गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

Author :- सौ भक्ती संकेत केंजळे, करंजे, पुणे -९६६५४७९९१२ यांची Ghost Marathi Story आज आपण वाचणार आहोत.

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

गोष्ट भुतांची – Ghost Marathi Story

भूतं आपल्या आजूबाजूला असतात का? तर हो असतात ना कोणत्या रुपात विचाराल तर तेच सांगणार आहे, जरी देव या पृथ्वीवरुन कधीच निघून गेले आहेत आणि सैतानांना संपवून गेले पण भुतं ,ते तर कोणत्या ना कोणत्या रुपात सतत माणसांच्या मनाशी खेळत असतात कधी लपंडाव, कधी शिवाशिव कधी चोर, पोलीस किंवा बुद्धीबळ सुद्धा ! थांबा थांबा सांगते सगळ विस्ताराने आपण डोळे मिटले की भूतं आपल्याला (मनाला) पकडायला येते आणि भूताने डोळे मिटलेले असले तर आपण त्यांना पकडायला जातो कधी कधी नूसता शिवशिव चाललेली असते जस की आपण भुतांना पकडायचे तर कधी भूतं आपल्याला पकडणार कधी कधी आपण चोर झालेलो असतो आणि भूतं पोलीस तर कधी आपण पोलीस होतो अन भूतं चोर झालेली असतात…

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

हे खेळ खेळायला वेळ, काळ, दिवस, रात्र, उजेड, अंधार, लहान, मोठे किंवा जागा बिगा काही लागत नाही सगळ राजरोसपणे चालत असतं.. त्यांना लागते ती फक्त तहान ! मग ते कोणत्याही जीवाचा घोट घ्यायला टपलेली असतात तुम्ही म्हणाल मी हे काय बरळतीये ? अरे पण तुम्हीच विचार करा माणसा माणसातले आपापसातील मतभेद, या लढाया आदीमानवापासून ते तुमच्या आमच्या घरापर्यंत आपण बघत आलोय ! ते सैतान कधी कुणाच्या मानगुटीवर बसेल अन बुद्धी भ्रष्ट करेल हे सांगता येत नाही….

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

देवांनी अमृत प्राशन केलं, ते अमर आहेत… आणि पुन्हा पुन्हा वाईट प्रवृत्ती जन्माला येण हे ही अमरत्वाचच लक्षण आहे. आपल्या भारत देशाला संतांची भूमी म्हटलं जातं इथ कितीतरी देवदेवतांची आपण नित्य पूजा अर्चा करत असतो आपल्या हिंदू धर्मातच भगवद्गीता व रामायण या ग्रंथांनी आपल्याला धर्मनीतीच्या कितीतरी गोष्टी शिकवील्या त्या आपण आचरणातही आणतो त्यांचे पारायणं करतो. आपण सतत देवदर्शनानिमीत्त त्या त्या भूमीवरील देवतांची पूजा करतो, त्यांचा आशीर्वाद मागतो पण तरी देखील या मनावर अजूनही विजय मिळवीता आलेला नाही ,ती लोक जी शिस्तप्रिय म्हणवली जातात किंवा स्वत:ची शिस्त, सवय कधी मोडत नाही म्हणजे त्यांनी त्यांच्या सवयीनुसार काही गोष्टी आचरणात आणलेल्या असतात अन ती ते त्यांचे कसोशीने पालन करतात जस की साधेपणा, स्वच्छतर, एकाग्रता वगैरे..

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

पण ज्यांचे मन एका ठिकाणी राहत नाही, आपण आपल्या वासनेला सतत तृप्त करायच्या मार्गाला लागलेलो असतो आणि वासना या सतत वा-यावरती झोके घेत असतात, मन हे सतत पळत असते कधी एके ठिकाणी येऊन बसते तर क्षणात दूस-याच्या मार्गावर येते आणी या वा-याची दिशा भरकटली की नाना त-हेचे वाईट विचार, दूर्बद्धी सुचू शकते अन् हे अगदी कोणालाही(कोणाच्याही मनाला)होऊ शकते मग आपली नित्याची, सवयीची कामे यांच्यावरही त्याचा परीणाम होतो किंबहूना आपल्या क्रोधावर रागावर, मनाच्या संतुलनावर परिणाम झालेला असतो.

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

जसे लहान मुले मोठी करणं ही खूप मोठी जबाबदारी असते तसे आपले मन सांभाळण्यासाठी खूप मोठी शक्ती लागते… आपण व्रतं, वैकल्य, कुळाचार, संस्कार, रोजची दैनंदिन कामे किंवा आपले चांगले उद्धीष्ट यात दिवस गुंतवतो… मगच आपले मन था-यावरती राहते नाहीतर पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे रिकामं मन सैतानाच घर व्हायला वेळ लागत नाही….विचारांची पक्वता वाढली की आपली दृष्टी विकसीत होते अन् दृष्टी विकसीत झाली कि आपण न्यायी वागू लागतो पण तरीही कुठेतरी कधीतरी मत्सर, द्वेषअग्नी किंवा स्वैराचार बळावतो अन् होत्याचे नव्हते व्हायला थोडाही अवधी लागत नाही. हा लेख लिहायचे कारण आज आपल्या जगात अनेक त-हेचे मतभेद, भ्रष्टाचार, कूटनीती किंवा अहवेलना आणि मानासिक कुरघोडी या बघायला मिळतात. यांनीच हळु हळु समाज पोखरत चाललाय….

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

इतके देवाचे धर्मांचे कुळाचाराने वागूनही माणूस आपआपसात मतभेद हेवेदावे करतोच म्हणजे त्याचे मन हे भरकटते त्याच्या मनावर त्या सैतानाचा किंवा भूताचा पगडा असतोच जे तो हे त्याला वागायला भाग पाडतो. शिवाय आपण बेसावध असतो त्या क्षणी देखील कधी आपला तोल सुटतो…. किंवा इतर आपल्या पाठीमागे काही कारवाया करण्यात मग्न झालेले असतात. साडेसाती, शनी, राहू, केतू आपल्या पाठीमागे लागतो किंवा माणसातील सैतानी प्रवृत्ती जागी होऊन त्याला नाना प्रकारची कृत्ये करायला लावते व या जागे झालेल्या सैतानाच्या दृष्टीस जो पडतो तो त्याला ठेचायला सुरवात करतो….

यावर कितीतरी सिनेमे नाटके, मालिका या होऊन गेल्या किंवा होताहेत त्यामध्ये सांगीतले ते सर्वच खोटे असते असेही नाही. या जगात जो पर्यंत अंधकार आहे तो अंधकार माणसाच्या आयुष्याला तिलांजली देण्यास तत्पर आहे, अधंकार हा माणसाचा दिवस खराब करण्याचे हर प्रकारे प्रयत्न करतो.

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

जो पर्यंत आपण शांततेला स्वीकारत नाही, बैचेनी, अतिउत्साह, क्रोध यांना आवरत नाही अन् प्रेमाची भाषा, करुणेची शिक्षा… शिकत नाही , अन तोपर्यंत आपले रक्षण हे आपले चांगले कुकर्मच करतात,आपण माणूसकीचे देणं कवटाळत नाही पण आपण तो त्रास सहण करतोच, जो हया सैतानाला करायचा असतो… कितीतरी लोकं आज मानसिक विकारांनी त्रस्त आहेत, लहान मुलांपासून किंबहूना जन्मजात मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत कोणालाही अन् कधीही मानसिक विकार हा होउ शकतो शिवाय वेगवेगळे आजार जसे कॅन्सर,ब्लडप्रेशर, हार्ट अ‍ॅटॅक इ. आहेतच अन असे हजारो आजार छोटे कधी मोठे माणसाला त्याच्या दैनंदिनीत बाधक ठरत आहेत.

गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023

………………………………समाप्त………………………………………

प्रकाशवाटाच्या अधिकृत सभासदांसाठी खुशखबर.

साप्ताहिक प्रकाशवाटा? वार्षिक सभासदत्व कसे घ्यावे❓

साप्ताहिक प्रकाश वाटा हे स्व निर्मित साहित्यिकांचे साहित्य यामध्ये कथा, कविता,गाणी सर्व काही प्रसिद्ध करण्यासाठी साप्ताहिकाचे वार्षिक सदस्यत्व फक्त 250/- रुपये इतके माफक दर निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक सदस्यत्व घेण्यासाठी साप्ताहिकाच्या संपादिका प्रतिक्षा मांडवकर – +918308684865 यांच्याशी संपर्क करावा. तसेच +918308684865 या क्रमांकावर फोन पे अमाऊंट पाठवून वार्षिक सभासदत्व घ्यावे.
दर महा आपले दर्जेदार साहित्य प्रकाशित केले जाईल.

शिवाय

आता तुमचे लेख ऑफलाइनच नाही राहणार तर ते जातील ऑनलाइन

प्रकाशवाटा आणि मराठी टाईम यांच्या संयुक्त विद्यमाने तुमचे साहित्य होईल जगप्रसिद्ध ते देखील एकच सभासद फी मध्ये.

तुम्ही बरोबर वाचले आहे. प्रकाशवाटाच्या सभासद फी (250) मध्ये तुम्हाला मिळेल marathitime.in या सुप्रसिद्ध वेबसाईटचे सभासदत्व. ज्यात प्रत्येक महिन्याला तुमचे चार लेख/ कथा/ निबंध/ प्रवासवर्णन वेबसाईट वर टाकले जातील.

त्वरित या ऑफरचा फायदा घ्या. ऑफर पहिल्या 50 साहित्यिकांसाठी लिमिटेड.

prakashvata marathi saptahik

संपादिका
प्रतिक्षा मांडवकर
8308684865

मराठी टाईमच्या इतर गोष्टी वाचा

Marathi story

Katha lekhan in marathi

Avatar
Marathi Time

1 thought on “गोष्ट भुतांची | Best Ghost Marathi Story 2023”

Leave a Reply