साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत प्रेमवेडी मी यांनी Hivala Nibandh Marathi या कीवर्ड वर आधारित “नवं चैतन्य उल्हसित घेऊन येणारा हिवाळा ऋतू” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
साहित्यबन्ध समूह साप्ताहिक उपक्रम
लेख हिवाळा ऋतू
हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
मला सांगा…………
आवडता ऋतू म्हणजे काय हो?,ज्या ऋतूत आपल्याला एक प्रकारचा आनंद नवी ऊर्जा,नवं चैतन्य मिळतं ,म्हणजेच काय आपल्याला मिळणारा आनंद, ऋतुमधली मादकता,भाज्या फळं यांची सुरेख सुरवात ,शरीरात संचारणारी नवी ऊर्जा यालाच म्हणतात ना आवडता ऋतू,, म्हणजेच हा शरद ऋतू. शरद हा हिवाळा सुरू होण्या थोडा आधीचा काळ म्हंटले तरी वावगं ठरणार नाही, या दिवसांमध्ये, पावसाळा नुकताच संपलेला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक झालेलं असतं, . नवरात्र, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा,.. हे उत्सव सोहळे याच शरदातले बर ???
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023

श्रावणातल्या पावसाने न्हालेली सगळी झाडे , पाने मुक्त रंग उधळणं करतअसतात . पण जसा रुणझुणत्या पावसाला मंद मंद सरींबरोबर परतीचे वेध लागतात तशी सगळ्या निसर्गाची मुक्त उधळणं केलेला पसारा आता आवरायला सुरूवात झालेली असते. अल्लड रुणझुणत येणाऱ्या श्रावणातल्या पहाळ्या आता विरळ होत जातात. कंच न्हाऊन निघालेली हिरवाई सुद्धा मस्त टवटवीत दिसते पण अगदी अल्लड टवटवी म्हणावी तशी नसते तर ती धीर गंभीर अशी युवती होते. अन हळू हळू शांत अशी जणू प्रौढ व्हायला लागते. सर्व आसमंतात त्यात एक ठेहेराव जाणवू लागतो, पावसाने दाणादाण उडवल्यामुळे जी सगळी धावपळ, धांदल उडलेली असते तिला कुठेतरी ठेहेराव आल्या सारखे वाटते.
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
स्वच्छ निरभ्र आकाश, स्वच्छ ताजी हवा, पावसाळ्यातला तो दमट कुंदपणा अगदी धुतल्यासारखे. स्वच्छ, सुंदर आणि निरभ्र जाणवायला लागते. मग लक्षात येते आला शरद(हिवाळ्याची सुरवात) ऋतू, अगदी कविंचे ‘ सहा ऋतूचे सहा सोहळे’ अस म्हंटलं तरी चालेल. पण मला आवडतो तो वसंत आणि शरद या दोघांमधील सोहळा
वसंत जसा सगळ्या कवींचा आवडता आहे तसाच शरदानेही आपल्याला बरीच भुरळ घाततेली आहे सर्व कवींना,
श्रावणातल्या मुलायम अश्या हळूवार अलगद कुरवाळल्याने झाडांना नवी पालवी फुटायला लागते. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गुलाबी गारवा या सर्व शरदऋतूच्या आगमाच्याच खुणाच तर आहेत. आरशासारख्या लख्ख शांत पाण्यात ही नवीन फुटलेली पालवी हळुवार डोकावून जणू आपले रूप पाहतआहे निरखतआहे असंच भासायला लागतं, श्रावणात जसा सगळा निसर्ग गर्द हिरवा होतो, शरदात ती हिरवाई हळू हळू खाली उतरायला सुरवात होते, इतक्या दिवस वर दिसणारी रंगाची श्रीमंती आता खाली दिसु लागते. वसुंधरेने उभ्याने नेसलेले रंगीत हिरवे वस्त्र आता खाली पहुडतांना पांघरून आलेली दिसते,
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
सभोवताली ही रंगीत गालिच्यांची चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली, की समजायचे ऋतुराज शरदाचे आगमन झाले. अश्या वेळेस वातावरणात वेगळीच रंगसंगती दिसून येते. पावसाळ्यात तरी केवळ हिरवळ दिसते. पण शरदाच्या दिवसात, सगळेच रंग दिसतात, हिरवे गवत, त्यावर पडलेली विविध रंगांची पानं.. सगळ्यात रंगीबेरंगी ऋतू आहे हा.
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
प्रत्येक ऋतूतील दिवस आणि रात्र एकच वाटते पण शरदाची रात्र मला कायम जास्त रोमांचित भासते. रात्रीची ती निरव शांतता, लख्ख चांदण, निरभ्र आकाश अन वातावरणात पसरलेला तो रातराणी, शेवंती, कुंदा, सायली, जाई ,जुईचा सुगंध अगदी धुंद करणारी रात्र असते. काही रात्री गंभीर असतात, तर काही अगदीच शांत. शरदाची रात्र म्हणावी तर अलवार धुंद अशा मुग्ध जाणिवेची असते. शरदाच्या रात्री ह्या मोठ्या असतात, ठेहेराव असलेल्या निरभ्र, अथांग रात्री.
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023

मला ना कीचकवध मधील गदिमांचे गाणे
धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे
हे वर्णन शरदातील रात्रीचे वाटते.
शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. निळाईचे गडद आभाळ अन उगवलेल्या हजारो तारा. हवेत ही स्वच्छ शुभ्र असे मार्दव असते. धुलिकणाचा लपंडाव नसतो- तारांगण निरखावे ते शरद ऋतूच्या रात्रीच, गुलाबी थंडीची हुरहुरती चाहूल लागलेली असते. गडद अशा, लांबलचक रात्री मग प्रियेची आठवण येणारच ना. प्रियकराच्या आठवात मग्न झालेली तरुणी म्हणते
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
राती भराला येउ दे प्रिती
तुम्हाला माहिती आहे का???
कोजागरी आणि शरद ऋतूचे नातं नेहमीच किती सुरेख असतं ते, मस्त गुलाबी हवा, हवेत छान गारवा , स्वच्छ हवा अन आभाळभर चांदणे, चंद्र असा मोठा लखलखता चंद्र आहे साक्षीला मधला चंद्र आणि मग मित्र मंडळी समवेत जागवलेल्या त्या रात्री, अहाहा, लाजबाब !
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
जणू ही गुलाबी हवा वेड लावी जिवा असं म्हंटलच आहे लहानपणापासूनच्या कोजागरीच्या रात्री नजरेसमोर येतात. अगदी लहानपणी कोजागरी म्हणजे रात्री सगळ्यांनी एकत्र यायचे, मग हास्य विनोदाची उधळणं, कुठे गाण्याच्या भेंड्या तर कुठे विनोदी किस्से. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन अशी मजा करण्याची भारी मौज वाटायची, मोठेपणी तर ती शरदाची रात्र म्हणजे शारदसुंदर गाण्यातली अशीच वाटायची. गुलाबी थंडीत ते एकत्र येणे कोजागरीच्या निमित्त्याने. तो सहेतुक प्रियकरचा स्पर्श, नजरानजर, सहेतुक गायलेले गाणे सर्वच कसं रोमांचित करणारं आहे,ही कोजागरीची रात्र म्हणजे अशी उल्हासाची आनंदाची पर्वणी हे समीकरण मात्र अजूनही मना मनात घट्ट रुजलेलं आहे.
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. दस-या पासून हळू हळू हिवाळा सुरू होतो , कोजागरीच्या रात्री पडणारं चंद्राचं तेज अति आरोग्य दयी असतं. त्यामुळे त्या चंद्राची चंद्रकिरणे पडलेले दूध प्राशन करणे आरोग्यदायी ठरतं, ही भूमिका मोठं झाल्यावर मला समजली. काल, आज आणि उद्या असाच शरद ऋतू असणार आहे अन असाच आपल्या अनाहत सौदयांच्या अगणित आठवणी देउन लुभावणार आहे ! शरद7 ऋतूतील स्वाती नक्षत्रात पडणार्या पावसाच्या थेंबाचे जसे मोती शिंपल्यांमध्ये तयार व्हायला लागतात तसे जणू ते लखलखणारे चांदणमोती आभाळभर पसरतात आणि मग नखशिखांत लखलखत सदैव सुरू राहतं
तर अशी आहे या थंड ऋतूची महती आनंद , मन सदैव चैत्यन्यानी भरलेलं असतं,
शुक्र तारा थंड वारा
चांदणे पाण्यातुनी
चन्द्र आहे स्वप्न वाहे
धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू असा जवळी रहा तू अशी जवळी रहा
प्रेमवेडी मी
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
तुम्ही वाचत आहात हिवाळा ऋतू BY प्रेमवेडी मी | Hivala Nibandh Marathi 2023