शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat 500 Best Words

रात्र दिवस उन्हात पोटाला दोर बांधून स्वतःच्या जीवाची परवा न करणाऱ्या आणि स्वतः मिरची सोबत भाकर खाणाऱ्या माझ्या शेतकरी बाबाला सारा जग परिचित आहे. जेव्हा त्याच्या अडचणी तो Essay On Dushkalgrast Shetkari Manogat मधून व्यक्त करतो, तेव्हा मात्र त्याला कुठलाच माणूस ना कार्यकर्ता ना समाजातील मित्र परिवार ओळख देत नाही.

“माझा शेतकरी बाप अख्या जगाचा पोशिंदा”

वरील दिलेल्या ओळी एका कवीने अतिशय सुंदर आणि त्याला समजून दिले आहेत. पण या ओळी आजही त्या पुस्तकांमध्ये लपलेले आहेत कारण माझा शेतकरी बाप हा अख्या जगाला पोहोचतो , अन्नधान्य पिकवतो , आणि स्वतः चटणी भाकर खाऊन पोटाला दोर बांधून काळया रात्री फाटक्या चपलीने अन्नधान्य टिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा माझा शेतकरी बाप हा फक्त कवितेत आणि समाजातच नावापुरता आहे ,अस्सल लाईफ मध्ये त्याला जवळून कोणी ओळखलेलच नाही.

अशाच माझ्या शेतकरी बापाची व्यथा मी माझ्या शब्दात व्यक्त करणार आहे .त्याला काय वाटतं त्याला कसं आयुष्य जगाव वाटतं तो कुठल्या गोष्टींनी कंटाळून गेला आहे ?त्याला लोकांकडून काय अपेक्षा असते ? तो त्याचं घर कसं चालवतात या सर्व प्रश्नांची उत्तरे मी सोप्या आणि सरळ शब्दात देणार आहे शेतकरी समजून.

जेव्हा एक शेतकरी “कर्जबाजारी” होतो आणि नंतर “आत्महत्या” करतो पण त्याच्या मनामध्ये असलेल्या ते काहूर मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करीत आहे

Essay On Dushkalgrast Shetkari Manogat | Shetkaryache Aatmavrutt

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat 500 Best Words

हो मी आहे “शेतकरी” मी गरीब आहे पण कुठल्याच लाच घेणाऱ्या व्यक्तीकडून माझ्या शेतीसाठी मिळालेल्या पैशाची अपेक्षा करत नाही. आहे मी शेतकरी पण मी कुठल्याच राजनीती मध्ये शेती उत्पादनाचा भ्रष्टाचार करत नाही.
कर्जबाजारी झाल्यानंतर हो मी घेतो फाशी पण मी कुणाला घाबरत नाही मला या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचा कामही तुम्हा सर्वांचेच असतं. कारण आम्हा शेतकऱ्यांना समाजामध्ये तुम्ही कधीच किंमत दिली नाही . तरीही हक्काने जगण्याचा अधिकार मी मागत असतो. मला तुम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न केला नाही ओझें उचलतो मी अख्या जगाचा पोट पाळतो माझ्या मुलांना मी जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकतो तरीही मला सन्मानाचं स्थान आजपर्यंत मिळालेले नाही कारण मी आहे “शेतकरी”

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

Majhi Aaji Nibandh In Marathi वाचा

Fathers Day Kavita In Marathi वाचा

वेगळीच आहे ना कोणी भ्रष्टाचारी म्हणतो, कोणी कर्जबाजारी म्हणतात, कोणी गावंढळ म्हणतात , तर कोणी काय तरीही मला खरंच काही फरक पडत नाही मातीमध्ये जन्म झालेला मी गावांमध्ये वाढलेला मी आणि स्वतःच कुटुंब चालवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा मी शेतकरीच आहे.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

माझ्यासाठी आंदोलने काढतात, माझ्यासाठी लढतात, पण ते काही वेळा पुरताच मर्यादित असतो. वेळ गेली की शेतकऱ्याला कोणीही विचारत नाही. आजच्या काळाची ही सत्य परिस्थिती आहे .खरं तर माझ्या लेकरा बाळाचा खर्चही कोणी उचलू शकत नाही मला खरंच काही सुचत नाहीये आत्महत्या शिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय दिसत नाहीये.
तरीसुद्धा खंबीरपणे उभा राहण्याचा “धाडस” माझ्यात आहे कारण मी शेतकरी आहे. आरामात मोठ मोठ्या बिल्डिंगमध्ये बसून फक्त पेन चालवण्याचं काम माझ्याकडे नाही. तर रात्र दिवस अहोरात्र कष्ट करून फाटक्यात चपलीने फाटक्यात धोतराणे रात्र दिवस शेतामध्ये राबणारा मी एकमेव शेतकरी आहे.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

तरी मी अभिमानाने जगू शकत नाही माझ्या मुलांना मी महागड्या शाळेत टाकू शकत नाही. माझ्या बायकोला मी दर दिवाळीला साडी घेऊ शकत नाही, अख्ख्या जगाच पोट भरणारा मी कधी कधी एक वेळ उपाशी राहतो कारण समाजामध्ये माझी किंमत शून्य आहे.

मला अभिमानाने जगावं असं वाटतं आणि मी अभिमानाने जगतो ही पण म्हणतात ना जगामध्ये महत्त्वाचा आहे तो पैसा. आणि पैशाची किंमत मी कष्ट केल्याने फेडू शकत नाही. कारण तुम्हा सर्वांचे पोट भरण्यासाठी आणि मातीमधनं बीज पिकवण्यासाठी घेतलेलं कर्ज मी फेडू शकत नाही.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

dushkalgrast shetkaryache manogat

मग मला म्हणतात, “आत्महत्या”केली “कर्जबाजारी” होता अरे त्याला संसाराचा कंटाळा आला होता. असं म्हणून तुम्ही सर्व निघून जातात. पण माझ्या घरामध्ये असलेला अंधार तुम्ही कधी मिटवण्याचा प्रयत्न केला का ? शेतकऱ्याप्रती कधी तुम्ही तुमचे प्रेम दाखवलं का ? तुमचं प्रेम असतं ते म्हणजे फक्त आंदोलनापुरतं, तुमचं प्रेम असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त वोटिंग पुरतं, तुमचं प्रेम असतं, पण आम्हा शेतकऱ्याची व्यथा तुम्ही कधी जाणली का?

शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

4 thoughts on “शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध | Essay On Dushkalgrast Shetkari Manogat 500 Best Words”

Leave a Reply

%d bloggers like this: