आजच्या लेखामध्ये Essay On School In Marathi हा निबंध लिहून दिलेला आहे. तो तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो.
शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूपच महत्वाची असते. आपल्याला लहानपणापासून होणारे सर्व संस्कार शाळेतूनच होत असतात.एक आदर्श नागरिक होण्यासाठी आवश्यक सर्व संस्कार आपल्याला शाळेतून च मिळतात.
Essay On School In Marathi

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शाळा, कारण शाळेतूनच प्रत्येक जण आपापल्या आयुष्याला सुरुवात करतो. शाळेतून त्याच्या पुढील आयुष्याला चालणा मिळते.प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व सर्वोत्तम घडवण्यासाठी ज्ञानाची गरज असते. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला शांत वातावरण व उच्च मार्गदर्शनाची गरज असते. ते आपल्या ला शाळेतून मिळते.
चला तर पाहूया माझी शाळा मराठी निबंध मित्रांनो मी खेडेगावात राहणारा एक विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपेगाव हे आहे. माझ्या गावामध्ये इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे.माझ्या शाळेत दयाळू अनुभवी व मनमिळाऊ स्वभावाचे उच्चशिक्षित शिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना खूप मन लावून शिकवतात. तसेच शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच खेळांच्या विविध स्पर्धा घेतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.
Essay On School In Marathi
तसेच माझ्या शाळेच्या अवतीभवती विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये त्या झाडांची सावली आमच्या शाळेवर पडते व आम्हाला उन्हाळा जाणवत नाही. माझ्या शाळेच्या अवतीभवती स्वच्छ व सुंदर परिसर आहे.
माझ्या शाळेत सात शिक्षक आहे. प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षक हा त्यांचा वर्ग सांभाळतो. माझ्या शाळेचा वेळ सकाळी दहा ते चार हा माझ्या शाळेचा वेळ आहे.माझ्या शाळेत एकूण मिळून नऊ वर्ग खोल्या आहेत. सात वर्ग खोल्या विद्यार्थ्यांसाठी व एक खोली मुख्याध्यापक वर्ग व इतर शिक्षक वर्गासाठी आहे. आणि एक खोली स्वयंपाक घर आहे.
आम्हाला दुपारच्या वेळेत एकदम छान असा खाऊ दुपारच्या सुट्टीमध्ये दिल्या जातो. खाऊ बनवण्यासाठी एक काकू आहेत त्या काकू खूप छान आहेत. त्या काकू खूप छान खाऊ बनवतात व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पोट भरून खाऊ देतात. कधी गोड भात, मटकी, कडी भात, वरण-भात असा वेगवेगळा खाऊ बनवतात. व आम्ही सर्व विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत खाऊचा मनसोक्त आनंद घेतो.
Essay On School In Marathi
माझ्या शाळेच्या अवतीभवती खूप मोठे मैदान आहे. तसेच त्या मैदानावर विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत. तसेच शाळेच्या चारही बाजूंनी मोठे मोठे झाडे आहेत. दुपारच्या सुट्टीमध्ये त्या झाडांच्या गार सावलीत बसून खाऊ खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.तसेच माझ्या शाळेच्या समोर मोठे ग्राउंड असल्यामुळे आमचे त्या ग्राउंड वर वेगवेगळे खेळ घेतले जातात जसे की कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल इत्यादी खेळ आम्ही मोठ्या उत्साहाने खेळतो.
तसेच शिक्षणाबरोबरच आमच्या शाळेत खेळालाही मोठे महत्त्व दिले जाते. त्यामुळे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा असतील तर, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांगतात. व आमची विशेष टीम बनवून आम्हाला तो खेळ खेळण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. व नंतर आम्हाला तो खेळ खेळण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय घेऊन जातात. माझ्या टीमला कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक भेटलेला आहे.
आमच्या शाळेत विविध खेळाची तयारी देखील करून घेतली जाते. यामुळे आजपर्यंत आमच्या शाळेने अनेक खेळात बक्षिसे मिळविली आहेत.
Essay On School In Marathi
तसेच आमच्या शाळेच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती केलेली आहे व वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत. आम्ही ते लेक चालत बोलत वाचत असतो.शाळेच्या परिसर खूपच निसर्गरम्य व शांत वातावरण आहे. आमच्या शाळेच्या चारी बाजूंनी झाडे असल्यामुळे दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही त्या झाडांना पाणी घालतो. कारण जेव्हा उन्हाळ्यात असतो. तेव्हा ते आम्हाला खूप छान गार सावली देतात.
शाळेच्या समोर मैदानात तिरंगा ध्वज आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी शाळेत वेगळीच मज्जा असते. आम्ही या दिवसांमध्ये शाळेची स्वच्छ्ता करून शाळेची सुंदर सजावट करतो.
Essay On School In Marathi
• माझे आवडते शिक्षकमाझे आवडते शिक्षक पाटील सर ते माझे वर्गशिक्षक आहेत. माझे सर्वात आवडते शिक्षक आहेत. कारण ते खूप छान शिकवतात व त्यांची शिकवण्याची पद्धत ही मला खूप आवडते. ते शिकवत असताना एकदम मनोरंजक पद्धतीने शिकवतात. कारण एखादा मुद्दा पटवून सांगताना मला व माझ्या मित्र मैत्रिणींना समजेल असे एकदम बालपणात जाऊन काहीतरी उदाहरण देऊन समजतात.
त्यांनी एखादा धडा शिकवला की तो कधीच विसरत नाही. कारण ते त्या धड्यातील प्रत्येक मुद्दा एकदम खोलवर जाऊन सांगतात. जेणेकरून विद्यार्थी ते कधीच विसरत नाहीत.पाटील सरांची संपूर्ण नाव मनोज श्रीहर पाटील हे आहे ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील सावरगाव येथील आहेत. मी त्यांना शिक्षक दिनानिमित्त माझा आवडता पेन त्यांना मी गिफ्ट दिला होता.

Essay On School In Marathi
आमच्या शाळेची मुख्याध्यापक रिंगणे सर हे आहेत. ते सर खूप कडक व शिस्त बाज आहेत. पण खूप दयाळू आहेत ते विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतात.शाळेतील इतर शिक्षक देखील खूपच चांगले आहेत. ते देखील आम्हाला खूप छान शिकवतात. या शाळेने मला खूप काही दिले आहे. खूप सारे संस्कार मला या शाळेतून मिळाले आहेत. एक आदर्श नागरिक कसा असतो, मी याच शाळेतून शिकलो. शाळेतील अनेक सुंदर अनुभव माझ्या मनात साठवले आहेत. माझी शाळा मला खूप आवडते आणि ती माझ्यासाठी नेहमीच आदर्श असेल.
Author :- Mr. Shankar Kashte

तर मित्रांनो तुम्हाला माझी शाळा मराठी निबंध maze shala nibandh marathi हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.धन्यवाद…
तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.