भेट by सौ.मोहिनी संजय डंगर | Heart Touching Story in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.मोहिनी संजय डंगर यांनी Heart Touching Story in Marathi या कीवर्ड वर आधारित “भेट” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

भेट | Heart Touching Story in Marathi

?साहित्यबंध समुह?

साप्ताहिक उपक्रम क्र. ६

कथा लेखन विषय :- छोट्या गोष्टीतील सुख

शीर्षक : भेट

भेट | Heart Touching Story in Marathi

पार्थ आणि संकेत पाय हलवत बागेतल्या एका बाकावर बसले होते,”नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू होईल म्हणजे आठ तारखेपासून कदाचित आपल्याला सुट्टी असेल”. पार्थ सांगत होता अणि संकेत त्याच्या खाऊच्या पैकेट मध्ये हात घालून एक एक चिप्स उचलून खात होता. तो जे सांगतोय त्याच्याकडे त्याचे पूर्ण लक्ष् होत.


“आमच्या आईनी आणलेला कॅलेंडर,पण बंटी ने फाडला रे, बरं झालं तू सांगितलं”


चिप्स दातांत चुरडत संकेत पार्थला म्हणाला.असुदे रे,आता सांगितले ना मी, बाकी कुठल्या दिवशी काय स्पेशल असेल ते सांगत जाईन तुला आधीच्या दिवशी…चिप्स खाऊन कागद शेजारच्या कचरापेटीत टाकत,पार्थ संकेतला म्हणाला,
” किल्ला बनवायचा ना की नेहमीप्रमाणे तुझे बाबा विकत आणतील सीमेंटचा?”

भेट | Heart Touching Story in Marathi


“नको, या वर्षी आपण बनवूया,छोटा का होईना पण आपण मातीचाच बनवू, असे कर,तुझी आई कामाला येईल ना आमच्याकडे तेव्हा तू आणि बंटी पण या, एक दिवसात होईल बनवून ना?”


सुट्टी लागली दुसर्‍याच दिवशी पार्थच्या आईन,संकेतच्या आईला त्यांच्या शेजारी कॉल करून भांडी घासायला बोलावलं.आई निघाली हे पाहून संकेतने तिला पार्थ अणि त्याचा प्लॅनिंग सांगितलं अणि तिघेही पार्थ च्या घराकडे निघाले.

भेट | Heart Touching Story in Marathi

Heart Touching Story in Marathi


गेट जवळ जाताच संकेतने पार्थला आवाज दिला.पळत पळत पार्थ संकेत जवळ येऊन त्याच्या हाताला पकडून बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. बंटीच्या हाताला पकड़त आई त्याला घरात घेऊन गेली.”मुलांच किल्ला बनवायच ठरलय बाईसाहेब,गेली सुद्धा दोघ माती आणायला” संकेतची आई, पार्थच्या आईला म्हणाली.

भेट | Heart Touching Story in Marathi


“हा त्यांना करू देत काय करायचे ते,चल तू मला तेव्हडी साफसफाई करायला मदत कर, हे आले की मला शॉपिंगला जायला लागेल, उशीर झाला तर वैतागतिल.”असे म्हणत पार्थची आई स्टूलावर चढून तिच्या हातात वर ठेवलेली भांडी देऊ लागली.


चार वाजले, मुलांचा किल्ला तयार झाला.चार विटा, घमेल भर माती वापरून बनवलेला तो छोटासा किल्ला पाहत दोघे खुश झाले होते. दोघेही आपापल्या आईला हाक मारू लागले,त्या दोघीही बाहेर आल्या,किल्ला पहिला एवढा काही खास नव्हता पण आईच्या मनाने दोघांची दोघींनीही भरभरुन स्तुती केली.पार्थच्या आईने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ति अणि मावळे आणण्याचे प्रॉमिस केले.दोघेही उड्या मारत बंटीला घेऊन खेळायला गेले.


ईकडे पार्थचे आईवडील शॉपिंगला गेले.संकेतच्या आईने सगळे घर चकाचक केले.पण तिच्या चेहर्‍यावर असलेली नाराजगी पार्थच्या आईने टिपली होती.सण आहे मुलांना कपड़े नाहीत, फटाके नाहीत ना मी फराळ बनवला.संकेत समजूतदार आहे पण बंटी लहान आहे त्याने हट्ट केला तर काय करू?आजच्या कामाचे पैसे व्याज भरून संपतील. उद्याचा दिवस आहे अजून. कुठे काम मिळते का बघते अणि तिने नंबर काढून पार्थ च्या घरातील फोन वरुन मैत्रिणीला फोन लावला.आणि उद्या कुठे काम मिळतय का म्हणून बघ सांगितले म्हणजे दिवाळी सुटेल..हा बघते म्हणत मैत्रिणीने फोन ठेवला.
7 वाजले गाडीचा हॉर्न वाजला तसा पार्थ धावत आई बाबाकडे गेला, “आई ,फटाके आणलेस, मला कपड़े आणि बंदूक आणलीस अणि मावळे आणलेस?”

भेट | Heart Touching Story in Marathi


हो हो, सगळ आणलय घरात तर चल म्हणून ती पिशव्या घेऊन घरात आली, सोफ्यावर बसली अणि संकेतच्या आईला पाणी आणायला सांगितले, संकेत अणि बंटी मात्र एका कोपर्‍यात उभे राहून चाललेली चर्चा ऐकत होते.


पाण्याचा एक घोट घेत, पर्स मधले 1000 रुपये पार्थच्या आईने संकेतच्या आईला दिले.वर 100 रुपये देत म्हणाली, “ही दिवाळी,आता तू जा…मी बघेन जेवणाच” अणि हो ती कोपर्‍यात ठेवलेली पिशवी ने…व्यवस्थित जा.


कोपर्‍यातली पिशवी घेतली त्यात ते अकराशे रुपये नीट ठेवून ते तिघे निघाले.तेवढ्यात पार्थने आवाज दिला,”संकेत उद्या ये सकाळी,मावळे ठेवू “..मान डोलावत संकेत हा म्हणाला अन आईचा हात धरून चालू लागला.
घरी पोहोचल्यावर तिघेही जेवले आणि झोपले,सकाळी लवकर उठून संकेतचि आई काम आहे का विचारायला गेली पण निराश मुद्रेने घरी परतली.मूल उठली त्यांना आंघोळ घातली,जुनेच पण नवे दिसणारे कपड़े घातले.बाहेर रांगोळीच्या चार रेषा ओढल्या.अणि त्यांना खायला द्यायच म्हणून काळा चहा बनवला.”आई, आपण कधी आणायचे फटाके?”संकेत म्हणाला…”अरे संध्याकाळी आणू,आता जरा आराम करते काल काम करून थकले ना.” “हा चालेल” म्हणत संकेत दाराजवळ गेला..बंटी त्याच्या मागोमाग गेला, शेजारचा मुलगा चकली खात बाहेर आला. “आई आपण कधी करायचा फराळ?”संकेत ने विचारले, चहा कपात ओतत,” हा करू” म्हणत तिने त्यांना चहा बिस्किटे दिला.

भेट | Heart Touching Story in Marathi


मुले खात होती.ही मात्र त्यांच्याकडे पाहून हिरमुसली, 100 रुपये राहिलेत, डब्बा फोड़ते बघते किती आहेत, 500 भेटले तरी काम होईल, तिने डब्बा फोडला, 180 रुपये होते फक्त, बंटीच्या आजारपणा साठी कर्ज घेतला नसता तर कालचे अणि मागचे कितीतरी पैसे वाचले असते अशी चणचण नसती…ती तशीच बसुन नियोजन करत होती..”आई झाल खाऊन, मी पार्थकडे जाऊ?” संकेत म्हणाला.”हा जा पण लवकर ये” त्याची आई म्हणाली.तेवढ्यात तिला कालच्या पार्थ च्या आइने दिलेल्या पिशवीची आठवण झाली..एवढी मोठी पिशवी म्हणजे जुने कपड़े असणार…असे पुटपुटत तिने पिशवी ची गाठ सोडली..

भेट | Heart Touching Story in Marathi

खरच त्यात जुने कपडे होते, एक एक करत तिने पार्थचे t-shirt,पँट्स अन त्याच्या आईच्या साड्या काढल्या…खाली अजून एक पिशवी होती.ती बाहेर काढली उघडून पाहिली,आश्चर्यचकित होऊन तिने संकेत ला बोलवलं..संकेत बाजूला येऊन बसला. तिने ती पिशवी उघडली, त्यात काही फटाके, दिवाळीचा फराळ, एक नवी कोरी साडी अन बंटी अणि संकेतसाठी कपड़े होते..सोबत एक चिट्ठी होती ,त्यात लिहिलेल….

भेट | Heart Touching Story in Marathi


प्रिय सरिता,
काल तुझ्या डोळ्यात निराशा पाहिली,दिवाळी आहे, तुझ्याकडे पैसे नाहीत माहीत होत मला. संकेत खूप गुणी आहे तो खरी परिस्थिती सांगत नाही. तुझ्यासारखी तुझी मूलं पण खूप समजूतदार आहेत.छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधतात.तीच सवय माझ्या पार्थ ला लागली ,संकेतमुळे.त्यासाठी धन्यवाद. साफसफाई फक्त बहाणा होता ग,ह्या दिवाळी ला माझा आनंद तुझ्यासोबत अणि तुझ्या मुलांसोबत वाटायचा म्हणून ही सप्रेम भेट…लक्ष्मीपूजन ला घरी ये..

सरिता च्या डोळ्यात पाणी आले.ती भेट तिला आपलं कोणीतरी आहे जो आपला विचार करतोय ह्याची जाणीव करून गेली..

सौ.मोहिनी संजय डंगर
रायगड

भेट | Heart Touching Story in Marathi

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

भेट | Heart Touching Story in Marathi

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

भेट | Heart Touching Story in Marathi

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

भेट | Heart Touching Story in Marathi

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

भेट | Heart Touching Story in Marathi

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

भेट | Heart Touching Story in Marathi

Home

मोहिनी डंगर
मोहिनी डंगर

Author Information - सौ.मोहिनी संजय डंगर , पेण येथील रहिवासी असून, तालुका पेण आणि जिल्हा रायगड आहे. त्यांनी सेमी इंग्लिश मिडीयम मधून आपले शालेय शिक्षण घेतले असून त्यानंतर विज्ञान देखील पूर्ण केले आहे. त्यांना 2 वर्षे मराठी भाषेतून लेख लिहिण्याचा अनुभव असून त्यांनी 14 वर्षे मराठी कविता देखील लिहिल्या आहेत. तसेच त्यांना 20 वर्षापेक्षा जास्त मराठी भाषेची ओळख आहे. ते आठवड्यातून नियमितपणे 5-10 तास इतका वेळ मराठी भाषेत लिखाण करण्यास देतात. त्यांना मराठीतील कविता हा प्रकार आवडतो. मराठी लिखाण करताना त्यांना नाही हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांना तुम्ही पुढील फोन नंबर वर संपर्क करू शकता. फोन नंबर -

Leave a Reply