हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत सौ.क्रांती तानाजी पाटील यांनी Hivala Information in Marathi या कीवर्ड वर आधारित “हिवाळा ऋतू” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.

📒साहित्यबंध समुह📒

साप्ताहिक उपक्रम क्र. ३

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

हिवाळा ऋतू | Hivala Information in Marathi

सरीवर सरी गेल्या निघुनी आता,
दाट धुक्यांनी जागा घेतली तिची आता,
गुलाबी थंडीची चाहूल सांगे
झाला चालू हिवाळा ऋतू आता…!!

साऱ्या सृष्टीला कवटाळणारा. प्रत्येक ऋतूत नव्या रंगा ढंगात तिला नटवणारा . कधी तिला सोळाशृंगारांनी नटवणारा तर कधी रखरखत्या उन्हात तापवणारा. कधी धो ,धो पावसात चिंब भिजवणारा तर कधी थंडीत गोठवणारा,
स्वतः हातांनी सोळाशृंगार ओरबाडून तिची पानगळ करुन तिला विवस्त्र करणारा. हळूच तिला अंकुर धारण करायला लावून. नववधुची कोवळीकता देणारा. हा कालाचा छोटासा अंश म्हणजे ऋतू आणि ऋतू म्हणजे ‘फिरता काल’. मराठी कालगणनेनुसार वर्षातून सहा ऋतू येतात. वर्षा,शरद,शिशीर, हेमंत,वसंत व ग्रीष्म पण साधारण पणे तीनच ऋतू मानले जातात. तो म्हणजे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा. प्रत्येकाची वैशिष्ट्ये मात्र खुप वेगळी असतात. उन्हाळ्यात सारी सृष्टी तप्त उन्हाने तापून जाते.तर पावसाळ्यात, पाऊस धरणी मातेला हिरवा शालू पांघरूण जातो.

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

हिवाळा ऋतू हा साऱ्या सृष्टीला दाट धुक्याच्या दुलईत लपेटून घेतो. शुभ्र धवल ढगांची दाटी म्हणजे सकाळी,सकाळी स्वर्गच धरणीवर अवतरत असतो.

या “स्वर्ग सुखाचा” आनंद हा फक्त हिवाळा या ऋतूतच घेता येतो. एरव्ही पहाटे उठण्याचा कंटाळा करणारी मी. हिवाळ्यात मात्र धुक्यात हरवून जाण्यासाठी आनंदाने उठते. कारण जिवंतपणी उघड्या डोळ्याने “स्वर्गसुख”
अनुभवण्याची संधी फक्त हिवाळा ऋतु देतो.या धुक्याची चादर लपेटून फिरता,फिरता मनाला खुप अल्लाहादायक व प्रसन्न वाटत असते. ती बोचणारी थंड हवा. पण तिचा तो अंगावर शहारा आणणारा गुलाबी स्पर्श तनामनाला खुप हवाहवासा वाटतो.

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

झाडाचे पान आणि पान दवाने चिंबचिंब भिजलेले असते. त्यांच्या पानातुंन ओघळणारे दवबिंदू पाहताना. नववधूच न्हाऊन समोर उभी आहे. असचं क्षणभर मनाला वाटून जाते. नंतर हळूहळू सुर्य डोंगरा आडून दर्शन देतो. त्याच्या उगवत्या ‘सोनसळीत’ धुके संथपणे विरघळून जाते. गवताच्या तृणपात्यांवर पडलेले ते दवबिंदू या सोनकिरणांत एखाद्या हिऱ्यां,मोत्यांप्रमाणे चमकतात. एका मागून एक दवबिंदुंचीं ती ओळ म्हणजे मोत्यांची माळच ‘गवत पात्यांनी’ घातल्यासारखे वाटते. हा सृष्टीचा सुंदर साज पाहताना. हिवाळा ऋतु मधली ती सकाळची थंडी मनाला वेगळीच ऊब देत असते.
हिवाळ्यात आवळे,चिंचा,शेंगा,ऊस ,बोरे असा हा ‘रानमेवा’ सुध्दा तरुणीं प्रमाणे टच्चून भरलेला असतो.

आल्हाददायक वातावरण असल्याने चालणे,फिरणे, प्राणायाम या व्यायांमुळे शरीर ही निरोगी व तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आणि म्हणूनच हा हिवाळा ऋतू तनामनाला आनंद देत असतो. हिवाळ्यातल्या पहाटेचे हे चैतन्य दिवसभर टिकून राहते. व दुप्पट कार्यक्षमतेने आपण काम करतो.

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

Hivala Information in Marathi 2024

हिवाळ्यात जसे सकाळच्या सुर्योदयाचे रंग असतात. तसचे किंबहुना त्याहून ही अधिक मोहक सुर्यास्त असतो. जेवढी ही सकाळ सुंदर तितकीच ही सायंकाळ मनोहरी असते. दिवस आखूडअसतो. त्यामुळे सुर्यास्त होताना सुर्याचा ती तांबुस,केशरी टिकली. एखाद्या सौंदर्यवतीने कपाळावर सुंदर रेखीव कुंकू कोरावे असेच वाटते. त्याच्यातून फाकणारा तो गडद तांबूस रंग पटापट नभात मिसळून जात असताना. त्या मावळतीची शोभा खुप नयनरम्य वाटते. फिकट तांबूस,केशरी रंग, मधूनच अंधारलेले काळपट ढग व पांढरट ढगांचा रंग ही रंगाची उधळण पाहताना. मन रंगात रंगून जाते. अस्ताला जाताना सुध्दा आपण किती देखणे दिसू शकतो. एवढचं नाही तर या अस्ता नंतर पुन्हा उदय हा निश्चितच असतो. हा आशावादी विचार सर्वांना देण्याचे काम हा निसर्ग करतो. या मावळत्या दिनकराला प्रणाम करतानाच लगेच अंधार पसरतो. बघता-बघता हिवाळ्यातला दिवस संपतो. व रात्र होते.

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

हिवाळ्यातल्या या रात्रीचे हे सौंदर्य अवर्णनीय असेच असते. काळेकुट्ट असे आकाश त्यावर असलेले ते टिपुर चांदणे म्हणजे निशेने चमचम चांदणखड्यांची साडी परिधान केल्यासारखेच वाटते. तिच्यावरुन ही नजर काही केल्या हटत नाही.त्यांच्याकडे एकटक पाहताना नकळत लहान वयातले गाणे ओठांवर येते.

“चांदण्यांनो जरा थांबा,थांबा
माझ्यासारखे बोला,बोला.”

तर असा हा लडिवाळ क्षणांचा ‘हिवाळा ऋतू’ नेहमीच आवडीचा व हवाहवासा वाटतो. सकाळी दाट धुक्यात घुटमळणारे हे मन दवबिंदूमुळे झिरपणाऱ्या वळचणीच्या टपटप आवाजाने भानावर आले. थंड वारा तनामनाला स्पर्शून गेला. आठवांचा तो सुखद शहारा धुक्याच्या वासात गंधाळून गेला.
आला आला ऋतू हिवाळा, हळूच कानी सांगून गेला..!!

©®सौ.क्रांती तानाजी पाटील.
मु.पो.दुशेरे.
ता.कराड.जि.सातारा.
🙏🙏

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

समाप्त.

साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात

दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

marathi lekh katha nibandh

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.

मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.

लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.

या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल

१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा

२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे

३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.

४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.

५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.

६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.

तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत

https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd

9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.

आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

WHATS APP SCAM INFORMATION IN MARATHI

हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024

1 thought on “हिवाळा ऋतू by सौ.क्रांती तानाजी पाटील | Hivala Information in Marathi 2024”

Leave a Reply

%d bloggers like this: