Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 शायरी

मैत्री व्यक्त करणे जरा अवघडच. पण जिवाभावाची मैत्री हि व्यक्त केल्याशिवाय माणसाच मन शांत बसत नाही. चला मग पाहूया Friendship Shayari in Marathi हा अनोखा प्रकार. ज्याने तुमची मैत्री व्यक्त पण होईल आणि awkward सुद्धा नाही वाटणार. या मराठी शायरी तुम्ही चारोळ्या म्हणून देखील वापरू शकता. ज्या ओळी आवडल्या त्या कॉपी करा आणि आपले स्टेटस किंवा designसाठी सुंदर पैकी वापरा. तुम्हाला आमचा हा शायरी ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे आम्ही देखील तुमच्या पर्यंत चांगले कंटेंट देण्याचा आटोकाट प्रयत्न चालू ठेवू.

जर तुम्हाला या ब्लॉग मधिल किंवा या वेबसाईट वरील कुठल्याही ब्लॉग मधिल कंटेंट बद्दल काही तक्रार असेल किंवा काही बदल सुचवायचे असतील तरी ते आम्हाला कळवा. आम्ही दिवसेंदिवस चांगला मराठी संग्रह तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू.

Friendship Shayari in Marathi | मैत्री वर मराठी शायरी

सुत्राशिवाय पुस्तकातलं गणित आणि मित्राशिवाय आयुष्यातलं गणित, कधीच सुटत नाही…
आणि हे ज्याला कळलं, तो आयुष्यात कधीच रडत नाही…..

मैत्री हसवायला शिकवते
मैत्री रडायलाही शिकवते
मैत्री ही खऱ्या अर्थाने
जीवन जगायला शिकवते…

डॉक्टर ची Handwriting
आणि मैत्री मधील Understanding
ज्याला कळते
त्याला निरोगी राहता येते….

Friendship Shayari in Marathi shayri maitri for friends

मातीचा गंध
अन् मैत्रीचा सुगंध
प्रत्येकाच्याच नशिबी येत नाही
अन् ज्याच्या नशिबी आली
त्याला दुःखी होऊ देत नाही…

झालं कितीही भांडण जरी
मनाला लावून घेत नाही
मैत्री मध्ये कधी
दुरावा येऊ शकत नाही

मैत्री ही कच्च्या धाग्याने बांधलेली नाही
तर एका अतूट नात्याने बांधलेली असते
मतभेद आले तरी सहज तुटणारी नाही
तर ही मैत्री समन्वयाने साधलेली असते

मैत्री मध्ये कुणी गरीब नाही
ईथे कुणी श्रीमंत ही नाही
प्रेमाच्या धाग्याने बांधली आहे
या मैत्रीला तोडायची कुणाची हिम्मत ही नाही

Friendship Shayari in Marathi for friends

मैत्री ही जणू साखरे सारखी आहे
पाण्यात टाकली तर दिसणार नाही
मात्र त्या पाण्या मधील गोडवा
हा कधी कमी होऊ शकणार नाही…

मैत्रीला नाव काय ठेवायचं
तेच मला कळत नाही
मैत्रीला स्वप्न नाव ठेवलं तर
ते कधी पूर्ण होत नाही
मैत्रीला मन हे नाव ठेवलं तर
ते कायम जुळून राहत नाही
म्हणून मैत्रीला मी श्वास नाव देतो
कारण श्वास मरेपर्यंत साथ सोडत नाही….

मैत्रीला वयाचं बंधन राहत नाही
मैत्रीला श्रीमंत गरीब यातला फरक समजत नाही
मैत्री मध्ये जात आणि धर्मामध्ये भेदभाव राहत नाही
म्हणून मैत्री मध्ये समानता आहे आणि ते कधी दूर होत नाही…

Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 मराठी शायरी मैत्री | Marathi Shayari Dosti

जाती मध्ये जाती आहे
माती मध्ये माती आहे
म्हणूनच मैत्री ही एक
न तुटणारी नाती आहे

प्रत्येकाला सांभाळून घ्यायला
देवाकडे वेळ राहत नाही
म्हणून त्याने मैत्री नावाचं मंदिर बांधलं
आणि यात यायला कुणाची परवानगी लागत नाही…

हातात हाथ द्यायला मैत्री ची साथ आहे
नसा-नसांमध्ये आमच्या इमानदारी आहे
आमच्याशी वाकडं करायची हिंमत करू नका
कारण आमची मैत्री ही जगात लय भारी आहे

बुद्धिबळातील सैनिकासारखं आहे आमचं
प्रसंगी राजा व्हायची हिम्मत ठेवतो
म्हणून रणांगणावरचं असो की आयुष्याचं
मैत्रीने युद्धात जिंकायची हिम्मत ठेवतो..

आम्ही मैत्री गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून कायम आहे
कारण गरज संपले पण
सवय कधीच संपत नाही
आणि म्हणून आमची मैत्री कधी तुटत नाही….

Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 मराठी शायरी मैत्री | Marathi Shayari Dosti

आमच्या बालपणाची मैत्री
किती सस्ती होती
आठवतेय मला पावसात सोडलेली
ती कागदाने बवणलेली कस्ती होती
आमची मैत्री मधली अशीच मस्त्ती होती

कुणीतरी विचारलं मला
सांग तुझ्या मैत्रीची किंमत काय
मी त्यास म्हटलो
बाळा आमच्या मैत्रीला विकत घ्यायची तुझी हिम्मत नाय….

मैत्रीची किंमत तेवढी आहे
की तिला घ्यायची कुणाची हिम्मत नाही
मैत्री ही अनमोल आहे
काही गंमत नाही….

मैत्री आणि प्रेमामध्ये
तफावत दिसून येते
मैत्री शिवाय प्रेम नाही
आणि प्रेमाशिवाय मैत्री नाही
हे सांगा कुणाला समजून येते

तुझी माझी मैत्री जणू, गुलाब अन् काट्याची आहे
काट्यांप्रमाने रक्षण करणारी, अन् सुगंध देणाऱ्या फुलाप्रमाणे आहे

Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 मराठी शायरी मैत्री | Marathi Shayari Dosti

College Life वर मजेशीर कविता वाचा

Marathi Quotes आयुष्यावर सुविचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Friendship Shayari in Marathi | मित्र खुश करतील या 20 शायरी”

Leave a Reply

%d bloggers like this: