गणेश उत्सव परवानगी साठी ऑनलाइन अर्ज करा घरबसल्या | Ganesh Festival Permission Information In Marathi 2023

Ganesh Festival Permission Information In Marathi नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता सण गणेश उत्सव काही दिवसांमध्ये येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलो आहोत. सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश उत्सवासाठी परवानगीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Ganesh Festival Permission Information In Marathi

मित्रांनो पोलिसांकडून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना देण्यात आलेले आहेत की त्यांना गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवाना अनिवार्य आहे. परवाना काडण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तसेच कोणत्या वेबसाईटवर डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचा जेणेकरून तुम्हाला गणेश उत्सव परवाना काढण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणेशाची मुर्ती स्थापना करण्यापूर्वी पोलिस स्टेशनकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. यंदाच्या उत्सवासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून परवाना घ्यावा, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

गणेश उत्सव परवाना काढण्यासाठी ऑनलाइन लिंक

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx

अशाप्रकारे करा अर्ज
सर्वप्रथम
citizen portal वरील Maharashtra Police- services for citizen वर क्लिक करा:नंतर पहिल्या पेज वर गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल:
त्या दुसऱ्या पेजवर मंडळातील अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच इतर सदस्यांची नावे नोंद करून login- id बनवून ‘ओटीपी’ टाकून रजिस्ट्रेशन करावे.

Ganesh Festival Permission Information In Marathi

आपल्या गणेश मंडळाच्या नावाने अकाउंट तयार झाल्यावर लॉगिन आयडी व आपला पासवर्ड टाकून लॉगिन करा: आणि आपल्या सोयीनुसार आपली भाषा निवडा. त्यानंतर फॉर्म उघडेल:

गणेश उत्सव परवानगी साठी ऑनलाइन अर्ज करा घरबसल्या | Ganesh Festival Permission Information In Marathi 2023

त्या फॉर्मवर तुमच्या मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सहा ते सात सदस्यांची पूर्ण नावे तसेच त्यांचा मोबाईल नंबर व आधार क्रमांक इत्यादी माहिती भरावी: गणेश उत्सव स्थापना तारीख वेळ तसेच मिरवणूक असल्यास मिरवणुकीची वेळ तारीख व मिरवणूक आहे “होय” या बटणावर वर क्लिक करावे:मंडप आणि मूर्ती देखाव्याची माहिती द्या मंडप मालकाची संपूर्ण माहिती नोंदवावी तसेच ज्या ठिकाणी मंडप उभा करायचा आहे. त्या ठिकाणचे (गल्ली, नगर, शहर) नाव लोकेशन भरावे.

Ganesh Festival Permission Information In Marathi

गणेशोत्सवात देखावा साकारणार असल्यास त्याची माहिती द्यावीपरवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे…- मंडळ किंवा संस्था रजिस्ट्रेशन केलेले धर्मादाय आयुक्तांचे नोंदणीपत्र: गेल्या वर्षी पोलिसांकडून घेतलेल्या दाखल्याचे प्रत एक कॉपी सोबत ठेवावी: सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना करत असताना त्या जागेची ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच स्वतःच्या मालकीची जागा असल्यास त्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे.

Ganesh Festival Permission Information In Marathi

तात्पुरत्या स्वरूपात विजेचे कनेक्शन घेत असल्यास वीज कनेक्शन पावती- शेवटी भरलेल्या माहितीची खात्री करून फार्म सबमिट करावाएक गाव एक गणपतीसाठी पुढाकार हवागणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडून ऑनलाइन परवाना घ्यावा.

गावातील तरूणांनी एकत्र येवून ‘एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्यावा. शांततेत, आनंदात सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा.- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीणशहरातील मंडळांना पोलिस ठाण्यातून मिळेल परवानाशहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना संबंधित पोलिस ठाण्यातून ऑफलाइन परवाना दिला जाणार आहे. सर्वांनी सर्व नियम व अटींचे पालन करून आनंदात उत्सव साजरा करावा.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांवर मंडळांनी भर द्यावा.- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

Ganesh Festival Permission Information In Marathi

गणेश उत्सव परवानगी


यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शांततेत व आनंदात सर्वांनी हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात मूर्तीची सुरक्षा व देखभालीची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. समोरील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

Ganesh Festival Permission Information In Marathi

परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यावर त्याची प्रिंट काढून पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिस ठाण्याकडून रीतसर परवानगी मंजूर झाल्यावर परवानगी मिळणार आहे. परवाना मंजूर झाल्यावर पोलिस ठाण्याचा त्यावर सही- शिक्का व सूचना पत्र असेल.

त्याशिवाय परवाना ग्राह्य मानला जाणार नाही, याची सर्व गणेशोत्सव मंडळांनी नोंद घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला गणेश उत्सव परवाना माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील माहिती मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद…..

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: