सुखाचे क्षण by सौ.क्रांती तानाजी पाटील | Happy Moment Story in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Happy Moment Story in Marathi या कीवर्ड वर आधारित “सुखाचे क्षण” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

सुखाचे क्षण | Happy Moment Story in Marathi

?साहित्यबंध समुह?

साप्ताहिक उपक्रम क्र. ६

कथा लेखन विषय :- छोट्या गोष्टीतील सुख
*दिनांक:२१/११/२०२३
*विषय-छोट्या गोष्टींतले सुख

*शिर्षक : सुखाचे क्षण

सुखाचे क्षण | Happy Moment Story in Marathi

सुख म्हणजे नक्की काय? ते नक्की कुठे व कसे मिळते. किंवा आजपर्यंत त्याचा शोध लागला आहे का? अर्थातच सुखाचा विचार करताना असे अनेक प्रश्न मनाला भेडसावत राहतात.
रामदास स्वामी म्हणतात, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे,विचारु मना तुच शोधूनी पाहे.’ यावरुनच सुख कशात सामावले आहे ते कळून येते.

प्रत्येक सुखाचा उगम हा आपल्या मनात असतो. मन आनंदी व समाधानी असेल तर मग अगदी छोट्या, छोट्या गोष्टींतून आपल्याला सुख मिळते. परंतु माणुस अर्थातच उलट वागतो. मोठं,मोठी स्वप्ने उराशी बाळगून आपल्या आयुष्यातील सारे सुखाचे क्षण गमावून बसतो व दु:खी होतो. सारे आयुष्य धावपळ,दगदग व अश्रु ढाळण्यात घालवतो. परमेश्वराने इतर पशु,पक्षी व प्राण्यांच्या पेक्षा मानवाला सुंदर शरीर, बुध्दी व वाचा दिली आहे. त्यामुळे तो इतरांना आपली सुखे,दु:खे सांगून आनंदाने जगण्याची शक्ती दिली आहे. परंतु तो आपला सारा वेळ इतरांशी तुलना करत राहतो. जिथे इतरांशी तुलना होते. तिथेच जीवनातील आनंद संपतो.पण फुलपाखरांकडून शिकावे. छोट्याशा आयुष्यात सुध्दा आनंदी व स्वच्छंदी जीवन कसे जगायचे ते.

Happy Moment Story in Marathi

सुखाचे क्षण by सौ.क्रांती तानाजी पाटील | Happy Moment Story in Marathi 2024

पावसाची पहिली सर आल्यानंतर जो मृदुगंध पसरतो. तो वास आपल्या किती सुख देऊन जातो ना? त्याच्या ओलाव्या मुळे तनामनाला मिळालेले सुख हे अवर्णनीय असेच असते. पहाटेचा तो सुखद गारवा अगदी क्षणभरात मनाला शहारा आणतो. दवांत न्हालेली सृष्टी किती नवथर भासते. आणि अलगदच चेहऱ्यावर हसू उमटते. सोनवर्खी सोनेरी किरणांची सळसळ सुवर्ण अलंकारा पेक्षाही सुंदर भासते. सृष्टीतील हे सारे नजारे किती सहजपणे आपल्याला सुखाचे दान करत राहातात.फक्त हे सुखाचे क्षण आपल्याला ओंजळीत पकडता आले पाहिजेत.

Happy Moment Story in Marathi

मनात प्रचंड वेदनांचे वादळ चालू असताना अचानक पाठीवर पडलेला मायेचा हात. अकस्मात एखाद्या प्रिय व्यक्तीची झालेली भेट. आई,वडिलांची,गुरुंची मिळालेली शाबासकी. चांगल्या कामासाठी केलेले कौतुक. अडचणीत केलेली मदत.काही काळजी करू नको. मी तुझ्या सोबत आहे. काळजी घे. हे बोलणारी वाक्ये. वाढदिवसाच्या अचानक दिलेल्या शुभेच्छा. आपण कोणीतरी एखाद्या व्यक्तीसाठी खास आहोत. या आणि यासारख्या असंख्य गोष्टी खरतरं खुप छोट्या आहेत .पण खुप सारे सुख देऊन जाणाऱ्या असतात.


जन्मापासुन ते मृत्यू पर्यंत या निसर्गाशी,पशू,पक्षी,प्राणी अनेक नातेसंबंध रक्ताचे,मानलेली या साऱ्यांशी निर्माण झालेली आपुलकी, प्रेम,माया या साऱ्यातच आपले सुख असते.
काळ बदलला आणि या यांत्रिक युगात माणूस यंत्राप्रमाणे पैशाच्या मागे धावू लागला. पैसा हा सर्वस्व झाल्यामुळे तो माणुसकी व नाती विसरला. लाखोंच्या गर्दीतही तो एकाकी झाला.

Happy Moment Story in Marathi


पैशावर मिळणाऱ्या मृगजळामागे धावून सुखाचा शोध घेत राहिला. मृगाला जसे आपल्या पोटातील कस्तुरी गंध माहीत नसतो. व तो चोहीकडे त्या वासाचा शोध घेत फिरतो. त्याप्रमाणेच सुखाचा शोध सुध्दा घेता येत नाही. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे सुख हे छोट्याशा गोष्टीतचं असते. अनेक अडचणी व संकटे जेंव्हा आपल्या समोर आवासून उभी असतात. तेंव्हा त्या सुखाची किंमत कळते. ते कसे हे एका छोट्याश्या उदाहरणा वरुन आपल्या समजून येईल.


एकदा असाच एक वाटसरु खुप दुरदुरचा प्रवास पायी करत असतो. चालता-चालता त्याला खुप तहान लागलेली असते. पण जवळपास त्याला पाणी दिसतच नाही. उन्हामुळे शरीर थकलेले असते. चार पावले ही आता चालवणार नाहीत. असे वाटत असतानाच त्याला जवळच पाण्याची विहीर दिसते. क्षणात त्याचा चेहरा आनंदाने खुलतो. तो पाणी घेण्यासाठी खाली वाकतो. तोच त्याचा तोल जातो. व तो त्या विहीरीतील दगडांच्या मधून एक छोटंसे रोपटे उगवलेले असते. त्यामध्ये तो अडकतो. पण ते झाड प्रचंड काटेरी असल्यामुळे त्याच्या शरीरात ते काटे घुसतात.व प्रचंड वेदना होत असतात.

त्या काटेरी जाळीतून तो खाली विहीरीत पडलाच नाही. शिवाय खुप वेदना. तहान तर खूप लागलेली. घसा कोरडा पडत चाललेला होता. त्याच झाडावर एक मधाचे पोळे लटकत होते. त्या मधमाश्यांना डोक्यावर पाहताना. त्याच्या घसा आणखीनच कोरडा पडतो.तेवढ्यातच एक नाग फणा काढून फुत्कारत समोर. हे दृश्य पाहून तो वाटसरु गर्भ गळीत झाला. मृत्यूशी झुंज देत तो आपलेच मरण पाहत असतो.

Happy Moment Story in Marathi

तेवढ्यातच नागाने आपला फणा काढून त्या वाटसरुला तो दंश करत असतो. त्या झटापटीत ते मधाचे पोळे फुटते. व त्या पोळ्यातील मधाचा तो एक, एक थेंब त्या वाटसरुच्या तोंडात पडत असतो. तो थेंब त्याला मृत्यूच्या दारातही खुप सुख देऊन जाते होता. म्हणून तर म्हणटले जाते. ‘सुख जवा एवढे तर दु:ख पर्वता एवढे.’ तात्पर्य काय तर…
संघर्षाच्या काळात छोट्या गोष्टींतूनच खुप सुख मिळत असते.


श्वान सुध्दा कधीतरी आपलेच शेपूट तोंडात पकडण्यासाठी धडपडत राहते. पण तो यशस्वी होत नाही. शेवटी कंटाळून मान वाकडी करुन जमिनीवर झोपतो तेंव्हा आपोआपच त्याची शेपटी त्याच्या तोंडाजवळ येते. अगदी त्याप्रमाणेच मलाही हे सुख भासते. सुख हे शोधून सापडणार नाही तर त्याचा उगम आपल्या मनातच आहे.

Happy Moment Story in Marathi


आयुष्य जगत असताना. आपले मन नेहमी छोट्या, छोट्या गोष्टींतूनच सुखावते.
आणि या छोट्या, छोट्या गोष्टी मनाला खुप सुख देऊन जातात.
स्वतः मी या छोट्या, छोट्या गोष्टींतूनच सुखावत असते.व हेच “सुखाचे क्षण” आनंदी जीवन जगायला पुरेसे वाटतात… चला!! तर मग तुम्ही सुद्धा अशा छोट्या, छोट्या गोष्टींतल्या सुखाचा आनंद घ्या. व हे “सुखाचे क्षण” हृदयात कोरुन ठेवा…!!

©® सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता‌.कराड. जि.‌ सातारा.

Happy Moment Story in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

Happy Moment Story in Marathi

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

Happy Moment Story in Marathi

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

Happy Moment Story in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

Happy Moment Story in Marathi

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

Happy Moment Story in Marathi

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

Happy Moment Story in Marathi

Home

क्रांती पाटील
क्रांती पाटील

"Author Information - सौ.क्रांती तानाजी पाटील., दुशेरे येथील रहिवासी असून, तालुका कराड आणि जिल्हा सातारा आहे. त्यांनी मराठी मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर १२ वी देखील पूर्ण केले आहे. त्यांना 1 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 7 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 1 वर्ष मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 1 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील लेख हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना हो काव्यभूषण व साहित्य भुषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर - "

Leave a Reply