गजानन महाराज संपूर्ण कथा | Best Gajanan Maharaj Katha In Marathi 2023

“गण गण गणात बोते “गजानन महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती आणि Gajanan Maharaj Katha In Marathi जाणून घेण्यासाठी हा लेख तुमच्यासाठी अति महत्त्वाचा ठरणार आहे.

कोण होते संत गजानन महाराज? ते कसे झाले प्रगट? काय केले त्यांनी चमत्कार ?यांच्या बद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहोत .अशा विविध प्रकारच्या साधू संतांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या ब्लॉगला सबस्क्राईब करा. आणि माझा ब्लॉग या वेबसाईटला भेट देण्यास विसरू नका.

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

गजानन महाराज संपूर्ण कथा | Best Gajanan Maharaj Katha In Marathi 2023

गण गण गणात बोते असा नेहमी उच्चार करणारे स्वामी संत गजानन महाराज यांचे जन्म ठिकाण शेगाव होय. हे शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या शेगाव या छोट्याशा गावामध्ये गजानन महाराज यांचा जन्म झाला. शेगाव हे पहिले कोणाच्या ज्ञानी ,मनी नव्हते .मात्र गजानन महाराजांच्या कीर्तीमुळे आणि त्यांच्या विविध चमत्कारांमुळे गजानन महाराजांचे शेगाव म्हणून या शेगावचा उल्लेख करण्यात येत असतो. तेथील भक्तांची आणि त्या गावांमध्ये असलेल्या लोकांची अशी मान्यता आहे. की,संत गजानन महाराज हे वैद्य सप्तमी माग महिन्यात भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट झाले होते, आणि सर्वांचे दुःख त्यांनी स्वतःवर ओढून घेतले. 2 3 फेब्रुवारी1878रोजी स्वामी संत गजानन महाराज यांचा जन्म झाला.

महाराष्ट्र आणि भारत भूमीवर जन्मास आलेले हे गजानन महाराज दत्तात्रय संप्रदायाचे भारतीय गुरु होते असे म्हटले जाते. खरंतर त्यांचं बालपण आणि त्यांचा जन्म कसा झाला, हे माहिती नाही .म्हणून ज्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये 1878 मध्ये गजानन महाराज सर्वांना दिसले म्हणून आपण तो दिवस त्यांचा प्रगट दिन म्हणून साजरा करतो. ऋषीपंचमी हा दिवस आपण त्यांची पुण्यतिथी म्हणून करत असतो. त्यांच्या जीवन चरित्राबद्दल दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर रीतीने विजय ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला .आणि त्यांचे जीवन चरित्र त्यांनी केलेले चमत्कार आणि कशाप्रकारे ते भक्ताच्या रक्षणासाठी धावून येत होते .याबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी त्या ग्रंथामध्ये दिली आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे श्री गजानन महाराज विजय ग्रंथ.

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

गजानन महाराजांचे पहिले दर्शन हे लोकांना भर दुपारी उन्हात वडाच्या झाडाखाली झाले होते. त्यावेळेला महाराज उष्ट्या पत्रवाड्यामध्ये असलेले फेकून दिलेले अन्न खात होते. एवढ्या उन्हात असून सुद्धा त्या उन्हाची जाणीव त्यांना होत नव्हती. तोंडामध्ये असलेले “गण गण गणात बोते “या शब्दाचा निरंतर जप चालू होता. इथे बसून असताना ,त्यांचे ते तेजस्वी रूप लोकांच्या पहिल्यांदाच नजरेत आलं होतं.

गजानन महाराज | Best Gajanan Maharaj Katha In Marathi 2023

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

गजानन महाराजांचे शेगाव मध्ये आगमन कसे झाले?

पंचपक्वानमहाराजांचे हे विचित्र वागणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेल ते तेजस्वी रूप पाहून शेगाव येथील रहिवासी बंकटलाल आणि दामोदर या तरुणांना त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. महाराजांकडे ते आकर्षित झाले .आणि गजानन महाराज हे साधे मनुष्य नाही याची त्यांना जाणीव होऊ लागली .ते कोणी तरी दिव्य पुरुष आहेत. आणि यांना आपल्या गावामध्ये घेऊन जायलाच हवे असं त्यांनी दोघांनी ठरवले .गावामध्ये नेल्यानंतर अनेक लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत होते. त्यांना विविध रंगाचे पंचपक्वान खायला देत होते,त्यांना कपडे देत होते, विविध प्रकारचे दान तेथील लोक त्यांना करत होते. मात्र गजानन महाराज या सर्व गोष्टीला फेकून देत असत ते त्या गोष्टींचा स्वीकार करत नव्हते.

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

त्यांचे राहणीमान कसे होते?

गजानन महाराजांमध्ये एक दिव्य विद्वान पुरुष लपलेला आहे. याची जाणीव तेथील रहिवाशींना होऊ लागली. त्यांच्या वागण्यावरून त्यांचा अंदाज ते घेऊ लागले. ते कुठेही झोपत आणि काहीही खात. दिलेले अन्न ते फेकून देत आणि उष्ट अन्न घेऊन ते त्यांचे पोट भरत.
गजानन महाराज हे मुख्या जनावरांची म्हणजेच प्राणीमात्रांची भाषा सहजच जाणून घेत होते. त्यांच्या या वागण्यावरून त्यांनी वेदशास्त्र या संपन्न जातीचा दाखला मिळवला. आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी ते प्रयत्न करीत असत. त्यांच्यामध्ये कुठलातरी योगी पुरुष आहे हे सर्वांच्या हळूहळू ज्ञानात आले.अस म्हंटल जाते की, ते दिगंबर अवस्थेत देखील राहायचे.

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

गजानन महाराजांचे चमत्कार

एकदा गजानन महाराज विश्राम अवस्थेत बसलो होते मात्र मुलांनी त्यांना चिली आणून दिली पेटवण्यासाठी त्यांना विस्तव याची गरज होती मात्र त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे साधन नसल्यामुळे बंकट लाल यांना त्यांनी जानकीराम सोनाराकडे पाठवले या जानकीराम सोनाराचा सोन्या-चांदीचा धंदा होता त्या वेळेलाच बंकट लाल हा त्याच्या दुकानात गेला सोनार त्यावेळेला नळी फुंकत होता बंकटलाल ने त्याला अगदी प्रेमाने दिसतो मागितले मात्र सोनाऱ्याने त्याची खूप निंदा केली महाराजांना तो अपशब्दाने बोलला आणि त्याला तेथून हाकलून लावले मुले रिकामा हाताने तिथून परत आले.

महाराजांना त्यांनी तेथील गोष्टीबद्दल सांगितले. मात्र महाराज हसले ,आणि म्हणाले अरे चीलम धरा, त्याला काडी लावा, बंकटलाल ने महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच केले. हातात चिलम पकडुन. आणि त्याला काडी धरून ते उभे राहिले. तात्काळ विस्तव पेटला चीलम पेटली. सर्व आश्चर्याने पाहू लागले . महाराजांच्या मुखातून धूर निघू लागला. गजानन महाराजांना तेथील लोकांनी अनेक नाव ठेवले होते, जसे की शिवशंकर, तर कोणी राम म्हणायचे, तर कोणी कृष्ण अवतार अशा विविध नावाने गजानन महाराज तिथे ओळखल्या जाऊ लागले. त्यांचा चमत्कार दिवसेंदिवस वाढत होता. असं म्हटलं जाते की गजानन महाराज हे लोकांच्या कल्याणासाठी जन्माला आले होते.

असंच एकदा शेगाव मध्ये असलेला खंडू पाटील हा महाराजांकडे गेला महाराजांकडे जाऊन बंडू पाटलाने गजानन महाराजांची पाय पकडले ,खंडू पाटील महाराजांचे पाय पकडून तो रडत होता, तेव्हा महाराज , त्याला म्हणाले, अरे तू श्रीमंत पाटील माझ्याजवळ काय भीक मागतोय. जा जा घरी जा तुला पुत्रप्राप्ती होईल तू त्याचे नाव भीक्या ठेवशील, काही काळानंतर बंडू पाटलाच्या घरी सुपुत्र जन्माला आला त्याने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव भिक्या ठेवले, आणि संपूर्ण गावाला आमरस पुरीचे जेवण दिले.

पंढरपूरच्या पांडुरंगाचा समोर 1910 मध्ये श्री गजानन महाराज(Gajanan Maharaj Information in Marathi) यांनी हे जग सोडण्याचा निर्णय भक्तांना सांगितला. त्यापूर्वी 1908 मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असेही सांगितले होते. भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. 1910 मध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख, वार, दिवस भक्तांना सांगितला.

गजानन महाराजांनी शेगाव येथील लोकांना त्यांचा आत्मरूप दाखवलं. पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगासमोर 1910 मध्ये श्री गजानन महाराज यांनी या भूमीवरून जाण्याचा निर्णय घेतला. पण या आधीच त्यांनी त्यांच्या भक्तांना त्यांच्या जन्माची तारीख ,वेळ ,वार याबद्दल सांगितलं होतं .आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच 1910 मध्ये त्यांनी समाधी घेऊन जगाला निरोप दिला.

Gajanan Maharaj Katha In Marathi | गजानन महाराज कथा

गजानन महाराजांचा उद्देश काय होता?

गण गण गणात बोते हा शब्द जपत लोकांच्या कल्याणासाठी प्रगट झालेले गजानन महाराज. यांनी लोकांना ईश्वर भक्तीचा संदेश दिला, ईश्वराच्या चरणी जाऊन स्वतः समर्पण करून तुम्ही आयुष्यामध्ये सुखी राहू शकतात ,असा त्यांचा बोध होता. माणसांमध्ये असलेला अहंकार तोडून माणुसकी हाच धर्म याबद्दल लोकांना समजावून सांगितले.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Sankashti Chaturthi Story in Marathi

Karna Story in Marathi

Avatar
Marathi Time

2 thoughts on “गजानन महाराज संपूर्ण कथा | Best Gajanan Maharaj Katha In Marathi 2023”

Leave a Reply