गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

गणेशोत्सव ! महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक दिवस चालणारा सण. Ganesh Utsav Niband Marathi मध्ये आपण या उत्सवाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

आपण सर्व भारतीय वर्षभरामध्ये अनेक सण साजरी करतो, त्यामधील एक सण म्हणजे गणेश उत्सव (गणेश चतुर्थी) हा देखील एक महत्त्वाचा सण आहे व सर्व लहान मोठ्याचा आवडता सण म्हणजे गणेश उत्सव हा आहे.

Ganesh Utsav Essay In Marathi

गणेश उत्सव निबंध मराठी

गणेशोत्सव हा माझा खूप आवडता सण आहे.माझाच म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की लहान मुला पासून ते मोठ्या पर्यंत सर्वजण गणेश उत्सवाचे खूप आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश उत्सव हा पावसाळ्यामध्ये येणारा सण आहे.
आपल्या मराठी महिन्यांमध्ये भाद्रपद महिन्यात हा सण साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके बप्पा श्री गणेशांचा जन्म झाला होता. श्री गणेशांच्या जन्मदिवसाला आपण गणेश चतुर्थी हा दिवस म्हणून साजरा करतो. श्री गणेशा शिवशंकर व माता-पार्वती यांचे पुत्र आहेत. प्राचीन कथेनुसार असे म्हणतात की माता पार्वती आराम करत असताना, त्यांनी श्री गणेशाला त्यांच्या आराम खोलीत कोणालाही प्रवेश देऊ नका असा आदेश दिला. श्री गणेश माता पार्वतीचा आदेश चे पालन करत असताना. तेथे शिवशंकर आले व त्यांनी माता-पार्वती च्या आराम खोलीत जाण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा माता पार्वतीच्या आदेशानुसार श्री गणेशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्या रागातून श्री शिव शंकराने गणेशाचे डोके त्यांच्या त्रिशूळाणे कापले, व नंतर माता पार्वतीने ते पाहिले तेव्हा त्यांनी शिव शंकराला आदेश दिला की तुम्ही आधी गणेशाला जिवंत करा. तेव्हा त्यांनी गणेशाला जिवंत करण्यासाठी हत्तीचे डोके गणेशाला बसवले. व त्यांना पुनर्जीवन दिले असे त्या कथेमध्ये सांगितले जाते.

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

श्री गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. त्यामध्ये मुख्य आकर्षण पुणे, मुंबई, कोकण व मराठवाड्यात या सणा निमित्त सार्वजनिक ठिकाणी विविध खेळ, आकर्षक देखावे, पोवाडे, नाट्य, नृत्य कार्यक्रम विविध कार्यक्रम सादर केले जातात.

गणेश उत्सव हा सण सार्वजनिक साजरा करण्याची परंपरा बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. त्यांचा हा सण सार्वजनिक साजरा करण्याचा उद्देश हा होता की सर्व जनतेने एकत्रित येऊन कोणतेही मतभेद न ठेवता. एकत्रित साजरा करावा व एकजुटीने संघटित राहावे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

गणेश उत्सव हा सण अकरा दिवस साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वजण आपल्या आवडत्या व लाडक्या बाप्पांची मूर्ती आपल्या घरी घेऊन येतात, व स्थापन करतात. गणेश मूर्ती स्थापन करण्याच्या ठिकाणी छान प्रकारे डेकोरेशन केले जाते. तसेच प्रत्येक गाव गावी व सार्वजनिक गणेश मंडळामध्ये मोठ्या उंचीची गणेश मूर्ती स्थापन केली जाते. व विशेष असे आकर्षक देखावे तेथे सादर केले जातात. गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करतो तेव्हा त्यांना आपल्या घरी घेऊन येताना मोठा गजर करत घरी घेऊन येतो. तसेच तेव्हा त्यांची पूजा व आरती केली जाते. नंतर सर्वांना गोड गोड प्रसाद देऊन गणपती बाप्पा मोरया या गजरात श्री गणेशाचे स्वागत केले जाते.

त्याचप्रमाणे इतर दहा दिवस त्याच मोठ्या उत्साहात रोज श्री गणेशाची आरती व पूजा होते. व सार्वजनिक ठिकाणी रोज विविध कार्यक्रम सादर केले जातात. त्या कार्यक्रमांमध्ये लहान मोठ्या पासून महिला ही मोठ्या प्रमाणत सहभागी होतात. तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी आकर्षक देखावे सादर केले जातात.

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

तसेच दहा दिवसानंतर तो दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला गणेश श्री गणेश विसर्जन करायचे असते. त्या दिवसाला अनंत चतुर्थी असे म्हटले जाते. बाप्पाची विसर्जन करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात त्यांच्यासाठी एक रथ सजवला जातो नंतर त्यांची पूजा व आरती केली जाते. व ती वेळ येते की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते ११ दिवसाच्या आठवणी सोबत घेऊन बाप्पाची विसर्जन करावे लागते. सर्वजण मोठ्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या गजरात बाप्पाचे विसर्जन केले जाते. व सर्वजण हा सण खूप उत्साहात साजरा करतात.

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

तर मित्रांनो तुम्हाला गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav niband Marathi
हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

1 thought on “गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Essay In Marathi”

Leave a Reply

%d bloggers like this: