पावसाळ्याचे वर्णन Essay On Rainy Season in Marathi या लेखाद्वारे आपण करणार आहोत. ते तुम्हाला नक्कीच तुमच्या शैक्षणिक आयुष्यात उपयुक्त ठरेल.
मित्रांनो आपल्याला दैनंदिन जीवनात तीन ऋतू पाहायला मिळतात. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा ह्या ऋतू पैकी आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर निबंध लिहिणार आहोत.
Essay On Rainy Season in Marathi

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होतो. साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. पावसाला सुरुवात झाल्यापासून साधारणता चार महिने पावसाळा असतो. पण मित्रांनो आपण पावसाळा चार महिने आहे असे म्हणू शकत नाही. कारण पावसाचा जोर हा तेथील वातावरण, निसर्गावर, व स्थानिक वातावरण, वाऱ्याचे स्वरूप व हवामान घटकावर अवलंबून आहे, पावसाचा कालावधी या घटकावर कमी जास्त होत राहतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी| Essay On Rainy Season in Marathi 500+ Words
पावसाळा हा ऋतू सर्वांनाच खूप आवडतो. माझा तर सर्वात आवडता ऋतू पावसाळा हा आहे. मला पावसाळा खूप आवडतो. कारण पावसाळ्यामध्ये डोंगर झाडे सर्व हिरवेगार होतात, निसर्ग पाहून मन भरून जाते, तसेच आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या भारतातील शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळा सुरू झाला की शेतकऱ्यांचा हंगाम सुरू होतो नंतर त्यांची पेरणी आहे, व इतर सर्व कामे पावसाळा ऋतू लागला की चालू होतात. पहिल्या पावसाचा आनंद हा काही वेगळाच असतो. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा गंध हा प्रत्येकालाच आवडतो. पावसामध्ये भिजायला लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.
पावसाळ्यामध्ये निसर्गाचे निरीक्षण करण्यात ही एक वेगळीच मजा आहे. सर्व काही डोंगर झाडे हिरवीगार झालेली असतात. तसेच त्यांच्या सोबतीला कोकिळाचा मधुर आवाज व पाऊस चालू असताना त्या हिरव्यागार डोंगरावरती नाचणारा तो सुंदर मोर हे दृश्य बघण्यासारखे असते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य पाहण्याची मजाच काही वेगळी असते. पावसाळ्यामध्ये कधी कधी पाऊस जास्त झाल्यामुळे सुट्टीही मिळते. त्यामुळे त्या गोष्टीचाही काही वेगळाच आनंद होतो. तसेच पावसाळ्यामध्ये आपल्या परिवारातील आपल्याला बाहेरगावी फिरण्यासाठी घेऊन जातात. जसे की महाबळेश्वर, गड किल्ल्यावरती रायगड व तसेच वेगवेगळे थंड हवेचे ठिकाण त्या ठिकाणी वरती पावसाळ्यामध्ये एक वेगळाच निसर्ग व एक वेगळाच आनंद तिथे गेल्यानंतर मनाला मिळतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी| Essay On Rainy Season in Marathi 500+ Words

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व सण साजरे केले जातात. या सणा मधून लोक मेघराजाची पूजा करतात व त्याच्या आगमनाचे स्वागत करतात. व प्रार्थना करतात की चारही महिने असेच बरसत रहा जेणेकरून पिके चांगली येतील व दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही.
मित्रांनो पावसाळा जेवढा आनंद देतो तेवढ्याच प्रमाणात कधी कधी दुःख पण देतो. या ऋतूमध्ये कधीकधी पाउस एवढ्या अति प्रमाणात पडतो की नदी नाल्यांना पूर येतो, रस्ते बंद होतात. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शहरात व गावात पावसाच्या पाणी शिरते त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमावला लागतो.
पण नेहमीच असे घडत नाही. पाऊस नेहमीच त्याचे रुद्ररूप धारण करत नाही. कधी कधी अनेक वर्षानंतर कधी तरी ते चित्र पाहायला मिळते. पण पावसामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. पिण्यायोग्य पाणी मिळते. निसर्ग हिरवा गार होतो शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत चालते. डोंगर झाडांना जीवनदान मिळते.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी| Essay On Rainy Season in Marathi 500+ Words
तसेच उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी बांधव व इतर लोक उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई होणार नाही, या कारणाने तलावा मध्ये पाणी भरून घेतात शेततळे भरून घेतात. आपले विहिरीभरून घेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठा करून ठेवतात जेणेकरून दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी| Essay On Rainy Season in Marathi 500+ Words
व पावसाळ्यामध्ये कधी कधी चार पाच दिवस सारखा पाऊस लागून राहतो. जास्त पाऊस झाल्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी मिळते. पण जेव्हा पाऊस पडत असतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांच्या मनात असे वाटते की अजून पाऊस पडावा अजून दोन-चार दिवस सुट्टी मिळेल, पण जेव्हा सारखा पाऊस पडत असतो तेव्हा मनात हे गाणं नक्कीच वाजत.
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?
पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस पडत असतो. त्यामुळे शाळेत छत्री घेऊन जायला एक वेगळीच मज्जा येते. व आपण ज्या दिवशी छत्री घेऊन गेलो नाही, तेव्हा आपल्या मित्राच्या छत्रीमध्ये त्याच्यासोबत घरी येण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसेच जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचते त्या पाण्यामध्ये आम्ही कागदाच्या होड्या करून खेळ खेळायचे मला तो खेळ खूप आवडायचा.
पावसाळा सुरू झाला की पावसाळा ऋतूमध्ये थंड वातावरणात गरमागरम भजी व इतर गरमागरम पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा असते. आमची आई पावसाळा ऋतूमध्ये वेगवेगळे गरमागरम पदार्थ बनवते व आम्ही सर्वजण ते पदार्थ चाकण्याचा आनंद घेतो. मित्रांनो अशा प्रकारे माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर आपण निबंध पाहिला.
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो तुम्हाला
माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…
वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद