Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

श्रीराम भक्त हनुमान by सौ.क्रांती तानाजी पाटील | Best Hanuman And Ram Marathi Information 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Hanuman And Ram Marathi Information या कीवर्ड वर आधारित “श्रीराम भक्त हनुमान” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

लेख विषय :- श्रीराम व हनुमान

लेख पाठवण्याची तारीख :- २२-१- २०२४

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

🚩 *श्रीराम भक्त हनुमान🚩

नाम घेता मुखी राघवाचे |
दास रामाचा हनुमंत नाचे||

खरंच श्रीराम शब्द ऐकला की, लगेचच आठवतो तो हनुमान व हनुमंताची भक्ती. हनुमान हे श्रीरामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात. वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांचा हा हनुमान पुत्र आहे. याला केसरीनंदन, अंजनीपुत्र, पवनपुत्र, मारुती असे अनेक नावाने संबोधले जाते. जन्माला आल्याबरोबरच तो सूर्याला धरायला गेला. असे आपण ऐकत आलो आहे.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

हनुमान हा अतिशय बलवान व शक्तिशाली होता. अणु पासुनी ब्रह्मांडा एवढे होण्याची किमया सुद्धा आपण हनुमान स्तोत्रात वाचत असतो. यावरुनच हनुमानाच्या वीरतेची प्रचिती येते. त्यामुळे वीर हनुमान हे सुद्धा नाव त्याला आहे. एवढे बलाढ्य, शक्तिशाली शरीर परंतु त्याला हवेत सुद्धा उड्डाण घेता यायचे. म्हणूनच जन्मानंतर सूर्याला पकडायला जाणारा मारुती राम व रावणाच्या युद्धात जेंव्हा लक्ष्मणाला मुर्छा आली. त्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी ही औषधी वनस्पती हवी होती. द्रोणागिरी पर्वत ही तसा लांब होता परंतु तातडीने ती औषधी वनस्पती हवी होती. तरच लक्ष्मणाचे प्राण वाचणार होते.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

तेव्हा हनुमानाने उड्डाण घेऊन हवेतून प्रवास करून द्रोणागिरी पर्वतावर पोहोचले. परंतु संजीवनी औषधी वनस्पती हनुमंतांना कोणती आहे. हेच समजेना. तेव्हा हनुमंताने संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता. असे मानले जाते. द्रोणागिरी पर्वत एका हातावर ठेवून हवेतून आणणारा हनुमान किती प्रचंड शक्तिशाली असेल. याची कल्पनाच न केलेली बरी. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन विचार केला. तर हे शक्तिशाली रूप हि ताकद हवेवर तरंगण्याची जादू सुद्धा हनुमानांकडे होती. अर्थातच ही जादू म्हणजे ज्ञान. आताच्या काळात बोलायचे झाले तर तंत्रज्ञान, टेक्निक असं बोलता येईल. ते तेंव्हा हनुमंतांना अवगत असावे.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

श्रीराम भक्त हनुमान by सौ.क्रांती तानाजी पाटील | Best Hanuman And Ram Marathi Information 2024

हनुमानांच्या बद्दल अशीच एक आख्यायिका ऐकिवात आहे. जन्मानंतर हनुमान जेव्हा सूर्याला धरायला गेले. तेंव्हा त्यांनी सूर्य गिळण्याचा प्रयत्न केला. हनुमानांची ही ताकद ते बल पाहून सूर्यही घाबरला. हे सर्व पाहून इंद्र देवासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्रास्त्र हनुमानांच्या दिशेने फेकले. व त्या प्रकाराने हनुमानांचे तोंड वाकडे झाले. व ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी त्यांना भीतीपोटी शाप दिला. “तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल.” परंतु जर तुझी स्तुती करून तुला तुझ्या गुणांची आठवण करून दिली तर तुला पुन्हा त्या शक्ती प्राप्त होतील. असा उ:शाप ही तेंव्हा हनुमंतांना मिळाला.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

त्यानंतर पुढे श्रीराम वनवासात असताना श्रीरामाची व हनुमानांची भेट झाली. पुढे श्रीरामांचा निरोप माता सीतेला पोहोचवायचा होता. परंतु सीतामाता लंकेमध्ये होती. व तिथे पोचण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. कारण मध्येच समुद्र होता. समुद्र कोण आणि कसा पार करणार?? हा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा जम्बुवंन्ताने हनुमान अण्णा त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. सर्वांनी त्यांची स्तुती केली. हनुमान आणि उड्डाण करून लंका गाठली. लंकाधिपतीच्या सैनिकांनी हनुमंतांना पकडून रावणासमोर उभे केले. व त्यांच्या शेपटीला कपड्याच्या चिंध्या बांधून त्याला आग लावली.

तेंव्हा हनुमानांनी घराघरावर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंका पेटवली. त्यानंतर सीता मातेची भेट घेतली. व पुन्हा श्रीरामांकडे परत आले. व सीता मातेचे वर्तमान सांगितले.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

पुढे श्रीराम व रावण यांच्यात युद्ध हे अटळ ठरले. परंतु लंके कडे जायला समुद्रामध्ये सेतू बांधावा लागणार होता. तरच श्रीरामांना वानरसेना घेऊन लंकेत युद्धासाठी पोहोचता येणार होते. सेतू बांधणीसाठी पाण्यात जे दगड टाकले जायचे. ते खाली पाण्यात बुडत होते. अगदी श्रीरामांनी सुद्धा पाण्यात दगड टाकला तरी तो दगड पाण्यात बुडतच होता. त्यावेळी हनुमंतांनी प्रत्येक दगडावर ‘श्रीराम’ हे अक्षर कोरले. व नंतर ते दगड पाण्यावर तरंगत राहिले. त्यानंतर तो सेतू पूर्ण झाला. याचा अर्थ ‘भक्तीचा’ हा विजय होता. ‘श्रीराम’ या नावातच हनुमंतांचा केवढा भक्ती भाव सामावला होता. हे दिसून येते. त्यांच्या कणाकणांत श्रीराम विराजमान होते. आणि म्हणूनच हनुमंतांनी आपली छाती फाडून श्रीरामांना त्यांच्या भक्तीचे दर्शन दिले.

अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, हनुमंतांनी श्रीरामांचे रक्षण केले आहे. सावलीप्रमाणे ते सतत श्रीरामांच्या सोबत असायचे.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

प्रभू रामचंद्रांच्या चरणी हनुमंतांचे मस्तक सदैव लीन असायचे. सदैव दोन हात जोडलेले व मस्तक झुकलेले अशीच हनुमानांची मूर्ती आजही आपण पाहतो. वास्तविक तसा जर आपण विचार केला. तर वनवासात हनुमान श्रीरामांचे चांगले मित्र सुद्धा होऊ शकले असतेच की, कारण त्याचवेळी सुग्रीव,जामवंत हे मित्रच झाले होते श्रीरामांचे. परंतु हनुमान मात्र श्रीरामांचे दास झाले. असे मानले जाते की, हनुमान हा भगवान शंकरांचा अवतार आहे. असे असताना सुद्धा हनुमान मात्र श्रीरामांचे का बरे दास झाले असावेत. असा स्वाभाविकच मनाला प्रश्न पडला. या प्रश्नाचे उत्तर जेंव्हा मी शोधण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मला असे वाटले.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात. आयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची जेष्ठ महाराणी कौशल्या यांचे ते पुत्र होते. श्रीराम अतिशय तेजस्वी, चंद्रासारखाच कोमल आणि सुंदर असा त्यांचा चेहरा होता. रंग सावळा सुंदर, डोळे कमळासारखे मोठे व सुंदर होते. कानी कुंडल शोभणारे होते. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्यामुळे त्यांना अजानुभुज असे ही म्हणतात.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

अतिशय सुंदर, मनोहर रूप असणारे. श्रीराम जेवढे रूप सुंदर होते तेवढेच ते गुणसंपन्न सुद्धा होते. अतिशय लाघवी प्रेमळ, मनमिळावू स्वभावामुळेच श्रीराम सर्वांचे लाडके होते. ते एकबाणी एकवचनी एकपत्नी असे आदर्श पुरुष होते. तसेच ते सत्यवचनी सुद्धा होते. बंधुप्रेम, पत्नीप्रेम, मातृ-पितृप्रेम , मित्र प्रेम या साऱ्यांमुळे ते आदर्श पुरुष ठरले. मर्यादा पुरुषोत्तम अशी त्यांची ओळख रामयुगात झाली. अतिशय नम्र,लीन, भावुक अशा श्रीरामांच्या सदगुणांच्यामुळेच हनुमंत श्रीरामांचे दास झाले असावेत. शक्तीपेक्षा सुद्धा लीनता, नम्रता अंगी असेल तर आपोआपच सारे मनोभाव भक्तीत लीन होतात. आणि हीच भक्ती आपल्याला शक्ती देत असते. नुसती शक्तीच देत नाही. तर गुणबलशाली आपणांस बनवते. हाच निस्सिम प्रेमाचा भाव सदैव तनामानात राहावा. म्हणून हनुमानांनी भक्तीचा , श्रीरामांचे दास होण्याचा स्वीकार केला असावा.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

हनुमान हे चिरंजीवी आहेत. म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत. असे मानले जाते. ज्या,ज्या ठिकाणी जेंव्हा, जेंव्हा रामाचे नाव घेतले जाते. तिथे हनुमान सुध्दा हजर असतो असे म्हणतात. म्हणूनच श्रीराम या शब्दाबरोबर हनुमान हे नाव येतेच. सर्व संकटांचे हरण करणारा हनुमान आपणांस हेच सुचवतो. योग्य वेळीच आपल्या शक्तींचा वापर करा. इतर वेळी प्रभु चरणी लीन राहावा. तोच आपली भय चिंता पिडा दुःख यांचे निवारण करतो. राम नामातच सारे सुख सामावलेले आहे. राम नामाचा महिमा अगाध आहे.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

रामनामामुळेच वाल्याचा, वाल्मिकी झाला. रामनामामुळेच हनुमान श्रीरामांचा दास झाला. आपल्या ठायी कितीही शक्ती असली. तरी सदगुणापुढे जी शक्ती लीन होते. तीच खरी भक्ती तोच खरा भक्ती भाव.
राम या शब्दाचा अर्थ असाही होऊ शकतो. ‘म’ ची बाधा म्हणजे मी पणा सोडून राहीलेले तेज म्हणजे राम. हाच राम प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे. हेच तर हनुमंतांनी आपल्या सेवाभावातून सांगितले आहे. म्हणूनच हनुमान रामाचे दास झाले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटेल…

हृदयात राम प्रभू, मुखी तुझे राम |
दिसतो चराचरात, देव माझा राम ||
“श्रीराम जय राम जय जय राम राम”
भक्त श्री हनुमान की जय..!!🙏🙏

सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे
ता. कराड.जि.सातारा.

श्रीराम भक्त हनुमान | Hanuman And Ram Marathi Information

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Home

Author

  • क्रांती पाटील

    "Author Information - सौ.क्रांती तानाजी पाटील., दुशेरे येथील रहिवासी असून, तालुका कराड आणि जिल्हा सातारा आहे. त्यांनी मराठी मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर १२ वी देखील पूर्ण केले आहे. त्यांना 1 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 7 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 1 वर्ष मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 1 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना हो काव्यभूषण व साहित्य भुषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - "

क्रांती पाटील

"Author Information - सौ.क्रांती तानाजी पाटील., दुशेरे येथील रहिवासी असून, तालुका कराड आणि जिल्हा सातारा आहे. त्यांनी मराठी मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर १२ वी देखील पूर्ण केले आहे. त्यांना 1 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 7 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 1 वर्ष मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 1 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना हो काव्यभूषण व साहित्य भुषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - "

Leave a Reply