साहित्यबंध समूह आयोजित साप्ताहिक स्पर्धेत रवी आटे यांनी Hivala Rutu Mahiti in Marathi या कीवर्ड वर आधारित “हिवाळा ऋतू” हा लेख लिहिला आहे. चला तर वाचूया.
साहित्यबंध समूह
साप्ताहिक उपक्रम क्रमांक 3
लेख विषय-हिवाळा ऋतू
लेख पाठविण्याची तारीख-26 व 27 ऑक्टोबर 2023
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023
हिवाळा ऋतू Hivala Rutu Mahiti in Marathi
हिवाळा ऋतू हे शब्द उच्चारलेत तरी मानवी मनाला कल्पनेत का होईना पण गारवा अनुभूत होतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत .त्यातील हिवाळा हा सर्वाधिक लोकप्रिय ऋतू आहे. भारतीय संस्कृती नुसार वसंत ,ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत ,शिशिर हे सहा ऋतू आहेत. माघ फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतुचे अस्तित्व असते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्याची चाहूल लागलेली असते. सर्वांना हिवाळ्याचा ऋतू भरभरून आनंद देत असतो.
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023

अर्थातच सर्व ऋतू हे विविध भौगोलिक कारणांमुळे निर्माण होतात. पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे हिवाळ्याची निर्मिती घडून येते. तिचा अर्धा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तिथे हिवाळा नांदतो त्याचवेळी दुसऱ्या गोलार्धात अर्थातच उन्हाळा असतो. तिरप्या सूर्यप्रकाशामुळे गारवा निर्माण होतो व म्हणूनच हिवाळ्याला आपण शीत ऋतू असे संबोधतो. जेव्हा हिवाळ्याची थंडी आनंददायी वाटते तेव्हा तिला आपण गुलाबी थंडी असे म्हणतो मात्र थंडीचा त्रास झाल्यास फार कडाक्याची थंडी पडली असे शब्द आपल्या मुखातून अनायास निघून जातात. हिवाळा असताना जगातील अनेक देशात बर्फ पडतो तर आपल्याकडे हिवाळ्याचे पानगळ हे विशेष वैशिष्ट्य आहे. झाडांची पाने गळून त्या ठिकाणी नवीन पाने उगवण्याची प्रक्रिया हिवाळ्यातच सुरू झालेली असते. एक प्रकारे निसर्ग कात टाकून नव्याने जन्म घेण्याची प्रक्रिया करीत असतो म्हणा! ही प्रक्रिया अर्थातच वसंत ऋतुच्या आगमनापर्यंत व काहीशी त्यानंतरही सुरूच राहते.
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023
चोहीकडे या ऋतूत धुके पसरलेले दिसते. कधी कधी तर काही मीटर अंतरावरील वस्तू सुद्धा धूसरच दिसतात. अशावेळी रस्त्याने प्रवास करताना मनात काहीशी भीती देखील दाटून येत असते. अशा वातावरणात सूर्य जरी उगवला तरी तापमानात फारसा फरक पडत नाही. गारव्याचीच प्रामुख्याने अनुभूती होत राहते. झाडांची जी पाने पडलेली असतात त्यांनी देखील विविध रंग धारण केलेले दिसतात. निसर्गच मुळात चमत्कारिक व अद्भुत असा आहे. मुंबईत मात्र थंडी फारशी जाणवत नाही त्यामुळे हौशी मुंबईकर पुणे — नाशिकच्या दिशेने काही काळ घालविण्यासाठी निघून जातात.
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023
थंड हवेची ठिकाणे या ऋतूत अनुभवण्यासारखीच असतात. मात्र त्यासाठी फार पूर्वीच नियोजन करावे लागते. मात्र चिखलदरा असो अथवा महाबळेश्वर असो किंवा कुठलेही गाव असो… भूक मात्र हिवाळ्यात चांगली च जाणवते. चहा पिण्याचे प्रमाण वाढते. जे चहा पीत नाहीत त्यांना देखील शीत ऋतूत चहा पिण्याची कधी कधी अनायास तल्लब येऊनच जाते. वातावरणात सातत्याने गारवा असल्याने फारसा थकवा जाणवत नाही. मात्र चालण्याच्या व्यायामासाठी साखर झोपेतून उठावेच लागते. पक्षी स्थलांतर करतात हिवाळ्यात. मनुष्य प्राणी स्थलांतर करणार नाही. मात्र चालण्याच्या प्रक्रियेतून तो एक प्रकारे तात्पुरते स्थलांतरणच करीत असतो.
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023

निसर्गच आरोग्यदायी असतो त्यामुळे आपण देखील आरोग्य संपन्न होऊ लागतो. भूक लागून पचनाची क्रिया देखील सुधारलेली असते. मात्र फारच कडाक्याची थंडी पडली तर त्वचा काहीशी उलते व ओठ फुटतात. त्याचप्रमाणे ओठांच्या शेवटी त्वचा देखील फाटलेली असते. मात्र थंडीत कुडकुडनारे रस्त्याच्या कडेला झोपलेले गरीब बघितल्यावर आपल्याला थंडीचा झालेला त्रास काहीच नाही याची जाणीव होते. त्यातूनच रस्त्याच्या कडेला आसरा घेतलेल्या गरिबांना शालचादरी वगैरे वाटप करण्याची सद्भावना सामान्य माणसाच्या देखील मनात येऊन जाते. यात झालेल्या खर्चापेक्षा मिळालेले सुख जास्त असते.
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023
धुके व पानगळी याव्यतिरिक्त दव पडणे हे हिवाळ्याचे प्रमुख लक्षण म्हणता येईल. या सर्व वैशिष्ट्यांवर कवी आणि लेखक मंडळी वेगवेगळ्या कल्पनांद्वारे मनाला स्पर्श करणारा भावार्थ देऊन जातात. अर्थात त्यांच्या शब्दांद्वारे! ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी धूळ माध्यम म्हणून कार्य करते त्याचप्रमाणे कवी लेखकांच्या मनातील भाव आणि विचार रसिकांपर्यंत पोहोचविण्यात पूर्वीच निर्माण झालेल्या भाषेतील शब्द कार्य करतात. मात्र या शब्दांत जिवंत भाव मात्र लेखक कवी यांनीच टाकलेले असतात. भलेही ते अदृश्य असोत !!!
हा लेख वाचल्यानंतर आपल्या मनास देखील हिवाळा ऋतूतील निसर्गाची एखादी किमया स्पर्श करून गेली तर लेखाची फलनिष्पत्ती पूर्णपणे झाली असे लेखकाच्या मनाला अर्थातच वाटणार आहे!!!
रवी आटे सानपाडा नवी मुंबई
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023
समाप्त.
साहित्यबंध समूहाची माहिती आणि जाहिरात
दिवसेंदिवस मराठी भाषेवर इतर भाषेतील शब्दांचा अतिरेक होत आहे. कित्येक मराठी शब्द तर नवीन पिढीच्या कानावर देखील पडले नाहीत. यामुळे पुढे जाऊन मराठी भाषा हळू हळू लुप्त होईल अशी आम्हाला भीती आहे. लिहिणे, बोलणे, ऐकणे आणि वाचणे ह्यातूनच मराठी भाषा अनंत काल टिकू शकते.

त्यामुळे नवनवीन साहित्यिक मराठी भाषेतून निर्माण होणे ही काळाची गरज आहे. तसेच लेखकांचा पुरेसा सन्मान मिळणे आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे त्याचबरोबर साहित्य चोरी थांबवणे या उद्देशातून आम्ही हा समूह तयार केला आहे.
मराठी भाषेच्या प्रती आमचे जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही देखील मराठी भाषेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हा समूह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा.
लक्षात घ्या की ह्या समूहाची सभासद फी ५०₹ प्रती महिना आहे. सभासद फी 9146494879 या Gpay किंवा PhonePe नंबर वर टाकल्यानंतर ग्रुप मध्ये add केले जाईल. एकदाच वार्षिक सभासदत्व घेणाऱ्यांना फी मध्ये १०० ₹ सूट मिळेल.
या मासिक सभासदत्वामध्ये तुम्हाला मिळेल
१) साहित्यक्षेत्रातील प्रगतीसाठी ४ साप्ताहिक स्पर्धा
२) सहभागासाठी आकर्षक डिजिटल प्रमाणपत्रे
३) स्पर्धेतील तुमचे चार लेख सुप्रसिद्ध अशा मराठी टाईम वेबसाईटवर पब्लिश केले जातील. ज्याची लिंक तुम्ही कुठेही शेअर करू शकता.
४) तुमचा फोटो आणि लेखाच्या नावासहीत चार सुंदर वॉलपेपर.
५) लेख त्याच्या विषयाला अनुसरून छान वॉलपेपरसने सजविला जातील.
६) तुमचा लेख गुगल सर्च मध्ये आणण्यासाठी SEO techniques वापरल्या जातील.
तुमच्या एका लेखावर अंदाजे ५००₹ चे काम केले जाईल म्हणजे ५०₹ च्या सभासद फी मध्ये ४ लेखांवर होणारे २०००₹ चे फायदे तुम्हाला मिळणार आहेत
https://chat.whatsapp.com/JDA5qGHXn43IofHbacHWBd
9146494879 या Gpay/ PhonePe नंबरवर एका महिन्याची ५०₹ फी किंवा वर्षाची ५००₹ सभासद फी पाठवा. Payment कमेंट मध्ये स्वतःचे नाव टाका. आणि वरील ग्रुप लिंकला जॉईन व्हा.
आमच्या समूहातील कविता वाचण्यासाठी भेट द्या mazablog.online
हिवाळा ऋतू by रवी आटे | Hivala Rutu Mahiti in Marathi 2023