागला आणि तिसरा मुलगा “रामजी”हे इ. स. १८६६ मध्ये म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजी सैन्यामध्ये सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. नंतर त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी इंग्रजी सैन्यातील मुरबाड चे सुभेदार यांची १३ वर्षीय कन्या भीमाबाई यांच्याशी लग्न केले.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

बाबासाहेबांचे वडील श्री रामजी आंबेडकर

रामजी हे फार धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, इत्यादी अनेक संतांचे अभंग तोंड पाठ केले होते. ते नित्य “ज्ञानेश्वरी” चे वाचन करीत असत यासोबतच ते सकाळी स्त्रोत, भूपाळी सुद्धा म्हणत असत. रामजी यांनी सैन्यात असतांनाच इंग्रजीचे शिक्षण चालू केले होते त्यामुळे त्यांनी नॉर्मल स्कूल म्हणजे मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांची सैन्यामधून पदोन्नती होऊन त्यांची नॉर्मल स्कूल मध्ये शिक्षक म्हणून पदवी मिळाली. त्यांना उत्तम शिक्षक व्हायचे होते त्यामुळे त्यांनी पुण्या मध्ये जाऊन उत्तम शिक्षण व्हायचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर ते उत्तम शिक्षक झाल्यामुळे त्यांची पुन्हा पदोन्नती झाली आणि ते “मुख्याध्यापक” झाले.

मुख्याध्यापक पदावर ते सलग १४ वर्षे राहिले आणि शेवटी त्यांना “सुभेदार” पदी निवड करून त्यांची बढती झाली. रामजी व भीमाबाई यांना इ. स. १८९१ पर्यंत १४ अपत्य झाली त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या तीनच मुली जगल्या आणि बाळाराम, आनंदराव व भीमराव हे तीन मुलं जगली. भीमराव हे त्यांचे सर्वात लहान आणि १४ वे अपत्य होत.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

सुभेदार रामजी यांना जेव्हा मुख्याध्यापक पद मिळाले होते तेव्हा ते ज्या पलटण मध्ये होते ते पलटण इ. स. १८८८ मध्ये मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी आले होते. त्याच ठिकाणी १४ एप्रिल १८९१ मध्ये रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांचे नाव “भीवा” ठेवण्यात आले. पुढे त्यांचे भीमा, भीम, भीमराव हे नावे सुद्धा पडले. आंबेडकरांचे कुटुंब त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या “महार” या जाती मध्ये होते. त्यामुळे त्यांना नेहमीच सामाजिक आणि आर्थिक भेदभाव करून त्यांना त्रास दिला जाई.

इ. स. १८९४ मध्ये रामजी यांनी मुख्याध्यापक या पदाची निवृत्ती घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या ठिकाणी राहायला आले. त्यावेळी भीमरावांचे वय हे फार लहान असल्यामुळे त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळू शकला नाही त्यामुळे त्यांना घरी अक्षरांची ओळख करून देण्यात आली. इ. स. १८९६ मध्ये त्यांनी दापोली सोडलं आणि सातारा या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरी राहायला लागेल. त्यावेळी भीमरावांचे वय हे पाच वर्षाचे झाले होते त्यामुळे त्यांना तेथील कॅम्प स्कुल या शाळेमध्ये त्यांना दाखला मिळाला.

आईचे निधन

याच वर्षी रामजी यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्याच वेळी काही दिवसात भीमरावांची आई भीमाबाई यांचं मस्तकशुल या आजाराने निधन झाले. त्यामुळे भीमा सोबत अन्य मुलांचं संगोपन त्यांची आत्या मिराबाई यांनी अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये केलं. नंतर रामजींनी इ. स. १८९८ मध्ये जिजाबाई नावाच्या एका विधवा स्त्री सोबत विवाह केलं.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

पूर्वी महाराष्ट्रातील लोकं आपले आडनाव हे आपल्या मुळ गावाच्या नावाने ठेवून त्यास शेवटी “कर” हा शब्द जोडत होतें. आणि रामजी यांचे मूळ गाव हे आंबडवे हे होते. (काही ठिकाणी त्यांच्या गावाचं नाव अंबावडे असा चुकीचा उल्लेख केलेला आहे.) त्यामुळे रामजी यांनी इ. स. १९०० मध्ये “सकपाळ” हे आडनाव खोडून “आंबडवेकर” हे आडनाव धारण केले. भीमरावांचे कॅम्प स्कूल मधले मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामजी यांनी ०७ नोव्हेंबर १९०० मध्ये पुढील शिक्षणासाठी सातारा मधील गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणजे आताचे प्रताप हायस्कूल या ठिकाणी “आंबडवेकर” या आडनावाने त्यांना दाखल केले.

मुंबईला शिक्षण आणि लग्न

डिसेंबर १९०४ मधे रामजी आपल्या कुटुंबा सोबत मुंबई ला आले आणि तेथीलच एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. त्या शाळे मध्ये भीमराव हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांना वेगळे च बसायला लागत होते. रामजी हे लष्कर मध्ये असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या जोरावर तिथे admission करून घेतले. नंतर तिथे शिकत असतांनाच १९०६ मध्ये वयाच्या १४ ते १५ व्या वर्षी त्यांचा विवाह दापोलीच्या भिक्कु वलंगकर यांची ०९ ते १० वर्षाची कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झालं.

Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

डॉ. बाबासाहेब यांना फार कठीण परिस्थिती मध्ये शिकावं लागलं. वेगळे बसून, प्रसंगी वर्गाबाहेर बसून सुद्धा शिकावं लागलं तरी देखील ते थांबले नाही आणि पुढेही शिकू लागले. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून फारशी भाषेमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदव्या मिळविल्या.नंतर ते १९१३ मध्ये पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि १९१५ मध्ये तेथील युनायटेड स्टेट्समधील कोलंबिया विद्यापीठात समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र या विषयांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. आणि नंतर त्यांनी PHD सुद्धा प्राप्त केले. त्यांनतर ते लंडन मध्ये गेले नंतर ते जर्मन मध्ये गेले आणि अनेक पदव्या प्राप्त केल्या.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात येऊन विषमता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी वेगळी निवडणूक असावी, त्यांना आरक्षण मिळावे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. त्यांनी गरिबांची शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक परिस्थिती सुधारावी या उद्दिष्टाने “बहरीकृत हितकारणी सभे” ची स्थापना केली. या सोबतच प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी “मूकनायक” नावाचा पेपर सुद्धा काढलं त्यामुळे खूप खडबड उडाली आणि त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती झालं.

नतर त्यांनी ग्रेज इन बार हा कोर्स पूर्ण करून कायदेशीर लढा देण्याचे काम सुरू केले. आणि ब्राम्हणेतर नेत्यांसाठी लढले आणि जिंकले या विजयामुळे ते आणखी दलितांसाठी लढू लागले. १९२६ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी आणि जातीय भेदभाव संपवण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब न करता त्यांनी महात्मा गांधी यांच्या पावलो पावली चालून दलितांच्या हक्कासाठी लढू लागले.

डॉ. बाबासाहेब यांनी महात्मा गांधीजींच्या पावलो पावली चालून दलीत व अस्पृश्य लोकांसाठी पाण्याचे स्त्रोत मिळवून दिले, सर्व जातींना मंदिराचे दारे उघडे करून दिले एवढेच नाही तर भेदभावाचा पुरस्कार करणाऱ्या हिंदुत्ववादी च्या विरुद्ध प्रतीकात्मक निदर्शने ही दिली. मात्र १९३२ मध्ये एका गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये मतभेद दिसून आले. डॉ. बाबासाहेबांना दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा होता मात्र गांधीजी म्हणाले की, त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्या. मात्र नंतर डॉ. बाबासाहेब यांनी शेवटी महात्मा गांधी यांचे तत्व आत्मसात केले. यालाच पुणे करार म्हणून ओळखला जातो.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

डॉ. बाबासाहेब यांची १९३५ मध्ये शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. आणि तिथे त्यांनी दोन वर्षे नोकरी करून मुंबई मध्ये स्थलांतरित झाले. त्यांना वाचनाची लहानपणा पासूनच अत्यंत आवड असल्यामुळे त्यांनी पुस्तकांसाठी एक मोठे घर बांधले.
त्यांनी राजकारणात सुद्धा उत्तम कार्य केले. त्यांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आणि १८३७ च्या विधानसभा निवडणुकीत १५ जागा जिंकल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपका स्वतंत्र मजूर पक्ष बदलून All India Sedual Cast मध्ये बदल केला. भारतीय संविधान सभेच्या १९४६ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही. व्हाईसरॉय च्या कार्यकारी मध्ये त्यांनी कामगार मंत्री आणि संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री सुद्धा झाले. त्यांनी भारताला एक उत्तम असं संविधान सुद्धा तयार करून दिलं.

Dr babasaheb ambedkar yanchi mahiti

डॉ. बाबासाहेब यांचा १९०६ मध्ये रमाबाई यांच्याशी विवाह झाला त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव यशवंत ठेवलं गेलं. नंतर १९३५ मध्ये रमाबाई यांचं दीर्घ आजाराने निधन झाले.
१९४० मध्ये त्यांनी राज्यघटनेची रचना लिहून पूर्ण केली त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना रात्री झोप येत न्हवती, पायात सतत वेदना होत होत्या. आणि त्यांचा मधुमेहाचा त्रास सिद्ध वाढला होता. ते उपचारासाठी मुंबई ला गेले तेव्हा तिथे त्यांची भेट एका डॉ. शारदा कबीर यांच्याशी झाली. त्यांनतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि १९४८ रोजी त्यांचा दुसरा विवाह झाला.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी आपल्या 5000 अनुयायांसोबत नागपूर मध्ये बौद्ध दीक्षा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला. २ डिसेंबर १९५६ रोजी “बौद्ध किव्वा कार्ल मार्क्स” ही पुस्तकाची रचना लिहून त्यांनी त्यांचं अंतिम कार्य केलं. आणि ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचा प्रदीर्घ आजाराने त्यांच्या दिल्लीतील घरी निधन झाले.

डॉ. बाबासाहेब यांच्या हिंदू कोड बिल मधील कार्य जे नंतर मजूर करण्यात आले….

हिंदू विवाह कायदा
हिंदू वारसाहक्क कायदा
हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
हिंदू दत्तक व पोटगी कायदा

बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते ?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे होते त्यांनी नंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र मराठी निबंध

डॉ. बाबासाहेब यांची प्रकाशित पुस्तके

१) पहिला प्रकाशित लेख – भारतातील जात: त्यांची व्यवस्था, मूळ आणि विकास (भारतातील जाती: त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास)
२) ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताची उत्क्रांती.
३) जातीचे उच्चाटन
४) शूद्रज कोण आहे? (शुद्र कोण होते?)
५) अस्पृश्य: ते कोण होते आणि ते का अस्पृश्य बनले
६) पाकिस्तानबद्दलचे विचार
७) बुद्ध आणि त्यांचा धम्म
८) बुद्ध किंवा कार्ल मार्क्स

संत ज्ञानेश्वरांवर मराठी माहिती वाचा

संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेरणादायी कविता वाचा

Avatar
Marathi Time

Leave a Reply