पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

सौ विद्या तानाजी गावडे यांनी पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा या लेखातून पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करणारा सुंदर Essay on Environment in Marathi सादर केला आहे.

पर्यावरण वाचवा , पृथ्वी जगवा | Essay on Environment in Marathi 2023

हिरवीगार झाडे, पशुपक्षी, निळसर शुभ्र आकाश, नदी, ओढा,नाले,समुद्र, मोठमोठ्या डोंगर रांगा अशा स्वच्छंदी वातावरणात सुंदर असे घर. किती छान वाटते ना? विचार केला तरी. किती सुंदर स्वप्न आहे. काय आहे हे सगळे, धकादुकीच्या,यांत्रिकरणाच्या जगात मनुष्याला का बरे हवे आहे हे सगळे?

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

विचार करण्यासारखे आहे हे सगळे या आधुनिकतेच्या काळात मानव अगदी यंत्र होऊन गेलाय. त्याच्या मेंदूला,मनाला, शांत करण्यासाठी, आनंदासाठी अशी स्वप्नातील जागा हवी आहे. अरे ही काय फक्त स्वप्नातीलच जागा आहे का? अरे हे तर आहे निसर्गाचं देणं. जे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. आपल्याजवळ असून सुद्धा आपण त्याचे जतन करू शकत नाही.

निसर्गातील विविध गोष्टींनी, घटकांनी नटलेले पर्यावरण आपण वाचवले पाहिजे, पर्यावरण जतन केले पाहिजे, पर्यावरण विषयक जनजागृती करून पुढील पिढीला त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तरच ह्या पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल.
नाहीतर ह्या पृथ्वीवरील सुंदर स्वर्ग नाहीसा करायला आपणच जबाबदार असणार आहोत.

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

नाही कळले ना काही
क्षणात संपले सगळे,
पर्यावरणाच्या ऱ्हासाला
जबाबदार आम्ही सगळे.

पर्यावरण वाचवण्यासाठी सरकार विविध अभियाने,योजना आमलात आणत आहेत. यामध्ये अभियान राबवायला शाळांना बंधनकारक केले जाते.

अभियानाला आम्ही विरोध करत नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. पण मला याची खंत वाटते आहे की, हे पूर्ण काळ चालणारे काम आहे, ते फक्त एका दिवसापुरते नसावे, फक्त शाळांनाच का बंधनकारक. विद्यार्थी पर्यावरणाची काळजी घेण्यात पुढे असतोच, त्यांच्यात तर ही मूल्ये रुजलीच पाहिजेत. पण प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन करणे हे आपले प्रथम कर्तव्य मानून सतत पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्यांवर अवलंबून राहायला नको.

Essay on Environment in Marathi 2023

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

कोरोना काळात आपण पाहिले आहे किती ऑक्सिजनची कमतरता भासली,मग तुम्हीच ठरवावे. आपल्याला निसर्गातील ऑक्सिजन हवा की दवाखान्यातील.

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

आपण जसे वागू तसाच आदर्श आपली पिढी ठेवणार आहे. त्यांच्यासाठी प्रदूषण मुक्त पर्यावरणाची ठेव जपूया.

लक्षात राहू द्या,
स्वर्गातल्या अप्सरे सारख्या नटलेल्या पृथ्वीला लंकेची पार्वते करण्यास आपणच कारणीभूत असू. त्यामुळे,
|| पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा||

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

स्वलिखित लेख
सौ विद्या तानाजी गावडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्सुफळ
ता.बारामती
मो. नं.9423081843

………………………………समाप्त………………………………………

प्रकाशवाटाच्या अधिकृत सभासदांसाठी खुशखबर.

साप्ताहिक प्रकाशवाटा🧾 वार्षिक सभासदत्व कसे घ्यावे❓

साप्ताहिक प्रकाश वाटा हे स्व निर्मित साहित्यिकांचे साहित्य यामध्ये कथा, कविता,गाणी सर्व काही प्रसिद्ध करण्यासाठी साप्ताहिकाचे वार्षिक सदस्यत्व फक्त 250/- रुपये इतके माफक दर निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक सदस्यत्व घेण्यासाठी साप्ताहिकाच्या संपादिका प्रतिक्षा मांडवकर – +918308684865 यांच्याशी संपर्क करावा. तसेच +918308684865 या क्रमांकावर फोन पे अमाऊंट पाठवून वार्षिक सभासदत्व घ्यावे.
दर महा आपले दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाईल.

शिवाय

आता तुमचे लेख ऑफलाइनच नाही राहणार तर ते जातील ऑनलाइन

प्रकाशवाटा आणि मराठी टाईम यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचे साहित्य होईल जगप्रसिद्ध ते देखील एकच सभासद फी मध्ये.

तुम्ही बरोबर वाचले आहे. प्रकाशवाटाच्या सभासद फी (250) मध्ये तुम्हाला मिळेल marathitime.in या सुप्रसिद्ध वेबसाईटचे सभासदत्व. ज्यात प्रत्येक महिन्याला तुमचे चार लेख/ कथा/ निबंध/ प्रवासवर्णन वेबसाईट वर टाकले जातील.

त्वरित या ऑफरचा फायदा घ्या. ऑफर पहिल्या 50 साहित्यिकांसाठी लिमिटेड.

prakashvata marathi saptahik

संपादिका
प्रतिक्षा मांडवकर
8308684865

मराठी टाईमच्या इतर गोष्टी वाचा

Marathi story

Katha lekhan in marathi

पर्यावरण वाचवा, पृथ्वी जगवा By सौ विद्या तानाजी गावडे | Essay on Environment in Marathi 2023

Leave a Reply

%d bloggers like this: