संध्या यांची आणि गौराई प्रसन्नतेने हसली हि Gauri Ganpati Story in Marathi असून त्यात त्यांच्या स्वतःच्या घरच्या गौरीपुजानाचे वर्णन वाचून मन अतिशय प्रसन्न होते.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली | Gauri Ganpati Story in Marathi

“अगं थांब बाळा अजून नाही ग, गौरींना नैवेद्य दाखवायचाय ना अजून!! त्याशिवाय कुणीही काही तोंडात टाकायचं नाही तू सुद्धा नाही, आजी रागवेल बरं नाहीतर,वर्षा आपल्या सहा वर्षांच्या परीला म्हणाली.
“कधी होणार तुमचं, केव्हाची वाट बघतेय मी, मला भूक लागली ना,” परी एवढंस तोंड करून म्हणाली.
“रोज जेवतेस ना वेळेवर, एक दिवस वाट पहायची बाळा जरा. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्ण बाईचं पान वाढलं की तुला पण बसवेन तिच्याबरोबर ठीक ok न,
“एवढाss वेळ, मला खरंच भूक लागली. ती भजी दिसतायत, पुरणपोळी दिसतेय समोर, मला खावंसं वाटतय ना ग आई परी काकुळतीने म्हणाली.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
“जा आता तिकडे, उगीच इथे स्वैपाकघरात लुडबुड नको करू बर दिसलं तर आज्जी ओरडेल उगाच,” असं म्हणत वर्षाने परीला जवळजवळ बाहेर ढकललच.
ती किरकिरतच आतल्या खोलीत जाऊन बसली.
तिला बघून जरा टेकायला म्हणून तिथे बसलेली तिची आजी उठली. स्वयंपाकघरात गेली आणि परीचं ताट वाढून गौरीला नमस्कार करून तिला जेवायला सांगितलं.
वर्षाला कळलंच नाही हे काय चाललंय ती सासूबाईंना म्हणाली, काय झालं चुकलं का काही माझं? सवाष्ण नाही आली अजून, गौरीला नैवेद्य नाही दाखवला, तुम्ही तिला का वाढलत? तुमचं तर नेहमी सगळं कडक असतं. ती आली होती माझ्याकडे भूक लागली म्हणून, मी तिला समजावून पाठवलं होतं. थांबली असती ना ती.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
हो थांबली असती ती, पण मलाच तिचा चेहरा बघून राहवलं नाही. सवाष्ण कधी येणार काय माहीत? तिने सांगितलेली वेळ जाऊन अर्धा तास झाला. नैवेद्याच सगळं ठेवलंय मी बाजूला. खाऊ दे परीला. घरची चालती बोलती गौरचं आहे ती!!
वर्षाला कळेना, एकदम असं आपल्या सासूला झालं काय? काल तर गौरीची तयारी करताना माझ्यावर खेकसल्या होत्या या. आतापर्यंत तर कधी नव्हत्या या अशा!! दर गौरी-गणपतीत काय कुठल्याही सणाला यांचा तमाशा ठरलेलाच असतो. यांच्या मनाप्रमाणे कितीही काही केलं तरी याचं तोंड वाकड ते वाकडंच,
सगळं नुसतं चाललं असतं दडपणाखाली, सणाचा आनंद तो काय घेता येतच नाही कधी!!
आता काय नवीन मनात आलंय कोणास ठाऊक? पोरीला घालतायत खायला, मला जेवताना रडवणार की काय धास्ती च भरते मनात एकदम,
वर्ष्याच्या मनात बरंच काही चाललं होतं, तेवढ्यात तिला सासूबाईंनी बोलावलं.
ती गेली तशा त्या म्हणाल्या, आल्या बघ सवाष्ण बाई. गौरीच्या नैवेद्याचं ताट घेऊन ये आणि नैवेद्य दाखवून या सवाष्ण बाईंबरोबर तूही बस. मी वाढते तुम्हाला दोघींना.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
सासूबाई हे बोलल्या, तसे भीतीने वर्षाचे
हृदयाचे ठोके जास्तच वाढले, भरभर ही पळत होते आणि तिला अगदी सहज ऐकूही येत होते!!
ती पटकन म्हणली, आई काहीतरी काय, मी कशाला बसू. तुम्ही बसा हवतर. सगळेच बसा एकदम, बाबांना आणि ह्यांना पण वाढते मी.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
नाही, आज तूच बसायचं जेवायला यांच्याबरोबर. बाकीचे थांबतील थोड्या वेळ.
वर्षा तर ऐकूनच थक्क झाली . तिला काही केल्या समजेना, आपल्या सासूला नेमकं झालंय तरी काय? ती पुन्हा त्यांना म्हणालीच, अहो आई, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही हो. तुम्ही सगळे जेवल्याशिवाय. इतक्या वर्षांची सवय मला शेवटी जेवायची. तुम्हीच बसा मी वाढते.

आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
आता सणाच्या दिवशी वाद वाढवत बसणार आहेस का माझ्याशी? सासूबाईंनी डोळे वटारले तशी, सवाष्ण बाईसमोर आणखी तमाशा नको म्हणून ती मुकाट्याने जेवायला बसली.
सासूबाईंनी तिला अगदी आग्रह करून वाढलं, पोटभर जेवायला लावलं. वर्षाला पहिले जमेचना, असं कधी घडलंच नव्हतं कधी यापूर्वी. पण ते कुणी दुसऱ्याने वाढलेले गरम गरम पदार्थ एकेक करून पोटात जायला लागल्यावर तिचं मनच पोटापेक्षा जास्त तृप्त झालं.
सवाष्ण समाधानाने गेल्यावर मात्र वर्षाला
राहवलं नाही, ती भरल्या घरात ढसाढसा रडायला लागली. तिला असं पाहून मुलगी देखील तिला बिलगून रडायला लागली. सगळेच आपआपली काम सोडून बाहेर आले.
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
वर्षा रडतरडतच सासूबाईंना म्हणाली, आई काय चुकलं असेल तर सांगा, पण असं नका वागू हो. मोठं पाप केल्यासारखं वाटतय मला, तुमच्या सर्वांच्या अगोदर जेवले मी आज. मला हे पचणारच नाही.
दुसरी काही शिक्षा द्या पण हे असं नका वागू हो आई!!
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
तिला एवढं रडताना पाहून सासूबाईनी तिला जवळ घेतलं, आणि म्हणाल्या, का पचणार नाही? एवढी वर्ष तुला मागे ठेवून आम्ही खायचो. आम्हाला पचलं ना ते. दर गौरी जेवणाला आमच्याकडून राहिलेलं तू तोंडात घालायचीस, कधी तर एवढंस राहत असेल, त्यावरही समाधान मानायचीस. तुझे आवडते पदार्थ तुझ्यासमोर आम्ही संपवून टाकायचो, तरी कधी काही बोललेली आठवत नाही मला तू.
मग आज पहिल्यांदा गौरी जेवणाला घरची गौर तृप्त झाली तर तिला का नाही पचणार?
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
पण आई, हे काय असं अचानक सगळं इतकं बदललं? वर्षा मनातलं बोललीच एकदाची.
वर्षा या गौरींनी बदलवलं ग मला. काल आपण गौरीची तयारी करत होतो, तर तुझ्याकडून चुकून स्टँडला धक्का लागला, आणि मी तुझ्यावर खेकसले. तुला नको नको ते बोलले. तुझ्या माहेरचाही उद्धार केला. तुझे डबडबलेले डोळे दिसले मला, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून गौरीच्या नाकात नथ अडकवायला गेले, तर मला त्या गौरीचे डोळेही तुझ्यासारखेच डबडबलेले दिसले त्याक्षणी एकदम. आणि घाबरून काळजात जोरात कळ गेली. भास होता की काय होतं कोणास ठाऊक, पण जाणवलं एवढं खरं!!
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
जणू गौर मला सांगत होती, घरच्या गौरीला दुखवलस, रडवलस आणि माझं काय इतकं कौतुक करत बसली आहेस ? तिच्याकडे बघ जरा. माझं खरं अस्तित्व लेकिसुनांतचं आहे. त्यांच्या त्रासाने मी पण दुःखी होणार……….
कितीही मोठी पैठणी नेसवा, सोन्या- रूप्याने मढवा, कितीही सजवा धजवा, पन्नास प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा मी हसणार नाहीच!!
आणि खरंच ग माझी गौर हसताना मला कधीच दिसली नाही अगोदरही नाही आणि आताही नाही.
छोटया परीच्या काहीतरी मनात आलं तशी ती पटकन उठली, गौरींजवळ गेली, त्यांना निरखून बघितलं, आणि आनंदाने टाळया वाजवत म्हणाली आजी, तुझ्या दोन्ही गौरी तर आज हसतआहेत की ग गोड गोड!!”
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
परीच्या आजी ने झटकन गौरींकडे पाहिलं, आणि म्हणाली, खरंच की!! माझ्या गौरी हसतायेत आता…..
छान वाटलं ना आजी आता तुला, परी नाचत म्हणाली. तसं तिच्या आजीने तिला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेत म्हणाली, तू आणि तुझी आईच, माझ्या खऱ्या गौरी, तुमच्याशी चांगलं जमवून घेतलं की या दोन गौरीच काय आपलं घरही नेहमीच हसायला लागेल, हे कळलंय हो मला आता!!
वर्षा, संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तेव्हा तुझ्या मनासारखं कर सगळं. पाहिजे तश्या नटा तुम्ही दोघी घरच्या गौरी, मी नाही काही खुसपट काढणार नेहमीसारखी. पण तुम्हाला नजर लागू नये म्हणून दृष्ट मात्र आठवणीने काढिन बरं यावेळी!!”
आणि गौराई प्रसन्नतेने हसली By संध्या | Gauri Ganpati Story in Marathi 2023
हे नुसतं ऐकूनच घरातल्या सगळ्या गौराया अगदी प्रसन्नतेने हसल्या ……
तात्पर्य काय हे कळलंच असेल सर्वानाचं,तरी सांगते घरच्या सुना नाती नातू लेकी यांना सदैव आनंदी सुखाने नांदवा
संध्या
………………………………समाप्त………………………………………
प्रकाशवाटाच्या अधिकृत सभासदांसाठी खुशखबर.
साप्ताहिक प्रकाशवाटा🧾 वार्षिक सभासदत्व कसे घ्यावे❓
साप्ताहिक प्रकाश वाटा हे स्व निर्मित साहित्यिकांचे साहित्य यामध्ये कथा, कविता,गाणी सर्व काही प्रसिद्ध करण्यासाठी साप्ताहिकाचे वार्षिक सदस्यत्व फक्त 250/- रुपये इतके माफक दर निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक सदस्यत्व घेण्यासाठी साप्ताहिकाच्या संपादिका प्रतिक्षा मांडवकर – +918308684865 यांच्याशी संपर्क करावा. तसेच +918308684865 या क्रमांकावर फोन पे अमाऊंट पाठवून वार्षिक सभासदत्व घ्यावे.
दर महा आपले दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाईल.
शिवाय
आता तुमचे लेख ऑफलाइनच नाही राहणार तर ते जातील ऑनलाइन
प्रकाशवाटा आणि मराठी टाईम यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचे साहित्य होईल जगप्रसिद्ध ते देखील एकच सभासद फी मध्ये.
तुम्ही बरोबर वाचले आहे. प्रकाशवाटाच्या सभासद फी (250) मध्ये तुम्हाला मिळेल marathitime.in या सुप्रसिद्ध वेबसाईटचे सभासदत्व. ज्यात प्रत्येक महिन्याला तुमचे चार लेख/ कथा/ निबंध/ प्रवासवर्णन वेबसाईट वर टाकले जातील.
त्वरित या ऑफरचा फायदा घ्या. ऑफर पहिल्या 50 साहित्यिकांसाठी लिमिटेड.

संपादिका
प्रतिक्षा मांडवकर
8308684865