Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 107

Warning: Undefined array key "@type" in /www/wwwroot/marathitime.in/wp-content/plugins/seo-by-rank-math/includes/modules/schema/class-frontend.php on line 180

दास्यभक्ति by सौ. मोहिनी डंगर | Hanuman Information in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत Hanuman Information in Marathi या कीवर्ड वर आधारित अप्रतिम लेख लिहिला गेला आहे. चला तर वाचूया.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

साहित्यबंध लेख स्पर्धा

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

प्रभु श्रीराम अणि परम भक्त हनुमान यांच्या अनेक कथा ऐकिवात आहेत. खर्‍या खोट्या माहीत नाहीत पण जेव्हा जेव्हा या कथा ऐकल्या देव अणि भक्ताच एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रभु श्रीराम अणि हनुमान आहेत यावर ठाम विश्वास बसला.

नेहमी एक विचार मनात घुटमळायचा ,ज्या ज्या अनोळखी व्यक्ति एका नात्यात बांधल्या जात असतिल मग ते नाते कोणतेही असो त्यांचा काही पूर्वजन्मीचा किंवा त्याच जन्मातला संबंध असेल?जस जशी समज आली तसे कळू लागले हो अशीही नाती असतात..जास्त करुन जेव्हा मी पौराणिक कथा ऐकल्या किंवा वाचल्या,ह्या प्रश्नाचे उत्तर “हो असतात” याची खात्री पटली.त्या सर्व नात्यातील एक श्रेष्ठ नाते म्हणजे देव अणि भक्त.अणि देव भक्त ही जोडी म्हणजे श्रीराम अणि हनुमान.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

श्रीराम अणि हनुमान यांचे भावाचे नाते आहे असे श्रीरामचरितमानस या ग्रंथात सांगितले आहे. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या तीन पत्नी होत्या कौशल्या,सुमित्रा अणि कैकयी.तिघींनाही सन्तानप्राप्ति झाली नव्हती.त्यामुळे त्यांनी शृंगी ऋषींच्या सांगण्यावरून अग्निदेवाला प्रसन्न करायला यज्ञ केला.यज्ञ संपल्यावर अग्निदेव प्रकट झाले.त्यांच्या हातात खीरी ने भरलेले पात्र होते.त्यांनी ते दशरथ राजाला सोपवत तिन्ही राण्याना ती खीर ग्रहण करावयास सांगितले.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

कौशल्या अणि सुमित्रा दोघींनी ती खीर ग्रहण केली परंतु कैकयी अभिमानी असल्याने मला शेवटी खीर दिली त्या दोघींना माझ्या आधी दिली म्हणून मनात ग्रहण घेऊन बसली.त्यातच शंकराने माया रचून एका घारीला ती खीर पळवायला पाठवले. घारी ने ती खीर पळवली परंतु जंगलातून जात असताना शिवाची भक्ति करणाऱ्या अंजनीच्या हातात ती खीर पडली.शिवाचा प्रसाद समजून तिने ती खीर ग्रहण केली अशाप्रकारे तिन्ही राण्या अणि अंजनी गर्भवती राहिल्या.कौसल्या,सुमित्रा अणि कैकयी यांनी राम, लक्ष्मण, भरत,शत्रुघ्न यांना जन्म दिला तर अंजनी ने हनुमानाला.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

दास्यभक्ति by सौ. मोहिनी डंगर  | Hanuman Information in Marathi 2024

प्रभु रामचंद्रांच्या नशिबाला आले ते विधिलिखित असावे म्हणजे बघा ना,कितीतरी व्यक्ति,पक्षी,वृक्ष एका रामाच्या भेटीने उद्धरले.तशीच रचना हनुमान अणि प्रभूच्या भेटीची देखील असावी.मला देव आवडतो किंवा देव माझा आहे म्हणण्यापेक्षा देवाला मी आवडणे किन्वा मी देवाचा असणे जास्त सुखदायक, समाधानकारक.देवाला शोधावे लागत नाही वेळ आली की देवच आपल्याला भेटतो यावर माझा ठाम विश्वास आहे तसेच काहीसे प्रभु रामचंद्रजी अणि परम भक्त हनुमान यांच्या बाबतीत झाले.सीता मातेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम त्यांना जीव तिडकिन शोधत असताना दोहोंची भेट झाली.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

सुग्रीव अणि बाली या किष्किंध राज्यातील दोन वानर भावंडात युद्ध झाले तेव्हा भीतीपोटी सुग्रीव ऋष्यमूक पर्वताच्या गुहेत लपून राहिला.तेथे त्यांच्यासोबत हनुमान देखील होते.राम अणि लक्ष्मण सीता माते ला शोधत शोधत ऋष्यमूक पर्वतावर आले,जेव्हा सुग्रीव ने त्या दोन तेजस्वी मनुष्या ना येताना पाहिले तेव्हा तो भयभीत झाला.तो धावत हनुमान कडे गेला अणि कोणीतरी तेजस्वी मनुष्य पर्वता कडे येत असल्याची माहिती दिली,कदाचित ते बालीने पाठवलेले गुप्तहेर असणार अशा शंका दर्शविली.तेव्हा आपण एका ब्रम्हचार्‍याचा रूप घेऊन तपास करावा अशी विनंती केली.

सुग्रीव ने सांगितल्याप्रमाणे हनुमान ब्रम्हचारी बनून प्रभु रामचंद्रांजवळ गेला अणि विचारणा केली,तेव्हा रामाने स्वतःबद्दल माहिती दिली,आपली पत्नी रावणाने हरण केली असे सांगितले अणि तिच्याच शोधात मी अणि माझा भाऊ लक्ष्मण वणवण फिरत आहोत असे सांगितले.साक्षात प्रभु भेटल्याने हनुमान प्रफुल्लित झालेच पण आपल्या प्रभूला ओळखता न आल्याचे शल्य त्यांच्या मनाला बोचत होते.शिवाय सीता मातेचे रावणाने हरण केले म्हणून ते दुःखी व क्रोधित देखील झाले.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi


बावरलेल्या हनुमंताने श्रीरामाचे चरण धरले अणि प्रभु मी आपला दास आहे असे म्हणू लागले.प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला मिठी मारत तू माझ्या भावा पेक्षाही जवळ असल्याचे सांगितले कारण दासाला आपल्या देवा शिवाय कोणताही आधार नसतो अणि ज्याला आधार नाही त्यांचा मी आधार आहे असे म्हणत त्यांनी हनुमानाचे डोळे पुसले.त्यानंतर दोघांनी मिळून कशाप्रकारे सीता मातेचा शोध लावला हे आपण जाणतो.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

हनुमानाने छाती फाडून सीता राम यांचे दर्शन घडवले तो फोटो आपण सर्वांनी पाहिला असेल मी खूप लहान असेल तेव्हा त्या फोटो चा अर्थ आजोबाना विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलेली छोटीशी कथा सांगाविशी वाटते.श्रीरामा चे वनवास संपल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला,राज्याभिषेका ला आलेल्या प्रत्येक व्यक्तिला सीता अणि राम यांनी मौल्यवान भेटी दिल्या.एक नवरत्नाचा हार सीता मातेने हनुमा नाला दिला तेव्हा त्यांनी त्यातील एक एक मणी काढून फोडले अणि फेकून देत होते.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

ही कृति करत असताना लक्ष्मण त्याच्याकडे रागाने पाहत होते.शेवटी उठून भर सभेत ते ओरडले,प्रभू सीता मातेने जे हार या हनुमानाला दिले त्याची किम्मत तरी या वानराला माहीत आहे का, शेवटी माकड ते माकडच…असे म्हणताच श्रीरामांनी जे काही हनुमा ना ने केले त्याचे उत्तर हनुमानच देईल म्हणून हनुमान कडे हात दाखवला,तेव्हा हनुमान म्हणाले ज्या वस्तूवर राम नाम नाहीं ती वस्तू माझ्यालेखी अमूल्य नाही म्हणून मी ते मणी फोडून पाहिले, यावर लक्ष्मण म्हणाले मग तुझे शरीर देखील तू त्याग कारण तुझ्या शरीरावर देखील राम नाम नाहीं तेव्हा हनुमानाने आपली छाती फाडून सीता माता अणि प्रभु राम यांची प्रतिमा दाखवली..

खूप कथा ऐकिवात आहेत ज्यात श्रीराम उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचे सिद्ध झाले अणि हनुमान एक उत्तम दास.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ।
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ।I

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या ओळीतून हनुमानासारखी भक्ति मलाही कशी करता येईल,मला तो भक्तिमार्ग दाखवा अशी विनंती केली आहे.अशीच दास्यभक्ति माझ्याकडून ही घडावी ही हनुमान अणि श्रीरामा चरणी प्रार्थना!!!!
जय श्रीराम!!

सौ मोहिनी संजय डंगर,रायगड

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

दास्यभक्ति | Hanuman Information in Marathi

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Home

Author

  • मोहिनी संजय डंगर

    Author Information - सौ.मोहिनी संजय डंगर पेण येथील रहिवासी असून, तालुका पेण आणि जिल्हा रायगड आहे. त्यांनी सेमी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर विज्ञान देखील पूर्ण केले आहे. त्यांना 2 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 14 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील कविता हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर -

मोहिनी संजय डंगर

Author Information - सौ.मोहिनी संजय डंगर पेण येथील रहिवासी असून, तालुका पेण आणि जिल्हा रायगड आहे. त्यांनी सेमी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर विज्ञान देखील पूर्ण केले आहे. त्यांना 2 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 14 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील कविता हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर -

Leave a Reply