सणांचे बदलते स्वरूप by रवी आटे | Essay on Festival in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Essay on Festival in Marathi या कीवर्ड वर आधारित “सणांचे बदलते स्वरूप” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

साहित्यबंध समूह
उपक्रम क्रमांक -४
लेख विषय – सणांचे बदलते स्वरूप

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याच्या नैसर्गिक वृत्तीनुसार त्याला समूहातच राहणे आवश्यक आहे. समाजशास्त्रातील सामाजिक कराराच्या सिद्धांतानुसार मनुष्याचे सामूहिक जीवन उदयास आले व ते विकसीत होत गेले. ते सतत विकसी तच होत राहते. प्रगतीकडे असो की अधोगतीकडे असो त्याच्या सामूहिक जीवनाची वाटचाल ही नेहमीच सुरू असते. मात्र मानवाला एकटे जगताच येत नाही. समूहातच त्याचे अस्तित्व असते. अर्थातच या संदर्भातही काही विचारवंतांची मते भिन्नस्वरूपाची असू शकतात. असो.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

सणांचे बदलते स्वरूप by रवी आटे | Essay on Festival in Marathi 2024

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळेच धर्मांची ही निर्मिती झाली आहे. त्यातील तत्त्वज्ञानानुसार व दर्शनशास्त्रानुसार वर्षातील काही दिवस हे इतिहासात घडलेल्या घटनानुसार व बऱ्याचशा प्रमाणात कल्पितांप्रमाणे देखील सणांच्या स्वरूपात उदयास आलेले आहेत. विविध धर्मातील लोक विविध प्रकारचे सण साजरे करतात. त्यांचे स्वरूप आधी वैयक्तिक व कौटुंबिक स्वरूपाचे होते. अलीकडील काही दशकात सर्वच सणांचे स्वरूप हे सामाजिक झालेले आढळून येते. अर्थात इतिहासात फार पूर्वी या सणांचे अस्तित्व सामाजिक स्वरूपाचेही राहिले असेल. इतिहासात घडामोडी घडतच राहतात. माणूस हा विकसनशील प्राणी आहे. तो सातत्याने बदलत राहतो. आर्थिक राजकीय सामाजिक व वैज्ञानिक प्रगती करण्याकडेच त्याचा कल असतो. त्यामुळे माणसाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात बदल घडून येत राहतात. सणांच्या संदर्भात देखील असेच बदल कालमानपरत्वे घडून आल्याचे दिसून येते. काही बदल निश्चितच चांगले झालेले असलेत तरी काही बदलांमुळे समाजजीवनात गोंगाट, प्रदूषणाचा व वादविवादाचा धोका आधुनिक काळात निर्माण झाल्याचे दिसून येते.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


आपल्या देशात दिवाळी, दसरा ,नवरात्री ,होळी ,रंगपंचमी, जन्माष्टमी ,रक्षाबंधन ,ईद , ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा ,महावीर जयंती ,पारसी नववर्ष ,गुरुनानक जयंती इत्यादी सण साजरे केले जातात. पण या सणांचे स्वरूप साधारणतः धार्मिकच असते .जरी सामाजिक दृष्ट्या साजरे केले जात असलेत तरी. याव्यतिरिक्त काही राष्ट्रीय सण देखील आहेत. स्वतंत्रता दिवस व गणतंत्र दिवस याच प्रमाणे गांधी जयंती, डॉक्टर आंबेडकर जयंती इत्यादी राष्ट्रीय सण देखील साजरे केले जातात. सर्वच धर्मीयांच्या सणांसाठी शासन सार्वजनिक सुट्ट्या घोषित करते. सर्वच धर्मीयांचा व संप्रदायांचा सन्मान राखला जातो. आपल्या देशाच्या संविधानाने धर्मनिरपेक्षतेचे तत्व दिलेले आहे. त्यामुळे सर्वच धर्मांचा सारखाच सन्मान राखणे अपेक्षित आहे. मात्र शासनाचा आणि देशाचा स्वतःचा कोणताही धर्म नाही. समता ,बंधुता व न्यायावर आधारित आपली राजकीय व सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे विविधतेत एकता हे तत्व आपण स्वीकारलेले आहे. सहजीवनाचे आपल्या देशासारखे सुंदर उदाहरण जगात कुठेही सापडणार नाही.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


मात्र अलीकडे प्रचंड शहरीकरण झाल्याने व लोकांचे स्थलांतर शहरांकडे झाल्याने जुन्या प्रथा परंपरा या पाळल्या जाणे शक्य होताना दिसत नाही. सणांच्या स्वरूपात काही मूलभूत बदलही झालेले आहेत. दिवाळीत मातीचे दिवे फारसे आढळून येत नाहीत. तसेच पूर्वी सण बरेच दिवस साजरे व्हायचे. आता लोकांकडे वेळ नसल्याने प्रतिमाकात्मक स्वरूपात घाईघाईने सण साजरे केले जातात. त्यामुळे लहान मुलांच्या व कुटुंबातील व समाजातील सर्वच लोकांच्या आनंदाला सीमा निर्माण झालेल्या आहेत. एवढे मात्र खरे की सर्वच सण साजरे केले जातात. पण भारतीय सणांसारखेच अलीकडे पाश्चिमात्य सणांना देखील फार महत्त्व दिले जात आहे. नवीन वर्ष, व्हॅलेंटाईन डे ,मदर्स डे ,फादर्स डे ,सिस्टर्स डे असे अनेक दिवस सणांसारखे साजरे करायला लागले आहेत. काही वर्षांपूर्वी यातील काही सणांचे अस्तित्वही आढळून येत नव्हते. यात वावगे काही नाही मात्र स्थानिक सणांना जास्त महत्त्व द्यावयास हवे. संविधानाने भारतीय लोकांना आपली संस्कृती , भाषा व लिपी वगैरे जपण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यकच आहे. अन्यथा ते हळूहळू लोप पावण्याची शक्यता आहे. आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण यातील भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

पाश्चिमात्यिकरण म्हणजे आधुनिकीकरण नव्हे. आपल्या मातीतील संस्कार ,प्रथा, रुढी यांचा विकास करताना व त्यांना टिकवून ठेवताना पाश्चिमात्यिकरणाची नकल करण्याची आवश्यकता नाही. अन्यथा आपले महत्त्व कमी होऊन त्यांच्याच प्रतिकांचे महत्त्व वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आपल्या समाजाचा आत्मविश्वास कमी कमी होत जाऊ शकतो.


पूर्वीच्या तुलनेत लोकसंख्या खूप वाढल्यामुळे देखील सणांच्या बदलत्या स्वरूपात काही गोष्टी आढळून येत आहेत. हवेतील प्रदूषण प्रचंड प्रमाणावर वाढते .तसेच सणांच्या कालावधीत घरगुती स्वरूपात कितीही स्वच्छता केली तरी कचऱ्याचे प्रमाण व अस्वच्छता वाढतानाच दिसते. जलप्रदूषण देखील मोठ्या प्रमाणावर घडून येते. ध्वनी प्रदूषणाचे तर विचारूच नका. एवढा तीव्र गोंगाट असतो की आजारी माणूस त्याच्या खाटेवरच मरून जाईल. खूप गोंगाट केल्याने व प्रदूषण केल्याने व धांगडधिंगा केल्याने कोणताही देव प्रसन्न होऊ शकत नाही. दिव्यांचा झगमगाट करावा ,रंगही खेळावेत पण पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो तो थांबविणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या आवाजांची मर्यादा शासनाने निर्धारित केलेली आहे तसेच आवाजाची देखील .पण लक्षात कोण घेतो? कायदे नियम सर्व कागदावरच आढळून येतात. याकडे न्यायालयांच्या निर्णयाप्रमाणे शासनाने प्रामाणिकपणे लक्ष देणे आवश्यक आहे.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


शहरीकरणामुळे संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. कुटुंबातील सभासदांमध्ये पूर्वीसारखा एकोपा स्नेह व प्रेम राहिलेले नाही. ते जरासे कमी कमी होताना दिसून येते. पैसा खूप वाढला असला तरी गरजा खूपच वाढलेल्या आहेत. त्यामुळे कोणी कितीही मोठेपणा दाखविला तरी गरिबीची भावना जाता जात नाही. मध्यमवर्गीय की क्या पहचान नये कपडे फटी बनियान अशी अवस्था दिसून येते.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


पूर्वीच्या काळी सन साजरे करताना कोणाच्या भावना वगैरे दुखावण्याचा प्रश्नही निर्माण होत नव्हता. अलीकडे कधी कधी अशा स्वरूपाच्या तुरळक घटना दिसून येतातच. सणांच्या कालावधीत अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसते. विशेषतः दिवाळीत व जन्माष्टमीच्या सणांमध्ये.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


या अनुषंगाने आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. विविधतेसारखे सौंदर्य कुठेही नसते. तोचतोचपणा कंटाळवा ना होऊ शकतो. आपल्या देशात मात्र विविध धर्मांचे व संस्कृतीचे लोक राहत असल्यामुळे या सणांची मज्जाच काही औरच असते. यानिमित्ताने आपण सर्व धर्मीयांमध्ये एकतेची भावना निर्माण करू शकतो. किंबहुना तेच अपेक्षित व अभिप्रेत आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली त्याच धर्तीवर एकोपा निर्माण करण्यासाठी या सणांचा उपयोग का होऊ शकत नाही.

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi


मी तर पुढे जाऊन असे म्हणेल की एका धर्माचे सण दुसऱ्या धर्माचे लोकही तेवढ्याच भक्ती भावाने स्वीकारत असतील तर किती आदर्श युग निर्माण होऊ शकेल. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ एकाच जातीचे लोक साजरी करताना दिसतात प्रामुख्याने ते बरोबर आहे काय? मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक स्थळी जर सर्वच जाती-धर्मांचे लोक जात असतील तर त्यांनी देखील या लोकांच्या धार्मिक सणांचा व देवतांचा आदर करणे अभिप्रेतच आहे. तेही असे प्रयत्न करताना दिसतात पण फार तुरळक स्वरूपात. तसेच वातावरण आपल्या देशात पूर्वीच्या काळात दिसून येत होते. असे इतिहास सांगतो. ही जरी टोकाची अपेक्षा असली तरी भारतीय समाजाचे मन हे लवचिक असल्याने आपल्या समाजात व देशात राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव समता राखण्यासाठी किमान स्तरावरील एकतेची भावना तर आवश्यकच आहे.

केवळ युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकता कशी दाखवता येईल? ही प्रक्रिया सातत्याने चालली तरच ते शक्य होईल. यासाठी केवळ मनाच्या खिडक्या उघडण्याची आवश्यकता आहे. या लेखामुळे एका व्यक्तीची जरी मनाची खिडकी उघडली तरी लेखक धन्य होईल!

रवी आटे सानपाडा नवी मुंबई
९३२४७४५९७०

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या

mazablog.online

नवीन लेख वाचण्यासाठी भेट द्या

https://marathitime.in/

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

Diwali information in marathi

सणांचे बदलते स्वरूप | Essay on Festival in Marathi

रवींद्र आटे
रवींद्र आटे

Author Information - श्री.रवींद्र प्रल्हाद आटे, सानपाडा नवी मुंबई येथील रहिवासी असून, तालुका सानपाडा आणि जिल्हा ठाणे आहे. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर एम ए राज्यशास्त्र-एम फिल राज्यशास्त्र देखील पूर्ण केले आहे. त्यांना 30 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 35 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख,कविता व चारोळी हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना फक्त काही प्रमाणपत्रे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - 9324745970