Good Morning Suvichar in Marathi | 100+ मराठी सुप्रभात सुविचार

जसे आपण इतरांविषयी चिंतितो तसाच आपला दिवस जातो असे म्हणतात. चला हे सुंदर Good Morning Suvichar in Marathi पाठवूनआप्तेष्टांच्या दिवसाची सुरुवात आनंदी बनवूया.

आणि तोच आनंद कर्माच्या सिद्धांतानुसार फिरून परत आपल्याला मिळेल यात काही शंका नाही.

Good Morning Suvichar in Marathi

शब्दांमुळे जुळतील मनमनाच्या तारा,

तर कधी शब्दांमुळेच चढू शकतो माणसाचा पारा,

शब्दामुळे आहेत जीवनातील सर्व आठवणी,

शब्दांमुळेच कधी अचानक दिसते डोळ्यात पाणी..

जिभेवर ज्याचा ताबा तो सर्वांची मने जिंकेल,

आणि सर्वांना जीक्णारा, का नाही जग जिंकेल…

शुभ प्रभात

___________________

माणसाचा वेळ आणि नाते ह्या दोन गोष्टींना किंमतीचे स्टीकर नसते.

पण त्या नसल्याकी कळते कि त्या किती अमूल्य होत्या.

शुभ सकाळ

___________________

जमिनीचे पाणी सर्व पिकांना एकसारखे मिळत असते, तरी कारल्याचा कडूपणा, उसाचा गोडवा आणि चिंचेचा आंबटपणा दिसून येतो. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा असतो. देव सुद्धा सर्वांना सारखाच असतो पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कर्मामुळे वेगवेगळे फळ मिळते.
गुड मॉर्निंग

___________________

Good Morning Suvichar in Marathi

दुसर्याच्या वाटा नेहमी दिसतात तितक्या सोप्या असतील असे नाही,

जेव्हा आपण त्याच्या जागी जाऊन वाटेतल्या ठेचा खातो तेव्हाच त्याची कष्टे कळतात.

गुड मॉर्निंग

___________________

Good Morning Suvichar in Marathi

लोक जेव्हा तुमच्या विरोधात आवाज उंचावतात किंवा फुकटचे सल्ले देत असतात,

तेव्हा हि गोष्ट लक्षात ठेवा कि,

मैदानात ज्यास्त आवाज फक्त प्रेक्षकांचाच असतो. तेच त्यांचे काम आहे. खेळाडूचे काम एकच…

खेळाकडे लक्ष देणे आणि विजय ओढून आणणे.

गुड मॉर्निंग

___________________

Good Morning Message in Marathi | Marathi Suvichar Good Morning | gm Marathi Suvichar

नाते कितीही वाईट असले तरी
त्यांना कधी तोडायचा विचार करू नका
कारण मळलेल्या कपड्यांना
स्वच्छ पाण्याने धुतलं की ते निर्मळ होतात…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

gm suvichar marathi Good morning Suvichar Marathi Marathi Morning Suvichar

स्वतःचा आत्मविश्वास एवढा मजबूत करा
की लोकांनी तुमच्या मनाचं कितीही
खच्चीकरण करण्याच्या प्रयत्न केला
तरी देखील तुम्हाला फरक पडणार नाही…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

मंदिरातील घंटा वाजविल्याशिवाय
आवाज होत नाही
कविता गायल्याशिवाय तिला
चाल लागत नाही
अगदी तसच
भावना व्यक्त केल्याशिवाय
त्याची किंमत लागत नाही
म्हणून व्यक्त व्हायला शिका…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

जिवनात पैसा, प्रसिद्धी मिळवा
कारण त्याशिवाय स्वतःला
सिद्ध करता येणार नाही
मात्र त्यासोबत माणसेही कमवा
कारण त्यांच्याशिवाय
पैसा, प्रसिद्धी ला अर्थ उरणार नाही…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

Good Morning Message in Marathi | Marathi Suvichar Good Morning | gm Marathi Suvichar

___________________

जीवनाला सुंदर बनवते ते
एकमेकांप्रती असलेली आपुलकी
बागेला सुंदर बनवते ते
त्यात असलेली फुले
चेहऱ्याला सुंदर बनवते ते
गालावरचं हास्य
अगदी तसच
आठवणींना सुंदर बनवते ते
मनापासून जपलेलं नातं
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

नारळ बाहेरून कसाही दिसत असला
तरी तो आतून कसा आहे
हे त्याला फोडल्याशिवाय कळत नाही
अगदी तसच
माणूस बाहेरून कसाही दिसत असला
तरी तो आतून कसा आहे
हे त्याला जोडल्याशिवाय कळत नाही
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

Good Morning Message in Marathi | Marathi Suvichar Good Morning | gm Marathi Suvichar

___________________

चेहऱ्यावरची सुंदरता पाहून
कधीच मैत्री करू नका
कारण माणसाचं वय वाढलं की
चेहऱ्यावरची सुंदरता आपोआप
कमी होत जात असते….
मैत्री करायची असेल तर
मनाची सुंदरता पाहून करा
कारण माणसाचं वय वाढलं की
मनाची सुंदरता आणखी
वाढत जात असते….
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

माणसं एकदाचे हरवले असतील तर
ते कधी ना कधी भेटतील च
मात्र जे माणसं बदलले असतील
ते परत भेटतीलच याची शास्वती नाही…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

अवकाशा एवढी उंच भरारी
गाठणे चुकीचं मुळीच नाही
परंतु उंच भरारी गाठल्यानंतर
आपलीच माणसे किड्या मुंग्यांसारखे
दिसता कामा नये
एवढी मात्र काळजी घ्या….
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

आश्चर्य आहे ना
84 लाख जिवामध्ये
एकटा माणूस पैसे कमावतो
मात्र त्याचा पोट कधीच भरत नाही
आणि बाकी जीव
उपाशी कधीच मरत नाही….
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

एकटे असल्याची खंत
मनात कधीच बाळगू नका
कारण थव्यामधील पक्षांपेक्षा
एकट्या गरुडाची झेप अधिक मोठी असते…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

श्रीमती आणि प्रसिद्धी
कधीही कमावता येते
मात्र एकदा विश्वास तुटला
की तो परत मिळवता येत नाही…
त्यामुळे कुणाचं ही विश्वास तोडू नका…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

हसत हसत जगलं आयुष्य
तर सुखात जाईल भविष्य
अन्यथा शेवटच्या क्षणी
काय कमावलं कळणार नाही
आजचे क्षण उद्या
परत कधीच मिळणार नाही…
म्हणून आजच हसत हसत जगा आयुष्य
आनंदी होईल तुमचं उद्याचं भविष्य
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

फुलांना बहरायला जशी
सूर्य किरणांची आवश्यकता असते
तशीच प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

Good Morning Message in Marathi | Marathi Suvichar Good Morning | gm Marathi Suvichar

___________________

तुमच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर
कुणी शंका घेत असेल
तर मुळीच वाईट वाटून घेऊ नका
कारण शुद्ध सोन्यावरच शंका घेतली जाते
शुद्ध लोखंडावर शंका घेतली जात नाही…
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

बागेमधील प्रत्येक फुलं
देवावर चढवली जात नाही
तर काही डोक्यावर ही
सजवली जातात….
अगदी तसच
मोजकीच माणसे असतात
ज्यांना हृदयात जपली जातात….
🙏💫शुभ सकाळ 💫🙏

___________________

Read Marathi Motivational Kavita “प्रयत्न करायचं तू सोडू नको” प्रेरणा देणारी अशी कविता जी तुमचा दिवस स्पुर्तीदायक करेल.

Read Quotes on Life in Marathi जीवन प्रेरणादायी बनवणारे महत्वाचे Quotes जे तुम्हाला कधीही खचू देणार नाही.

2 thoughts on “Good Morning Suvichar in Marathi | 100+ मराठी सुप्रभात सुविचार”

Leave a Reply

%d bloggers like this: