माझे बाबा माझे विद्यापीठ by सौ. क्रांती तानाजी पाटील Father Meaning in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ. क्रांती तानाजी पाटील यांनी Father Meaning in Marathi या कीवर्ड वर आधारित “माझे बाबा माझे विद्यापीठ” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

*साहित्यबंध समुह आयोजित स्पर्धा
*विषय-माझे बाबा
*शीर्षक -माझे विद्यापीठ
दिनांक -२९-११-२०२३

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

‘कौलारु तिगही’ चे घर असल्यामुळे पुढची खोली ही बैठक खोली होती. या खोलीत दिवसभर माणसांची ये-जा चालूच असायची.
माझे वडील स्वयंपाक घरात येऊन पाण्याचे तांब्या,भांडे घेऊन जात,जातच मला बोलले.
“क्रांती चहा ठेव पाच,सात कप”
“हो आप्पा ठेवते”
लगेचच मी चहाचे भांडे घेऊन. सात कप पाणी घेऊन.

साखर,चहा पावडर घालून. चहा उकळायला गॅसवर ठेवला. चहा उकळत होता. त्याबरोबर काही आठवणी ही त्या चहा प्रमाणे मनात उसळी मारत होत्या. मनात येऊन गेले.

‘अरे या चहाचे आणि माझे नाते’ किती… लहानपणापासूनच तयार झाले.आप्पांच्या जवळ सतत माणसांची वर्दळ असायची. आणि आप्पा दारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चहा,पाणी घेतल्या शिवाय घरातुन जाऊ देत नव्हते.त्यामुळे मी अगदी दुसरीत असल्यापासून म्हणजे जमेतेम सात वर्षांची असतानाच चहा बनवायला शिकले होते. आता तरी चहा बनवने. म्हणजे माझी एक ‘स्पेशालिटीच’ झाली होती. हो,कारण चांगली चहा पावडर व भरपूर दुध घातलेला घट्ट चहाच आलेल्या लोकांना सुध्दा होता. आपण घरी जसा चहा बनवतो. अगदी तसाच चहा बाहेर आलेल्या लोकांना सुध्दा द्यायचा. हा आप्पांच्या दंडकच होता. सर्वांना समान वागणुक हेच त्यांचे सुत्र होते.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

“एव्हाना गॅसवरील चहा शिजला होता. त्यामध्ये दुध घातले. वाफाळलेला व फेसाळलेला तो स्पेशल चहा ओत,ओततच मी आप्पांना हाक दिली.”
“आप्पा चहा तयार आहे.”
तिकडून आवाज आला.
“तुच घेऊन ये तो चहा”
मी चहाचा ट्रे घेऊन बैठक खोलीत गेले.
तोच माझे वडील, आप्पा सर्वांना बोलले.
“हे माझे शेंडेफळ”

माझे सर्वात धाकटे कन्यारत्न आहे. सध्या नववी मध्ये शिकते आहे.
“क्रांती नमस्कार कर सर्वांना”
मी सर्वांना नमस्कार करून. प्रत्येकाला चहाचे कप दिले.
बसलेल्या मंडळीतून एक गृहस्थ बोलले.
“आप्पा तुम्हाला तीन मुलीचं का? मुलगा नाही का?”
“हसत-हसतच आप्पा बोलले. आहे की मला एक मुलगा.”
“अहो!तो दिसतच नाही कुठे”

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

माझे बाबा माझे विद्यापीठ by सौ. क्रांती तानाजी पाटील Father Meaning in Marathi 2024

“नेहमी तुमच्या मुलीचं दिसतात. तुमच्या तीनही मुली खुप सुंदर भाषण देतात. मी ऐकली आहेत. त्यांची भाषणे. पण तुमचा मुलगा कधीच भाषण वगैरे देताना पाहिला नाही. म्हणून विचारले.”
“अहो! मुलांपेक्षा,मुलींना धाडसी बनवायचे.”
मुलींनी आत्मनिर्भर असावे. असे त्यांना नेहमीच वाटायचे.
शिवाय मुलींची ओळख करुन देताना. कधीच या माझ्या मुली असे बोलत नसत. तर नेहमी माझी ‘कन्यारत्न’ असे सांगायचे. ते म्हणायचे माझ्या या मुली म्हणजे माझी रत्नेच आहेत.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

आप्पांचे वाचन खुप होते.त्याचा फायदा मला खुप झाला. कारण अगदी आठवी मध्ये जाई तोपर्यंत मी दररोज झोपताना आप्पांच्या कडून गोष्ट ऐकायची ही माझी सवयच होती. आप्पा पण मला स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, इसापनीती च्या अशा विविध विषयांवर मला गोष्टी सांगत होते. मी सुद्धा त्या गोष्टी मैत्रिणींना सांगत. त्यामुळे सहाजिकच ज्ञानाचे हे बाळकडू वडिलांच्या कडूनच मला लहान वयापासूनच मिळत गेले. नकळतपणे वाचन करणे. हा संस्कार आपोआपच मनावर होत गेला. वडिलांच्या कडून नकळत आपल्या वरती किती संस्कार होतात.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे…शनिवार होता. अर्धी शाळा करुन मी व माझी बहिण घरी आलो होतो. आप्पा शाळेचे मुख्याध्यापक व आई लिपिक असल्यामुळे ते काही कामात व्यस्त असल्याने दुपारी तीन वाजले. तरी घरी नव्हते आले. दुपारी आम्ही बहिणी,बहिणी निवांत झोपलो होतो. तोपर्यंत आवाज आला. पाटील सर आहेत का? उठून आम्ही पाहिले. तर दारात येड्याचे एक शिक्षक होते. व त्यांच्या सोबत काही मंडळी होती. मी त्यावेळी सहावी मध्ये म्हणजे जेमतेम दहा,अकरा वर्षाची होते. दुसरी बहिण तेरा वर्षे सरांना ओळखून पण आम्ही जाणूनबुजून आत या. असे बोललो नाही. कारण आम्हाला चहा करायचा त्रास नको होता. मनात आले चला आप्पा नाहीत घरात. यांना बाहेरच्या,बाहेरच घालवायचे. त्यांना सांगितले आई, आप्पा शाळेतच आहेत. कधी येतील काही माहिती नाही. ते बोलले ठिक आहे.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

ते तिथून गेल्यावर आम्ही दोघी बहिणी खुश, का तर चहाचा ताप वाचला. ते शिक्षक थेट आप्पांच्या कडे शाळेत भेटायला गेले. आमच्या घरा पासून शाळा अर्धा कि.मी. अंतरावर होती. तिथे येड्याच्या सरांना पाहून आप्पांना आश्चर्य वाटले. मी शाळेत आहे. हे तुम्हाला कसे समजले. त्यावर ते सर बोलले. अहो, मी तुमच्या घरी गेलो होतो. तुमच्या मुलींनी मला सांगितले. त्यावर आप्पा बोलले चहापाणी दिले ना मुलींनी. त्यावर ते बोलले . तुम्ही शाळेत आहे. समजल्यावर मग थेट इथेच आलो. माझे वडील खुप चाणाक्ष होते. त्यांनी ओळखले की आम्ही चहा करायच्या कंटाळ्या मुळे त्यांना बाहेरच्या बाहेर पाठवले आहे.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

आप्पा सर्वांना बोलले दहा मिनिटात घरी जाऊ. झालच आहे माझे काम. असे बोलून त्यांनी दहा,बारा लोक सोबत घेऊन घरी आले. आल्या बरोबर आम्हाला आवाज दिला. “स्मिता, क्रांती पाण्याचे तांब्या,भांडे घेऊन दोघीपण बैठक खोलीमध्ये या”
आम्ही दोघी बहिणी गेलो. पाणी ठेवले.
“आप्पांनी आम्हाला विचारले,यांना तुम्ही ओळखता की नाही.” आप्पांच्या आवाजाचा सुर आमच्या लक्षात आला होता. दोघींनी पण माना खाली घातलेल्या.
“काय विचारतोय मी, पुन्हा वडिलांनी विचारले”.
“आम्ही बोललो हो.. ओळखतो.”
“कोण आहेत मग हे”
“मान खाली घालूनच आम्ही बोललो. येड्याचे सर आहेत.”
त्यावर आप्पा बोलले..
“ते आले होते ना दुपारी घरी”
“हो”
मग,” तुम्ही दोघींनी सरांना आत बोलवून ,का? चहापाणी दिला नाही.”

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


“आम्ही दोघी गप्प उभा”
“येड्याचे सर बोलले,जाऊ द्या हो, आप्पा, मुली अजून लहान आहेत. नसेल त्यांच्या एवढं डोक्यात आले.”
“त्यावर आप्पा बोलले, नाही या गोष्टीची त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे.”
“मनातून आम्ही दोघी पण घाबरलो होतो.”
“आप्पा बोलले.. तुम्ही चहा द्यायचा कंटाळा केलात ना ? मग आता दहा,बारा जणांना पोहे करा. व चहा पण..!”
“दोघी पण आत आलो.”
चुक लक्षात आली होती.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


मी कांदा चिरून दिला. बहिणीने पोहे बनवले. चहा ठेवला. तेवढ्या सगळ्या लोकांना पोहे व चहा दिला.
त्यानंतर कधीही आप्पा घरी असो वा नसो एकही माणूस बिना चहा,पाण्याचा दारातून गेला नाही.
“अतिथी देवो भव:” हे आप्पांनी आम्हाला आज शिकवले होते.
काळा,सावळा रंग,सहा फुट उंचीची धिप्पाड शरीरयष्टी, पांढरेशुभ्र धोतर,तीन बटने असलेला अंगरखा असा त्यांचा पेहराव. साधी राहणी व उच्च विचारसरणी असे राहाणीमान.
मात्र चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य, सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यामुळे मुखात गोडवा यामुळे ते सर्वांचे लाडके आप्पा होते.
तशी त्यांची श्री. एम.ए. पाटील. म्हणून ओळख सर्वपरिचित होती. एम.ए. पाटील.हे त्यांचे कॉलेज मध्ये पडलेले नांव..तसे त्यांचे मुळ नांव- मारुती अण्णा पाटील. असे होते.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


खरतरं मारुती या नावाला सुध्दा एक मोठा इतिहास होता. आप्पांच्या तोंडूनच तो मी ऐकला होता.
आप्पांचे वडिल अण्णा हरी पाटील.व आई हौसाबाई या दाम्पत्याला लग्नानंतर बरीच वर्षे मुलाबाळांचे सुख लाभले नव्हते. त्यामुळे त्यांची आई हौसाबाई धार्मिक गोष्टींकडे वळली. अर्थात माझे आजोबा जुन्या पिढीतील असले तरी त्यांचे विचार प्रगल्भ होते. त्यांचा नवस,सायास यावर जास्त श्रध्दा नव्हती. पण आजी हौसाबाई मात्र देवावर व दैवावर भरोसा ठेवू लागली. असेच तीने एकदा तुंगचा मारुती नवसाला पावतोच. म्हणून तुंगच्या मारुतीला नवस केला. की मला एखादे मुलबाळ होऊ दे. मी तुझ्या अकरा वाऱ्या पायी करीन.

आजोबांना पटत नव्हते. त्यामुळे ती थोरल्या दिरांना सोबत घेऊन. तिने तो नवस अगदी श्रध्दापुर्वक पुर्ण केला. व काय चमत्कार तिला यश मिळाले. तिच्या पोटात बिज वाढू लागले. आणि तिला देवाच्या कृपेने पुत्ररत्न झाले. तुंगाच्या मारुतीच्या आशीर्वादाने पहिला मुलगा झाला. म्हणून त्यांचे नाव मारुती ठेवले. सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला मारुती आपल्या आई, वडिलांसोबत कष्ट करत,करत शाळा शिकत होता.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

चौथी पर्यंतचे शिक्षण ताकारी गावात व्हायचे. पण हायस्कूल चे शिक्षण घेण्यासाठी त्यावेळी कुंडलला सायकल वरुन जावे लागत. पावसाळ्यात तर खूप हाल होत. तेंव्हाच आप्पांच्या मनात प्रश्न चमकून गेला होता. माझ्या गावात शाळा झाली तर मुलींना ही शिक्षण घेता येईल. त्यानंतर राजाराम कॉलेजमध्ये ‘कमवा व शिका’ या योजनेतून उच्चशिक्षण त्यांनी घेतले. त्यांचा हुशार व चुणचुणीतपणा ओळखून बापुजी साळुंखे यांनी त्यांना तळमावले इथे मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केली.
हसतमुख चेहरा व सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यामुळे त्यांच्या मुखात गोडवा होता. त्यामुळे नवीन संस्था व नवीन ठिकाणच्या लोकांना आपलेसे करून घ्यायला आप्पांना वेळ लागला नाही. परंतु ताकारी ची माती त्यांना खुणावत होती. माझ्या गावातील मुला, मुलींना शिक्षण मिळायलाच हवे. अशी त्यांची इच्छा होती.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

मारुतीच्या आशीर्वादाने झालेल्या या मुलाचा जन्मच मुळात ‘सामाजाच्या कल्याणासाठी’ झाला असावा. त्यांनी बापुजी साळुंखे. यांना मनातली इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर बापुजी साळुंखे. यांनी ताकारी गाव पाहिले. पण… त्यांनी आप्पांना सांगितले.
“ताकारी मध्ये शाखा काढणे अवघड आहे. हे गाव खुप छोटे आहे. व आर्थिक मदत सुध्दा इथे मिळणे अवघड आहे.”
बापुजींचा नकार आला खरे. पण हार मानणारे आप्पा नव्हते.

मनाशी एकच संकल्प आप्पांनी केला होता. ताकारीत शाळा काढायचीच. या पंचक्रोशीतील सर्व मुला,मुलींना शिक्षण मिळायलाच हवे.
त्यानंतर त्यांनी तळमावले इथे मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला. व ते ताकारीत आले. गाव व पेठ विभाग असे दोन भाग ताकारीचे होते. पेठ विभागात व्यापारासाठी आलेले काही गुजराती लोक होते. त्यातील ज्येष्ठ गृहस्थ शिवलाल काका हे होते. आप्पांनी त्यांची भेट घेऊन. मनातील इच्छा सांगितली. तेंव्हा शिवलाल काका बोलले.
“विक्री साठी गुळाची ढेप ठेवलेली खोली आहे. तोपर्यंत इथेच वर्ग चालू कर.”

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


अशा पध्दतीने गुळाच्या गोड ढेपेवरती शाळेचा “श्री गणेशा” केला. सुरुवातीला पाच,दहा मुलांना घेऊन चालू केलेले वर्ग मोठ्या संख्येने चालू झाले.पुढे अनेकांनी सहकार्य केले. व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्था व न्यु इंग्लिश स्कूल ताकारी ची माध्यमिक शाळा व शिक्षण संस्था चालू झाली.
आसपासच्या चार,पाच खेड्यातील मुले व मुली तिथे शिक्षण घेत होत्या. अल्पावधीतच या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले. दानशूर सुमतीभैईंनी आपल्या आई,वडिलांचे नाव देऊन शाळेला मोठी आर्थिक मदत केली. व पुढे न्यु इंग्लिश स्कूल ही शाळा श्री. पार्वती खेमचंद विद्यामंदिर उच्च माध्यमिक शाळा म्हणून नावारुपाला आली. आर्दश शाळा व आर्दश शिक्षक म्हणून अनेक पुरस्कार आप्पांनी घेतले होते. परंतु तळागाळातील सर्व सामान्य कुटुंबातील मुला, मुलींनी शिक्षण घेऊन अनेक जण आता उच्च पदावर कार्यरत आहेत. हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार होता.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

दरम्यान योग्य वयात मुलींचे विवाह झाले पाहिजेत. म्हणून त्यांनी बारावी नंतर मुलींचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले. लग्नानंतर पुढील शिक्षण घेता येते. हे त्यांना ठाऊक होते. त्याप्रमाणे माझ्या दोन्ही बहिणी लग्नानंतर शिक्षण घेऊन. एक बहिण प्राध्यापिका झाली. तर दुसरी बहिण ग्रंथपाल म्हणून पुणे येथे सिम्बायोसिस कॉलेजला आहे. तर भाऊ R.T.O म्हणून शासकीय अधिकारी झाला. माझे ही लग्न बारावीच्या निकाला दिवशीच पक्के झाले. आप्पांचेच बाळकडू पिलेली मी त्यांचे शेंडेफळ अगदी तसेच हुशार व चुणचुणीत बारावीनंतर शिक्षण घेता यावे.म्हणून वडिलांनी कला शाखेतच प्रवेश घ्यायला लावला होता. शिवाय मार्कस पण मराठी, इतिहास या विषयात जास्त होती.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

दहावीत मी मराठी या विषयात प्रथम क्रमांक काढून त्या विषयाची स्कॉलरशिप मिळवली होती. बारावीचा निकाल ही अपेक्षेप्रमाणे खुप चांगला होता. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. लग्न झाले तरी शिक्षण पुर्ण होणारच यासाठी तिळमात्र शंका नव्हती. परंतु नियतीचे गणित काही वेगळेच होते. लग्नानंतर मी खेडेगावात व त्यातून एकत्र कुटुंब पद्धती आणि जुन्या विचारांना जोपसणारे कडक शिस्तीचे सासरे यांच्यामुळे पुढील शिक्षणासाठी माझे दरवाजे बंद झाले. वडिलांनी पुढे मला एक्स्टर्नल का होईना शिकवावे. क्रांती हुशार आहे. ती एक्स्टर्नल आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करेल. तुम्ही परवानगी द्या. अशी विनंती सासऱ्यांना केली.पण चुल,मुलं हेच विश्व मानणाऱ्या सासऱ्यांनी शिक्षणासाठी नकार दिला.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


सासर घरी मी सुखी होते. पण आपल्या पुढे शिकता येणार नाही. म्हणून या सुखाला,दु:खांची झालर होतीच. पण वडिलांच्या सानिध्यात स्वभाव नम्र व विनयशील झाला होता. त्यांच्या सहवासात माणुसकीचे धडे गिरवल्यामुळे येईल त्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाडस होते. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मी सासरी तब्बल २५ वर्षे वडिलांच्या अगदी उलट स्वभाव असणाऱ्या सासऱ्यांच्या कडक नियमांत राहिले. ज्या घरात मुली वयात आल्या तरी वडिलांनी त्यांना कधी बंधन घातले नाही. उलट कोणत्याही प्रकारचे लोक येऊ देत. त्यांना चहापाणी देऊन. आपुलकी ने सर्वांशी बोलायचेच हे स्वातंत्र्य होते.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

मुळातच माझे वडिल स्त्री शिक्षण,स्त्री समानता यासाठी धडपडणारे होते. मुलींनी धाडसी व्हावे. आत्मनिर्भर व्हावे. यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे मला या चार भिंतीतल्या घोषा परिस्थिती शी मिळते,जुळते घ्यायला वेळ लागला. लवकरच एकत्र कुटुंबातील रीतीरिवाज,कामे सगळे पटपट शिकले.एक मुलगा,एक मुलगी झाली. आता ती सुध्दा खुप मोठी झाली होती. आप्पांच्या सानिध्यात मी वाढल्यामुळे माझा मुळ स्वभाव मला शांत बसून देत नव्हता. निदान आपल्या पुस्तके तरी वाचायला मिळावीत असे वाटायचे. अशाच एका संधीचा फायदा मी घेतला.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


आज लग्नाचा वाढदिवस होता.लग्नाला २५वर्षे पुर्ण झाल्यामुळे हा रौप्यमहोत्सवी वाढदिवस थोडा खास होता.
माझे पती सिव्हिल इंजिनिअर…ते प्रत्येक लग्नाच्या वाढदिवशी मला काहीनाकाही भेटवस्तू नेहमीच द्यायचे.
“हॅप्पी एनवरसरी असे बोलतच म्हणाले, आज काय हवं आहे राणी साहेबांना गिफ्ट”
“खरं सांगू आज मला तुम्ही कराडचे यशवंतराव चव्हाण वाचनालयाचे सदस्य करा. हीच माझ्यासाठी मौल्यवान भेट ठरेल.”
“अगं पण तुला कोण पुस्तके बदलून आणणार”
” आता मुले मोठी झाली आहेत. देईल कोणीतरी बदलून “
“ठिक आहे असे बोलत पतीदेवांनी मला त्यादिवशी वाचनालयाची सदस्य केले.”
“खुप आनंद झाला होता मला “

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


आता आठ,दहा दिवसांनी वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळत होती. त्यातच अधूनमधून मी एखादी,दुसरी कविता तयार करु लागले. पेपरमधून माझी कविता ही छापली गेली होती.मनात तेवढेच समाधान होते. शिक्षण नाही निदान आपण ज्ञानाच्या सहवासात तरी आहोत. एकदा असाच एक योगायोग आला. कराडमध्ये कविसंमेलन होते. त्यामध्ये मी पण कविता सादर करावी अशी संयोजकांची इच्छा. मी पण क्षणाचाही विलंब न करता. त्यासाठी होकार दिला. कारण स्टेजवर माईक समोर घेऊन बोलणे. हे माझ्यासाठी नवीन नव्हतेच. गावपातळीवरुन तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणारी मी. बघून कविता सादर करणे काहीच अवघड नव्हते. त्या कार्यक्रमाला माझ्या आई व आप्पांना सुध्दा निमंत्रित केले होते. हे मला त्या दोघांना पाहिल्यानंतर समजले.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रम हॉलवर होता. शंभर, दीडेशे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. फारशी गर्दी नव्हती. अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. आता माझा नंबर होता. मी वही घेऊन उठले. माईक समोर आला.आणि काय कोण जाणे. माझा आवाज एकदम भरून आला. हात,पाय थरथरत होते. अंगाला घाम सुटला. समोरचे काहीच दिसत नव्हते. नंतर एकजण बोलला काकी घाबरु नका. तुम्ही खुर्चीवर बसून कविता सादर करा. कविता खुप छान आहे. या शब्दांनी मला थोडा दिलासा आला. मी कशीबशी ती कविता सादर केली. आई, आप्पा घरी गेले. मी पतीदेवांच्या सोबत माझ्या घरी आले.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


घरात पाऊल पडताच. मी मोठ्याने रडू लागले. अगदी हुमसून.काय झाले नक्की हे मिस्टरांना सुध्दा समजेना.
“अगं काय झालयं, ते तरी सांगशील की नाही.”
“खुप वेळाने रडत,रडतच मी मिस्टरांना बोलले.”
काय वाटले असेल आज माझ्या आप्पांना, माझी ही अशी अवस्था बघून. मुली धाडसी व्हाव्यात म्हणून भाषणासाठी नेहमी आम्हाला प्रोत्साहन दिले होते. आणि आज माईक समोर आल्यावर हे धाडस..आज पर्यंत भाषणात मिळवलेली सगळ्या बक्षिसांची किंमत शून्य झाली. अश्रू थांबतच नव्हते. शेवटी मिस्टरांनी माझी समजूत काढली.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


“हे बघ तू उद्या पहिल्यांदा आप्पांना फोन लाव. त्यांच्याशी बोल म्हणजे तुला बरे वाटले. तू ज्या पध्दतीने विचार करतीयेस. तसे आप्पांना काहीच वाटले नसणार आहे.”
दुसरा दिवस उजाडला. गहिवरल्या मनानेच मी वडिलांना फोन लावला.
“हॅलो..!”
“हां आप्पा मी क्रांती बोलतीये.”
“बोल क्रांती”
“काही नाही आप्पा काल स्टेजवर माझी तशी अवस्था पाहून तुम्हाला खुप वाईट वाटले असेल ना?”
“तिकडून आप्पांचे शब्द कानावर पडत होते.”
“अगं काही नाही.. तुझं धाडस नाही संपलेले….तर तू तुझा आत्मविश्वास गमावला आहेस”
“तो गमावला यात तुझी चुकी काहीच नाही. तुझ्या सासर घरचे वातावरण तसे आहे.”
“कुठे जाणे नाही,कुणाचे येणे नाही. समाजात जाऊन कुणाशी बोलणे नाही.”

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

अगदी माहेरचे लोक आले तरी फक्त जाताना तुला भेटायची परवानगी.अशा वातावरणात राहून तु २५ वर्षांनंतर स्टेजवर गेल्यानंतर भिती वाटणे साहजिक आहे.
फक्त आता इथून पुढे एकच काम कर. ज्या,ज्या वेळी तुला संधी मिळेल. त्या,त्यावेळी त्या संधीचा फायदा करून घे. आणि मग बघ तु गमावलेला आत्मविश्वास तुला पुन्हा मिळेल. आप्पांच्या या बोलण्याने मला खुप मोठा धीर मिळाला. तिथून पुढे मग मला लगेचच ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या. आणि उमेदवार म्हणून ओळख करुन देण्यासाठी जाहीर सभेत संधी मिळाली. ज्या गावात मला उंबरठ्याबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्याचं गावात आज मी गावच्या मध्यभागी हनुमान मंदिर समोर माईक घेऊन उभा होते. आणि काय गंमत आज खुप भरभरून बोलले. ते ही.एकदम खड्या आवाजात. टाळ्यांच्या गजरात माझे भाषण तर संपलेच. पण कधीही निवडून न देणाऱ्या पार्टीतून लोकांनी मला निवडून दिले.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

आणि हाच प्रसंग माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.आप्पांनी सांगितल्याप्रमाणे मला माझा आत्मविश्वास परत मिळवता आला. यानंतर मी मागे पाहिले नाही. राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादीचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष पद मला मिळाले. अनेक सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात मी धाडसाने काम करु लागले. २०११साली मी माझा “गंधवेणा”हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यावेळी माझ्या वडिलांना खुप आनंद झाला. २००८साली सासरे वारले. त्यानंतर माझे वडील बोलले. क्रांती आता मुक्त विद्यापीठांतून डिग्री पुर्ण कर. पण दुर्दैवाने मला तेंव्हा पाठीच्या मणक्यांच्या त्रास चालू झाला होता. भयंकर वेदना होत असल्याने मला दहा मिनिटे पण नीट बसता येत नव्हते. अशा अवस्थेत तीन तास पेपर लिहणे. अशक्य गोष्ट होती.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


“मिस्टर बोलले, आप्पा आता तिला डिगरीची काय आवश्यकता आहे.” मुलांसाठी शिक्षणाचा फायदा तर तिची मुले डिग्री घेऊन बाहेर पडली आहेत. आता घ्यायची म्हणून डिग्री नको घ्यायला. तसे ही तुमच्या सगळ्यांच्या डिगऱ्या नावाच्या पाठीमागे आहेत. त्या काही मेल्यानंतर लागणार नाहीत. पण क्रांतीने तुमच्या सर्वांपेक्षा मोठी डिग्री घेतली आहे. जिवंतपणी व मेल्यानंतरही तिच्या नावापुढे कवयित्री म्हणून डिग्री नेहमीच लागली आहे. त्या वाक्याबरोबर …
“आप्पांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले.”
नंतर येणाऱ्या गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमालेत ताकारी च्या शाळेत मला कवयित्री म्हणून एक पुष्प गुंफण्याचा मान मिळाला. त्याप्रसंगी …

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


“आप्पा बोलले, आजपर्यंत या शाळेतून अनेक विविध क्षेत्रात माझे विद्यार्थी आहेत. पण साहित्य क्षेत्रात एकही विद्यार्थी नव्हता. तर ती उणीव क्रांती ने भरुन काढली. हा गौरव माझ्यासाठी डिग्री पेक्षा कमी नव्हता. या विद्यापीठातील हा सर्वोच्च पुरस्कार मला भेटला होता. माझे बाबा,माझे वडील हेच माझे मोठे विद्यापीठ होते. त्यांच्या बोटाला धरुन ही बाळपावले ज्या धुळीत उमटवली. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळता, खेळता विनयशीलता, परोपकारी वृत्ती, समानता,माणुसकीचे धडे जिथे गिरवले. तेच हे “माझे विद्यापीठ” ज्यांनी मला आत्मविश्वासाचे बळ दिले. धाडसी,निडर बनवले. त्यामुळेच आज मी पुन्हा फिनीक्स पक्षाप्रमाणे उंच झेप घेऊ शकले. कागदोपत्री डिग्री मला घेता आली नाही. पण माझ्या या विद्यापीठांतून मला कणखरपणे जगण्याची.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi


जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याची,नवी दृष्टी मिळाली. ‘आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली’ असते. ज्या समाजात आपण जन्माला आलो. त्यांचे ऋण आपण फुल ना फुलाची पाकळी देवून फेडले पाहिजे. समाजाचे आपण सदैव ऋणी आहोत. हे शिकणारे माझे विद्यापीठ. या विश्वातील सगळ्या विद्यापीठापेक्षा मोठे विद्यापीठ होते. या विद्यापीठात मिळालेली डिग्री माझ्यासाठी अमूल्य आहे.
मला माहिती आहे.आज माझे वडील,माझे आप्पा माझ्या सोबत नाहीत. पण मला खात्री आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहेत.
माझ्या विद्यापीठाला कोटी,कोटी प्रणाम…!!?

सौ. क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे
ता. कराड.जि.सातारा.
??

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

Home Page

माझे बाबा माझे विद्यापीठ | Father Meaning in Marathi

क्रांती पाटील
क्रांती पाटील

"Author Information - सौ.क्रांती तानाजी पाटील., दुशेरे येथील रहिवासी असून, तालुका कराड आणि जिल्हा सातारा आहे. त्यांनी मराठी मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर १२ वी देखील पूर्ण केले आहे. त्यांना 1 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 7 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 1 वर्ष मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 1 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना हो काव्यभूषण व साहित्य भुषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - "

Leave a Reply