गौरीपूजन मराठी माहिती Gauri Pujan Information In Marathi

Gauri Pujan Information In Marathi महाराष्ट्रात अनेक सण साजरी केले जातात त्यापैकी एक गौरीपूजन हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असे देखील म्हटले जाते.

Gauri Pujan Information In Marathi

गौरीपूजन मराठी माहिती Gauri Pujan Information In Marathi

महालक्ष्मीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा नाश केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया गौरीपूजन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

भाद्रपद महिन्यात श्री गणेशाच्या आगमनानंतर काही दिवसानंतर घरोघरी गौराईचे मोठ्या थाटामाटात आगमन होते.
कुठकुठे त्यांची स्थापना लक्ष्मीपूजन म्हणून होते तर कोठे गौरीपूजन म्हणून त्यांची स्थापना केली जाते.

असा हा गौरी पूजनाचा सण मोठ्या उत्साहात भक्ती भावात व आनंदात साजरा केला जातो. चला पाहूयात त्या सणाविषयी सविस्तर माहिती.

Gauri Pujan Information In Marathi

भाद्रपद महिन्यात आपल्या घरी आधी गणपती बापांचे आगमन होते. व काही दिवसानंतर लगेच गौरीचे आगमन होते. काही कथांमध्ये असे म्हटले जाते की, गणपतीचे आगमन झाले त्यानंतर लगेच गणपती बाप्पा आपल्या बहिणीला आपल्या घरी घेऊन येतात. असे त्या कथेमध्ये सांगितले जाते.

तीन दिवस माहेर पणाला आलेल्या गौरी घरात आनंदाचे वातावरण घेऊन येतात. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा असतो. तर दुसरा दिवस त्यांचा पाहुणचार व त्यांना गोड गोड नैवेद्य दाखवला जातो. आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जानाचा असतो. असे एकूण तीन दिवस गौरीपूजन हा सण साजरा केला जातो.

Gauri Pujan Information In Marathi

  • गौरीपूजन स्थापना
    अनुराधा नक्षत्रावर गौरीपूजनाची स्थापना केली जाते. व ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरीपूजनाची विसर्जन केले जाते. असा एकूण 3 नक्षत्रावर हा सण साजरा केला जातो.

ग्रामीण भागामध्ये घरोघरी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व गौरी पूजन पासून ते गौरी विसर्जनापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये खूप आनंदाचे वातावरण या सणामुळे निर्माण होते. गौरी आगमनाच्या दिवशी गौरीचे आगमन होताना. घरातील बायका एक छान गीत सादर करतात. ते पुढील प्रमाणे आहे. कोण आलं ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठ आली सोन्याच्या पावला घेऊन घरा आली असं गीत म्हणण्याची परंपरा आहे. गौरीचे आगमन होताना घरातील बायका आपल्या दारासमोर छान प्रकारे रांगोळी काढतात.

गौरीपूजन मराठी माहिती

तसेच हळदी कुंकू मध्ये गौरीचे पावले देखील आपल्या घरामध्ये उमटली जातात. जेणेकरून गौरीचे आगमन आपाल्या घरी झाले असे गृहीत धरली जाते.

मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आपापल्या सोयीप्रमाणे गौरी पूजन केले जाते. मी तुम्हाला मराठवाड्यात कशाप्रकारे गौरीपूजन केले जाते त्याची माहिती या पोस्टवर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर गौरी आगमन स्वागत करताना गौरीचे मुखवटे एका ताटात ठेवून त्या ताटामध्ये घरातील गहू, ज्वारी किंवा तांदूळ ठेवतात. व त्यावर गौरीचे मुखवटे ठेवून ते संपूर्ण घरात फिरवले जाते. व त्यांना अशी विनंती केली जाते की आमच्या घरामध्ये अशीच भरभराट राहू दे असा आशीर्वाद मागितला जातो.

Gauri Pujan Information In Marathi

नंतर त्यांना स्थापन करण्यासाठी त्यांना एक छान सजावट केलेली घर बनवली जाते. त्याला मराठवाड्यात मकर असे म्हणतात. एकदम छान अशा प्रकारे सर्व बाजूंनी रंगीबेरंगी साड्या लावून त्यांच्यासाठी डेकोरेशन बनवले जाते. नंतर त्यांच्या मुखवटे कशाचा तरी आधाराने वरती ठेवून त्यांना हात बसून व छान साड्या नेसवून त्यांना तयार केले जाते. ती तयारी करत असताना सर्व बायकांमध्ये एक प्रकारची स्पर्धा तयार झालेली असते. प्रत्येक महिलेला वाटते की आपली गौरी लक्ष्मी एकदम सुंदर व उत्कृष्ट अशी दिसावी. त्याच्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चाललेले असतात. अशाप्रकारे प्रत्येक महिला आपापल्या गौरीची सुंदर देखावे सादर करतात दिसते. नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो.

Gauri Pujan Information In Marathi

नंतर उगवतो दुसरा दिवस ज्येष्ठ नक्षत्र या दिवशी गौरी पूजन केले जाते. व त्यांना विशेष अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी बायका सकाळपासून गौरीला नैवेद्य बनवण्यासाठी तयारीला लागतात. गौरीसाठी पुरणपोळी तसेच कडी, आमटी, भात, गोड भात, गुलाबजाम, लाडू, करंजी, चिवडा, पेढा, मोदक व अनेक चटपटी पदार्थ बनवतात. हे पदार्थ बनवून झाल्यानंतर दुपारच्या वेळी गौरी पूजन केले जाते.

तेव्हा एक विशेष पूजा स्थापन केली जाते. त्या पूजेमध्ये आपल्या परिसरातील झाडांची पाने खाली ठेवून त्यावर दिवे लावून महालक्ष्मीची आरती केली जाते. तसेच आपल्या घरी गणपतीचे आगमन झालेले असल्यामुळे त्यावेळी बाप्पाची देखील आरती केली जाते. व पूजा व आरती झाल्यानंतर जो नैवेद्य गौरीसाठी बनवला आहे. तो गौरीला अर्पण केला जातो. व नंतर परिवारातील सर्वजण मिळून जेवण करतात.

त्या दिवशी आपल्या सर्वांना विविध पदार्थ खायला मिळतात. गोड गोड खायला मिळते, त्या दिवशी घरी जेवणाची काही वेगळीच मज्जा असते. लहान मुले ह्या सगळ्यांचा खूप आनंद घेतात.

Gauri Pujan Information In Marathi

नंतर येतो तिसरा दिवस तो म्हणजे मूळ नक्षत्र या दिवशी महालक्ष्मी विसर्जन केले जाते. त्यादिवशी गावातील सर्व महिला सजून धजून मिळून प्रत्येक घरी जाऊन जे आपण गौरीचे विविध देखावे सादर केलेले आहेत ते पाहतात. व त्यांचे निरीक्षण करतात, आपल्या मैत्रिणी कशाप्रकारे ती सजावट केलेली आहे त्याचे निरीक्षण करतात. व ज्या महिला घरी देखावे पाहण्यासाठी आलेल्या आहेत त्याच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो.

व नंतर रात्री गौरीला नैवेद्य देऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्यापाशी असे मागने मागितले जाते की आम्हाला अशीच भरभराट द्या कधीही काही कमी पडू देऊ नका. अशी मागणी त्यांच्याकडे मागितली जाते.. व त्यांचे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे मराठवाड्यात गौरीपूजन हा सण साजरा केला जातो. तसेच कोकणामध्ये नदीतील वाहत्या पाण्यामध्ये जे दगड आहेत. त्यांना घरी घेऊन येऊन त्यांची पूजा करून गौरीपूजन हा सण साजरा केला जातो.

अशाप्रकारे महाराष्ट्रात व कोकणात गौरीपूजन हा सण साजरा केला जातो.

Gauri Pujan information in Marathi

Author :- Mr. Shankar Kashte

Shankar

तर मित्रांनो तुम्हाला गौरीपूजन मराठी माहिती
Gauri Pujan information in Marathi
हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…

वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद….

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: