हरतालिका व्रत कथा माहिती मराठी | Haritalika Vrat Katha Information In Marathi 2023

हरितालिका या व्रतामागील खरे रहस्य काय? Haritalika Vrat katha Information in Marathi काय आहे याची खरी कथा?
जाणून घ्या या व्रताचा आशय, काय आहे याची पूजा विधि?

Haritalika Vrat Katha Information In Marathi


मराठी टाईम तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशाच प्राचीन आणि ऐतिहासिक गोष्टींबद्दल विविध प्रकारची माहिती.
आणि जाणून घ्या अशाच नवनवीन गोष्टींना यासाठी आमच्या मराठी टाईम या वेबसाईटला नक्कीच भेट द्या.

हरीतालिका हा शब्द जरी आला तरी आपल्याला शिवपार्वती यांची लगेच आठवण होते. खरंतर हरितालिका यालाच आपण तीजा किंवा तीज असं म्हणून ओळखतो. हा व्रत मुख्यता बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्व व्रता पेक्षाही अधिक कठीण आणि सक्त असलेला हा व्रत स्त्रियांसाठी असतो.

हिंदू धर्मामध्ये मोलाचे स्थान आणि मान्यता असलेल हरित तालिका हे एक धार्मिक व्रत आहे. पार्वतीने शिव प्राप्तीसाठी हे व्रत केला होता. त्याला हरित तालिकेचा व्रत असे जगात मान्यता मिळाली.खरंतर या हरित या शब्दाचा अर्थ जिला हे व्रत करण्यासाठी नेले आणि लिका या शब्दाचा अर्थ म्हणजे सखी म्हणून माता पार्वतीला हरित तालिका म्हणून ओळखले जाते. एवढेच नाही तर याला, एक महत्त्वपूर्ण स्थान ही भविष्य पुराणात देण्यात आलेल आहे. इतकच नाही तर याचा उल्लेख हरगौरी संवादात आपल्याला दिसून येतो.

हरतालिका व्रत कथा माहिती मराठी | Haritalika Vrat Katha Information In Marathi 2023

Haritalika Vrat Katha Information In Marathi

कथा,आख्यायिका

हरितालिकेबद्दल लोकमान्य कथा म्हणजे पर्वतराजाची पुत्री माता पार्वती ही उपवर होते. मात्र नारदांच्या पित्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे ती थोडी चिंतीत असल्याचं त्या कथेमध्ये सांगण्यात येते पर्वतराजानी माता पार्वतीचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत घेतला होता.

मात्र पार्वतीच्या मनात शिवशंकर जी होते त्यामुळे तिने तिच्या सखी जवळ पित्याकडे एक निरोप पाठवला की जर तुम्ही माझा विवाह विष्णू सोबत करून दिला तर मी स्वतःचे प्राण त्याग करेल. मात्र वडिलांनी तिची एकही ऐकली नाही, आणि तिचा विवाह भगवान विष्णू यांच्यासोबतच होईल असा ठाम निर्णय घेतला. परिस्थितीला विवश होऊन माता-पार्वतीने तिच्या सखीच्या म्हणजेच मैत्रिणीच्या मदतीने घरातून पळ घेतली. आणि एका अरण्या मध्ये जाऊन शिवशंभु ची पूजा आरंभली.

तो सर्वात महत्त्वपूर्ण दिवस होता, भाद्रपद मासातील तृतीया म्हणजेच हस्त नक्षत्र होते. परंतु पार्वती माता इथेच थांबली नाही, तिने पूजा तर आरंभली सोबतच कठोर उपवास केला आणि जागरण केले. ती करत असलेला कठोर उपवास आणि तिचा जागरण पाहून शिवशंकर जी प्रसन्न झाले. आणि तिला पत्नी रूपात स्वीकारून त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांनी तिला पत्नी म्हणून जागा दिली अशी आख्यायिका आपल्याला पुराणात वाचायला मिळते.

Haritalika Vrat Katha Information In Marathi

प्रांतानुसार

अनेक प्रांतानुसार या कथेला कुठे मान्यता आहे तर कुठे नाही. मात्र ही पूजा आपण आपल्या नवऱ्यासाठी करतो, हे मात्र प्रत्येक स्त्रीच्या मनात असते .कुमारीका असलेल्या मुली, स्त्रिया या एक चांगला नवरा मिळावा यासाठी ही पूजा करतात ,तर ज्या विवाहित स्त्रिया आहेत. ते त्यांच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी ही पूजा करतात .अनेक प्रांतांमध्ये या पूजेला एक विशेष महत्त्व आहे.

या दिवशी सर्व कुमारिका ,विवाहित स्त्री ,विधवा स्त्रिया, सुद्धा हा उपवास करू शकतात. यामध्ये गौरी पूजन केले जाते. माता पार्वती आणि तिची मैत्रीण सखी या दोघींच्या मातीने मुर्त्या तयार करून यांना पुजल जाते.

Haritalika Vrat Katha Information In Marathi

व्रतामागील आशय

भोलेनाथ आणि पार्वती माता हे सर्व जगांचे माता पिता आहे म्हणून मान्यता आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मेळण्यातून विश्वाची निर्मिती झाली आहे. हे जरी खरे असले तरीही या पूजेला एक विशेष महत्त्व दिले जाते. आणि या नुसारच आदिशक्तीच्या पूजनातून या गोष्टीचे महत्त्व आपण स्वीकारत असतो.

हरतालिका व्रत कथा माहिती मराठी

Haritalika Vrat Katha Information In Marathi

पूजा विधि

या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार केले जाते. आणि माता पार्वती आणि शिव यांच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते. शिवाय या दिवशी स्त्रिया रात्रभर जागरण करतात. रुईच्या पानाला तूप लावून सकाळी उपास सोडतात. अशी प्रथा आहे, नैवेद्य ,आरती कथा पूजन हे या पूजेचे सामान्य रूप आहे. इतकच नाही तर विवाहित स्त्रिया सौभाग्य लेणी अर्पण करत असतात. त्या दिवशी माता पार्वती आणि शिवजी यांची आराधना करून पतीचे आयुष्य दीर्घ व्हावे तर कुमारीका मुली ,स्त्रिया या चांगला नवरा म्हणजेच शिवशंकरजी यांच्यासारखा नवरा मिळावा यासाठी ही पूजा करतात..

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

तर मित्रांनो तुम्हाला हरतालिका व्रत कथा माहिती मराठी हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका…वरील निबंध मध्ये काही चुका असतील किंवा काही लिहायचं राहून गेलं असेल तर ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद….

तर अशा या लेखातून आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आमचे काम आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला देखील लेख लिहायला आवडत असतील पण त्यासाठी व्यासपीठ मिळत नसेल तर आम्हाला कळवा.

Maze Gav Marathi Nibandh

Raksha Bandhan Nibandh In Marathi

ESSAY ON OUR FESTIVAL

Leave a Reply

%d bloggers like this: